शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी वेगवेगळे धोरण

By admin | Updated: September 9, 2015 03:09 IST

राज्य शासनाच्या एका ‘जीआर’ व परिपत्रकावरून वादाची ठिणगी पडली आहे. शासनाने विमुक्त जाती,

हायकोर्टात याचिका : ‘जीआर’ व परिपत्रकावरून वादाची ठिणगीनागपूर : राज्य शासनाच्या एका ‘जीआर’ व परिपत्रकावरून वादाची ठिणगी पडली आहे. शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये राखीव जागेवर प्रवेश आणि शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप देण्यासाठी वेगवेगळे धोरण अवलंबिले आहे. याविरुद्ध काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती, पण त्यांना दिलासा मिळाला नाही.सध्याच्या धोरणानुसार ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आहे अशा वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविण्याकरिता आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. यासंदर्भात २४ जून २०१३ रोजी ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. या ‘जीआर’द्वारे वार्षिक उत्पन्न मर्यादा ४.५० लाखांवरून ६ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु, ८ जुलै २०१४ रोजीच्या परिपत्रकानुसार अशा विद्यार्थ्यांना फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. या परिपत्रकाद्वारे फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ४.५० लाख रुपये ठरविण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.(प्रतिनिधी)राज्य शासनाची भूमिकाराज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिवांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून धोरणामागची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश देण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविल्यामुळे शासनाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत नाही. परंतु, फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढविल्यास मोठी आर्थिक तरतूद करून ठेवावी लागेल. परिणामी फ्रीशिप/शिष्यवृत्तीसाठी ४.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरविण्यात आली असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.