कामठी : पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात १० दिव्यांग लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, मनीष दिघडे, एस. जी. कातोरे उपस्थित हाेते. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी याेजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांनी त्या याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले असून, लाभार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने सर्वताेपरी मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिथींच्या हस्ते कामठी तालुक्यातील १० लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. संचालन विस्तार अधिकारी अरविंद अतूरकर यांनी केले तर कश्यप सावरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.