शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार

By admin | Updated: March 15, 2017 02:27 IST

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

 टंचाई नियोजनाकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे टंचाई निवारण्याच्या कामाचे नियोजन उन्हाळा सुरू होण्यापूर्वी झाल्यास, त्याची झळ ग्रामीण जनतेला फारशी पोहचत नाही. यंदा जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट असल्याचे वर्तविण्यात येत आहे. टंचाई निवारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. टंचाईचे पुढचे नियोजन जि.प. ला करायचे आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने यंदाही ग्रामीण जनता पाण्यासाठी तडफणार असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याची झळ लागायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जि. प. प्रशासन पाणीटंचाई निर्मूलनार्थ उपाययोजना करते. मात्र या उपाययोजना कागदावरून पुढे सरकल्या नसल्याचे समोर आले आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिल्यानंतरही जि. प. कडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही़ साहायक भूवैज्ञानिक विभागाकडून विंधन विहिरी आणि विहिरी कुठे खोदायच्या, याचे सर्व्हेक्षणच पूर्ण झाले नाही़ त्यांच्या आराखड्यावरच पुढील उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य असते़ परंतू जि. प. ने हा अहवाल तातडीने देण्यासाठी पाठपुरावाच केला नसल्याची माहिती आहे़ सध्या पाणीटंचाई कृती आराखड्याचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू आहे़ दुसऱ्या टप्प्याचा कालावधी समाप्त व्हायला केवळ दोन आठवडे शिल्लक आहे़ जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाची अद्यापही पाणीप्रश्नावर बैठकही झाली नाही़ मार्च महिन्यात ८९५ गावांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर एप्रिल ते जूनच्या कालावधीत ३४० गावे टंचाईच्या वर्गवारीत येणार आहे़ परंतु मार्च महिन्यातील उपाययोजना वेळेवर न झाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़ यामध्ये नळ योजना, विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी, विशेष विंधन विहिरी दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, विहीर खोलीकरण, बुडक्या खोदणे, टँकरव्दारे पुरविणे, खासगी विहीर अधिग्रहण, आदी उपाययोजनांचा समावेश आहे़ दुसरीकडे पाणीटंचाई प्रशासन कधी सोडवेल, या मागणीचा अर्जांचा ढीग जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी लागला आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांची उचलबांगडी नागपूर जीवन प्राधिकरणला करण्यात आली़ प्रभार लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सहारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही विभागाचा प्रभार सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे़ त्याचाच फटका पाणीटंचाई कृती आराखड्यालाही बसला आहे़ (प्रतिनिधी) तहान लागल्यावर विहीर खोदणार का? येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामीण जनतेला करावा लागणार आहे. परंतु अद्यापही जि.प. टंचाई संदर्भात एकही बैठक झालेली नाही. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता जि.प. टंचाईवर विशेष सभा बोलाविणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. ऐन उन्हाळ्यात तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा सवाल जि.प. सदस्य नाना कंभाले यांनी केला आहे.