शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

विजेच्या धक्क्याने महिला मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा/मेंढला : वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने शेताच्या तारेच्या कुंपणातील वीज प्रवाहाने निंदणासाठी जात असलेल्या दाेन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा/मेंढला : वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने शेताच्या तारेच्या कुंपणातील वीज प्रवाहाने निंदणासाठी जात असलेल्या दाेन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा (सायवाडा) नजीकच्या खलानगाेंदी शिवारात रविवारी (दि. ११) सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घडली. पाेलिसांनी शेतकऱ्याच्या मुलाला ताब्यात घेतले असून, शेतकऱ्याचा शाेध सुरू केला आहे.

कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (४८) व सुशीला सुरेश दहिवाडे (४९, दाेघी रा. खलानगोंदी, ता. नरखेड) अशी मृत महिलांची नावे आहेत. नाना बेले (रा. अंबाडा सायवाडा) याची खलानगाेंदी शिवारात शेती असून, त्याने त्याच्या १२ एकर शेताला तारांचे कुंपण केले आहे. या १२ एकरात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली आहे. राेही व रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी त्याने कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला हाेता. भुईमुगात निंदणासाठी त्याने चार महिला मजुरांना बोलावले हाेते. त्यात कलाबाई व सुशीला यांचाही समवेश हाेता. या महिला शेतात येण्यापूर्वी तारांमधील वीजप्रवाह खंडित केला नव्हता. चारही महिला सकाळी शेतात गेल्या. दाेघी पुढे हाेत्या, तर दाेघी त्यांच्या मागे हाेत्या. समाेर असलेल्या महिला जमिनीवर काेसळल्या. त्या दाेघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागे राहिलेल्या दोघींनी लगेच या घटनेची माहिती गावात येऊन नागरिकांना दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले.

जलालखेडा पाेलिसांनी शेतकरी नाना बेले व त्याचा मुलगा चंद्रशेखर बेले यांच्याविरुद्ध भादंवि ३०४, ५०६ तसेच इलेक्ट्रिसिटी ॲक्ट कलम १३५, १५० अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात जलालखेडा पाेलिसांनी चंद्रशेखर बेले यास अटक केली. नाना बेले पसार झाल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.

....

वीजचोरीचाही गुन्हा

नाना व चंद्रशेखर बेले हे शेतातील तारांच्या कुंपणात रात्रीच्या वेळी वीजप्रवाह प्रवाहित करायचे. त्यांचा हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू हाेता. पाेलिसांसाेबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. वीजचाेरी केल्याचे स्पष्ट झाल्याने या दाेघांविरुद्ध वीजचाेरीच्याही गुन्ह्याची नाेंद करण्यात आली आहे.

...

पाेलीस ठाण्याच्या आवारात गर्दी

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली हाेती. नाना व चंद्रशेखर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदवा, मृत महिलांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्या, या मागण्या नागरिकांनी रेटून धरल्याने काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, नायब तहसीलदार विजय डांगाेरे यांच्यासह स्थानिक लाेकप्रतिनिधींनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले. नाना बेले याला लवकरच अटक करण्याची व दाेषींवर कारवाई करण्याची ग्वाही ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी दिली.

...

मृत महिलेच्या मुलाला शिवीगाळ

घटनेची माहिती मिळताच मृत महिलांच्या कुटुंबीयांसह खलानगाेंदी येथील नागरिक घटनास्थळी पाेहाेचले. काही वेळात नाना बेले तिथे आला. मृत सुशीला दहिवाडे यांच्या मुलाने नानाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर नानाने सर्वांसमक्ष त्या मुलाला शिवीगाळ करीत, ‘तुझ्याकडून जे हाेते ते करून घेे’, असे सुनावत दाेन मिनिटांत तेथून पसार झाला.