- लस हेच कवचकुंडल
नागपूर : कोरोना महामारीच्या विरोधातील लढाईत कोरोना लसीकरणास राज्य शासनाच्या पुढाकाराने सुरुवात झाली आहे. यात समाजातील सर्व घटक स्वेच्छेने लसीकरण करवून घेत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातही नामांकित साहित्यिक, नाटककार, कवी आदी लोक लसीकरण करवून घेण्यासोबतच इतरांनाही प्रोत्साहित करत आहेत. संक्रमणाचा वेग प्रचंड वाढतो आहे आणि यात कोण पॉझिटिव्ह हे सांगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत या संकटापासून वाचण्यासाठी लस हेच कवचकुंडल हे सिद्ध झाले आहे. त्याच अनुषंगाने सांस्कृतिक क्षेत्रातील लोक पुढे येत आहेत.
-------------
नरेश गडेकर, प्रभारी अध्यक्ष, अ.भा. मराठी नाट्यपरिषद, मध्यवर्ती
मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ
विलास मानेकर, सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ
वर्षा किडे-कुळकर्णी - कवयित्री
प्रभाकर दुपारे - ज्येष्ठ नाटककार
डॉ. प्रमोद मुनघाटे - मराठी विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ
डॉ. प्रा. रवींद्र शोभणे - ज्येष्ठ साहित्यिक
आचार्य श्रीमती माडखोलकर - नृत्य गुरु (भरतनाट्यम्)
..............