शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

डिस्लेक्सियाग्रस्तांना कधी मिळणार दिलासा ?

By admin | Updated: March 6, 2017 01:50 IST

‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो.

प्रमाणपत्रासाठी मुंबई-पुण्याच्या चकरा : तंत्रज्ञअभावी मेडिकलचे केंद्र खोळंबलेसुमेध वाघमारे नागपूर‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु हा आजार असल्याचे प्रमाणपत्र राज्यात केवळ पुणे व मुंबई येथील अध्ययन अक्षमता केंद्रात मिळायचे. परिणामी, प्रमाणपत्राअभावी अशी मुले मागे पडायची. याला घेऊन दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. मेडिकलमध्ये हे केंद्र सुरू झाले, मात्र तंत्रज्ञाची जागाच भरण्यात आली नाही. परिणामी, प्रमाणपत्रासाठी रुग्णांची पुणे, मुंबईवारी सुरूच आहे.‘डिस्लेक्सिया’ हा शब्द आमीर खान यांच्या ‘तारे जमीपर’ या चित्रपटातून लोकांसमोर आला. अनेकांना या विकाराची माहिती झाली. ‘डिस्लेक्शिया’ बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी आणि त्याच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे काहीही लिहिताना तो वेगवेगळ्या असंख्य चुका करतो. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. वर्गात तो ‘ढ’ किंवा मूर्ख समजला जातो. हा विकार वेळीच ओळखता आल्यास व त्याला तज्ज्ञाकडून ट्रेनिंग दिल्यास या विकारांची मुले आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचे धनी होऊ शकतात. या आजाराच्या रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. परंतु याचा फायदा पुणे, मुंबईच्याच रुग्णांना मिळत आहे. कारण या ठिकाणच्या इस्पितळातच ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू आहे. येथेच रुग्णांची चार ते पाच वेळा तपासणी करून हा आजार असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. याला घेऊन २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. १ फेब्रुवारी २०१६ मध्ये यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसिक रोग विभागात हे केंद्र सुरू झाले. परंतु मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षक (स्पेशल एज्युकेटर) हे दोन तंत्रज्ञ न मिळाल्याने या केंद्रातून प्रमाणपत्र देणे बंदच आहे. २५ विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतर केंद्र झाले बंदसूत्रानुसार, मेडिकलमध्ये आॅक्टोबर-२०१६ मध्ये ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू झाले. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेमक्या चुका माहिती करून घेण्यासाठी मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षकाचे पदच भरण्यात आले नाहीत. यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही मंजुरी न मिळाल्याने आता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईचा रस्ता दाखविला जात आहे.