नागपूर : उपराजधानीचे तापमान ४२-४४ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताची धास्तीही वाढली आहे. वैद्यकीय भाषेत ‘हायपरथर्मिया’ म्हणतात. विदर्भात उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आजार होऊच नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, मानवाच्या शरीराचं सामान्य तापमान ३५.९ सेल्सिअस स्थिर असतं. हवेतील उष्मा वाढला किंवा कमी झाला तरीही शरीराच्या सामान्य तापमानात फारसा बदल होत नाही. तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या त्वचेच्या, रक्ताच्या, मेंदूच्या संरचनेत आहे. पुरेसा घाम येणे आणि शरीर थंड होणे हा तापमान नियंत्रणाचा मार्ग मानवी शरीराने स्वीकारला आहे. पण शरीरातच पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर मग समस्या निर्माण होतात. (प्रतिनिधी) उष्माघात म्हणजे काय?डॉ. पाटील यांनी सांगितले, वाढत्या वातावरणातील तापमानामुळे मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण न राहिल्यास शरीरावर होणारा अपाय, यास उष्माघात म्हणता येईल. उष्माघात वातावरणातील वाढलेले तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे होतो.सामान्य लक्षणे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्ध होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेततीव्र लक्षणे उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा रु क्ष होणे आणि सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते, कोमात जाण्याची शक्यता असते. महत्त्वाचे...उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे वापरावे. यामुळे मेंदूपर्यंत ऊन जाण्यास अटकाव होईल. उपाशीपोटी उन्हात फिरणे टाळावे. यामुळे ग्लुकोजचा पुरवठा कमी होतोशरीराच्या तापमानात अचानक बदल होऊ नये म्हणून अति थंड पाणी पिणे टाळावे.उन्हात कष्टाची कामे टाळावीत तसेच ‘बॉयलर रूम’मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, अधूनमधून उन्हात काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
- तर टाळता येईल उष्माघात ...
By admin | Updated: April 19, 2016 06:39 IST