शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

डबल मर्डर

By admin | Updated: May 1, 2016 02:52 IST

खामला चौक स्थित पराते सभागृहाजवळ दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा सिमेंट कॉँक्रिटच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला.

खामल्यात थरार : जुन्या वादातून खुनाचा संशय नागपूर : खामला चौक स्थित पराते सभागृहाजवळ दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा सिमेंट कॉँक्रिटच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते १.३० वाजताच्या दरम्यान घडली. पहाटे ४ वाजता पोलिसांनी आरोपींना अटक केली. अविनाश सुरेश डे (२४)रा. जुनी वस्ती खामला आणि त्याचा मित्र कुलदीप चंद्रकांत तिवारी (१७) धरमपेठ अशी मृतांची नावे आहेत. तर आरोपींमध्ये आॅरेंज सिटी हॉस्पिटलजवळील दंतेश्वरीनगर झोपडपट्टी खामला येथील जमशेर सरफुद्दीन अंसारी (२२), गणेश राधेश्याम आगरे (२०), सलमान, रहेमान आणि काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. जमशेर व गणेश हे मुख्य आरोपी आहेत. मृत अविनाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो नुकताच तडीपार झाला होता. त्याच्यावर घरफोडी, चोरीसह एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. तसेच कुलदीपवरही ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रकारे खुनाचा मुख्य सूत्रधार जमशेर अंसारी याच्यावरही घरफोडी आणि चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. मृत अविनाश याचे वस्तीतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसापूर्वीच तो त्या मुलीला घेऊन पळाला होता. त्याच्याविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. परंतु तो मुलीसोबत परत आला होता. शुक्रवारी रात्री प्रत्यक्षदर्शीनुसार आरोपींनी अविनाश व त्याचा मित्र कुलदीपला रात्री १२ वाजता पराते सभागृहाजवळ चर्चा करायला बोलावले होते. आरोपी हे कुलदीपला मारण्याच्या उद्देशानेच आले होते. त्यांनी कुलदीपसोबतच वाद सुरू करीत त्याला मारायला सुरुवात केली. अविनाशने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारण्यात आले. अर्धनिर्मित इमारत आश्रयस्थळ नागपूर : खाली पडलेल्या दोघांच्याही डोक्यावर सिमेंट काँक्रिटचा दगड मारून त्यांचा खून केला. मीता डे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. शनिवारी सकाळी ४ वा. आरोपींना ताब्यात घेण्यात आले.खामला येथील पराते हॉलजवळ ज्या ठिकाणी हे दुहेरी हत्याकांड घडले ते स्थळ म्हणजे एक अर्धनिर्मित इमारत होती. ही इमारत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आश्रयस्थान बनली आहे. येथील नागरिकांनी याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. मृत अविनाशसोबत घटनेप्रसंगी त्याची प्रेयसी ही रात्री उशिरापर्यंत होती. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)कुलदीप व जमशेरमध्ये होता वाद डीसीपी शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, कुलदीप व जमशेर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. असे असतानाही कुलदीप जमशेरच्या वस्तीत जाऊन फिरत होता. आरोपी मृताला मारत असताना अविनाशची प्रेयसीसुद्धा घटनास्थळी होती. मारहाण होत असल्याचे पाहून ती अविनाशच्या घरी गेली व त्यांना सांगितले. त्यानंतर अविनाशच्या घरच्यांनी पोलिसांना सूचना दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आल्याबरोबर त्यांनी कुलदीपवर हल्ला केला. ते कुलदीपलाच मारायला आले होते. अविनाशने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारण्यात आले. परंतु खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.पोलीस शोधताहेत कारणे डीसीपी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीत खुनाचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते घरफोडी व चोरीच्या घटनेत सहभागी आहेत. यातून त्यांनी काही गुन्हे सोबत मिळून केले असावेत, त्यातून पैशाची देवाण-घेवाण किंवा तरुणीवरून काही वाद झाला का? याबाबत गांभीर्याने तपास केला जात आहे. एक-दोन दिवसात खरे कारण स्पष्ट होईल.