शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

भांडे घासून मुलीला केले इंजिनीअर

By admin | Updated: March 8, 2015 13:15 IST

घरी सारेच प्रतिकूल होते ... कष्टाला पर्याय नव्हता़, पण ती हरली नाही़ गरिबीचा हा भोगवटा आपल्या मागे आपल्या मुलांनाही भोगावा लागू नये म्हणून तिने डोक्यावरचा पदर कंबरेला खोसला आणि ...

वीरेंद्रकुमार जोगी नागपूरघरी सारेच प्रतिकूल होते ... कष्टाला पर्याय नव्हता़, पण ती हरली नाही़ गरिबीचा हा भोगवटा आपल्या मागे आपल्या मुलांनाही भोगावा लागू नये म्हणून तिने डोक्यावरचा पदर कंबरेला खोसला आणि अखंड परिश्रमाच्या बळावर आपल्या मुलीला आज इंजिनीअर केले़ स्त्रीशक्तीचे आदर्श उदाहरण असलेल्या बेबी वानखेडे यांची ही साहसकथा आहे़ परिस्थितीने अत्यंत दीन असलेल्या बेबी लग्नापूर्वी बेकरीत कामाला होत्या तर पती हॉटेलात काम करीत होते. दोघांच्याही तुटपुंज्या कमाईतून कसाबसा संसार चालत होता. मुलीच्या जन्माने जबाबदारी वाढलीच, अशातच दोन मुलांचाही जन्म झाला. एकट्या नवऱ्याच्या कमाईवर भागत नसल्याने बेबीने घरकामाला सुरुवात केली. घरच्या कमाईत हातभार लागला. दहावी-बारावीत चांगले गुण मिळविलेल्या आपल्या मुलीने मोठे व्हावे असे वाटत होतेच. मेडिकलमध्ये पुरेसे पैसे नसल्याने प्रवेश घेता आला नाही. याचे शल्य आजही बेबी यांच्या मनात आहे. इंजिनीअर झालेल्या आपल्या मुलीला पाहिल्यावर आजही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान बेबीच्या डोळ्यातून ओझरते. आपल्या मुलीने आपले दिवस पालटवले, असे बेबी यांनी सांगितले. मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेल्या पैशातून झोपडीचे रू पांतर घरात झाले. मुलीच्या लग्नाची जबाबदारी मुलांनी स्वीकारली आहे. आम्ही आमच्या आयुष्यात उपसलेले कष्ट कुणाच्याच आयुष्तात येऊ नयेत. मुलगी झाली तेव्हा तिचे पालनपोषण व लग्न कसे होईल, असा विचार नेहमीच करायचे. आता माझ्या मुलीनेच माझे भाग्य पालटले आहे, असे बोलताना बेबी वानखेडे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरतात.