शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅडीनो’ विषाणूमुळे डोळ्याची साथ

By admin | Updated: June 25, 2017 02:00 IST

उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे.

मेडिकल : रोज १५वर रुग्णांवर उपचार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात या विषाणुजन्य आजाराचे दररोज १५वर रुग्ण येत आहेत. यात लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. ‘अ‍ॅडीनोव्हायरस’ या विषाणुमुळे होणाऱ्या या आजाराच्या रुग्णात गंभीर आजाराचे रुग्णही आढळून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरातील वातावरणात दमटपणा वाढलेला आहे. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसे, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दरवर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रु माल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स आदी वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते. त्यात तथ्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही. डोळे येण्याची लक्षणे मेडिकलच्या नेत्र रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, या आजारात डोळे लाल होणे किंवा डोळ्यात रक्तस्राव होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यातून चिपड येणे, सकाळी डोळे चिकटलेले असणे, डोळ्याला खाज व जळजळ होणे, डोळ्याला धूसर किंवा अंधुक दिसणे, पापण्यांवर सूज येणे, प्रकाश सहन न होणे, डोळे दुखणे तसेच ताप, सर्दी व घशाचे आजार होणे आदी लक्षणे दिसून येतात.