नवी दिल्ली: क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याविषयी अ.भा. फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी झुरिच येथील फिफा मुख्यालयात नुकतीच चर्चा केली. दरम्यान पटेल यांनी ब्लाटर यांना २०१७ साली भारतात आयोजित होत असलेल्या १७ वर्षे गटाच्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीची देखील माहिती दिली. यावेळी फिफा महासचिव जेरोम वाल्के आणि संचालक थियरे रेगेनोस हे उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
क्लब फुटबॉल विश्वचषकावर चर्चा -प्रफुल्ल पटेल ब्लाटर यांना भेटले
By admin | Updated: May 9, 2014 01:14 IST