शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्या पक्ष्यांनी गजबजला नागपुरातील गोरेवाडा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:40 IST

गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिसरात २१६ प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे.

ठळक मुद्देपक्षी निरीक्षकांची गर्दी वाढली५५ स्थलांतरित पक्ष्यांचे आकर्षणपरिसरात २१६ प्रजाती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा संरक्षित अभयारण्यासह येथील समृद्ध अशा गोरेवाडा तलाव परिसरात २१६ विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यापैकी ५० ते ५५ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांना पक्ष्यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गोरेवाडा तलावावरील हे पक्षीवैभव पाहण्यासाठी पर्यटक येथे आकर्षित होत आहेत.वनविकास महामंडळाच्यावतीने गोरेवाडा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये गेलेल्या वन जमिनीच्या पर्यायी वनीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून सुमारे २१ किलोमीटर परिसरात वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले आहे.गोरेवाडा बायोपार्क परिसरात सुमारे १२० वर्षांपूर्वी गोरेवाडा तलावाची निर्मिती सीतागोंडीन यांनी नागपूरच्या पाणीपुरवठ्यासाठी केल्याची नोंद आहे. या तलावासभोवताल मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असून स्थलांतरित पक्षी हे या तलावाचे मुख्य आकर्षण आहे.पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रेस्टेड ग्रेबचे दर्शनक्रेस्टेड ग्रेब हा पक्षी सुमारे पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. यासोबतच रेड क्रेस्टेड पोचार्ड, रुडी सेल्डक, गडवाल, नॉर्थन शॉलर, शेंडीवाला बदक, हूडहूड, रेड स्टार्ट आदी स्थलांतरित पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणावर आगमन झाले आहे.पक्षी अभ्यासकांसाठी अशी आहे सुविधापक्षी निरीक्षकांसाठी वन विकास महामंडळातर्फे येथे विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बायनाकुलर (दुर्बिण) तसेच पक्षी निरीक्षकांसाठी गाईडची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. यामुळेच पक्ष्यांच्या नावासह त्यांची वीण, वास्तव्याचे ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. तलावाच्या सभोवताल बर्ड हायडर लावण्यात आले आहे. याशिवाय दहापेक्षा जास्त ठिकाणी बर्ड स्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. गोरेवाडा परिसरातील समृद्ध वनसंपदेसह तलावावरील पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी अडीच किलोमीटरची नेचर ट्रेल तयार करण्यात आली आहे. सायकलवरुनही नेचर ट्रेल बघण्याची सुविधा आहे. गोरेवाडा बायोपार्कमध्ये नीलगाय, सांबर, ससे, विविध प्रकारची फुलपाखरे, पक्षी, मोर यासह साप, अजगरांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचेही वास्तव्य आहे.गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिसरात २१६ प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्यात विदेशी पक्षी या परिसरात वास्तव्याला येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची सुविधा या प्रकल्पात प्राधान्याने करण्यात आली आहे.- पांडुरंग पखाले, वन परिक्षेत्र अधिकारी, गोरेवाडा प्रकल्प.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय