शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

लहान व्यापाऱ्यांकडून व्हॅटची दुहेरी आकारणी

By admin | Updated: September 7, 2015 02:56 IST

व्हॅटमुळे लहान व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विभागाचा ससेमिरा आमच्या मागे लागण्याचा आरोप नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे.

व्हॅटमुळे व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास : विक्रीकर विभागाच्या नोटिसानागपूर : व्हॅटमुळे लहान व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विभागाचा ससेमिरा आमच्या मागे लागण्याचा आरोप नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे. व्हॅटचा कायदा आला त्यावेळी सरळसोप्या पद्धतीने कर भरावा लागणार, असे लहान व्यापाऱ्यांना वाटले होते. पण मानसिक त्रास वाढला. बहुतांश लहान व्यापारी अल्पशिक्षित आणि मातृभाषा जाणणारा आहे. त्यांना मिळणारे नोटीस इंग्रजी भाषेत आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांना सीएंच्या दारात तासन्तास उभे राहावे लागते. एखाद्या पार्टीकडून अथवा कंपनीकडून माल विक्रीसाठी घेतला आणि त्याने व्हॅटचा भरणा केला नाही तर विक्रीकर विभाग सरसकट लहान व्यापाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्याकडून व्हॅटची सक्ती करीत आहेत. ही बाब सत्य आहे की, मोठे व्यापारी किंवा कंपनीकडून माल विकत घेताना लहान व्यापारी व्हॅटचा भरणा आधीच करतात. अशावेळी व्हॅटची दुहेरी सक्ती लहान व्यापाऱ्यांवर का? असा सवाल नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी लोकमतशी बोलताना केला. लहान व्यापाऱ्यांकडे गुन्हेगारांसारखे पाहिले जाते. अनेक व्यापारी शासकीय कार्यालयाचा ससेमिरा नको म्हणून कर्जबाजारी होऊन कायद्यातील त्रुटींना बळी पडून व्हॅटचा दुहेरी भरणा करीत असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. व्यापारी कर देण्यास तयार आहे. पण कायदा सुटसुटीत असावा. व्यापाऱ्यांना मानसिक त्रास होणार नाही आणि त्यांची प्रगती होईल, असा कायदा शासनाने तयार करावा. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लहान व्यापारी बळी पडत असल्याची खंत रक्षक यांनी व्यक्त केली. शासनच नव्हे तर विक्रीकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला समजत नाहीत. कर वसुलीसाठी अधिकारी थेट कायद्यावर बोट ठेवतात. कायदा व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे का, याची शहानिशा करण्याची गरज आहे. मोठ्यांना सोडून लहान व्यापाऱ्यांना फाशी देणे सरकारने सोडून द्यावे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरपराध नागरिकाला शिक्षा होऊ नये, या युक्तीनुसार अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे, अशी मागणी रक्षक यांनी केली. सध्या लहान व्यापारी अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या वसुलीमुळे त्रस्त आहेत. विक्रीकर कार्यालयातून रोज कुणीतरी फोन करतो आणि व्यापाऱ्यांना धमकावतो. त्यामुळे व्यापारी घाबरले आहेत. अधिकाऱ्यांनी सक्तीची कारवाई करू नये, अशी मागणी रक्षक यांनी केली.(प्रतिनिधी)