शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

सांघिक प्रयत्नांना प्रभावी प्रचार तंत्राची साथ

By admin | Updated: October 21, 2014 00:52 IST

कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये

संघाच्या मुख्यालयी प्रथमच भाजपचे एकहाती वर्चस्वनागपूर : कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये असलेली नरेंद्र मोदींची क्रेझ या बाबी भाजपच्या शहरातील दणदणीत विजयासाठी कारणीभूत ठरल्या.सामाजिक परिवर्तनाची भूमी आणि कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आलेल्या भाजपच्या भगव्या लाटेत अनेक दिग्गजांचे पानिपत तर झालेच, पण प्रथमच संघाच्या मुख्यालयी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकहाती वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळविले.लोकसभेनंतर विधानसभेतही मिळालेल्या दणदणीत विजयामागे भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे मोठे योगदान आहे. नाही म्हणायला याही पक्षात धुसफूस, गटतट आहेत. पक्ष महापालिकेत सत्तेत असल्याने नागरी सुविधांच्यासंदर्भात लोकांची नाराजीसुद्धा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी पद्धतशील प्रयत्न करण्यात आले. गटतट विसरून कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची किमया गडकरी -फडणवीस आणि त्यांच्यासह इतरही नेत्यांनी करून दाखविली. विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणून भाजप शांत बसला नाही. उलट शहरातील सर्वच्यासर्व जागा जिंकण्यासाठी सहा महिन्यापासून यंत्रणा कामाला लागली. मतदारांच्या नोंदणीपासून ते त्यांना मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. पक्षाचे बलस्थान आणि विरोधकांचे कमकुवत दुवे हेरतानाच शिवसेनेशी तुटलेल्या युतीमुळे होणारे फायदे-तोटेही लक्षात घेण्यात आले. त्यानंतर प्रचाराची व्यूहरचना तयार करण्यात आली. त्याला प्रभावी तंत्राची जोड मिळाली. पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता सर्व आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर राज्यातील नेते, केंद्रीय मंत्री अशा दिग्गजांची फौज प्रचारासाठी राबली. विविध वाहिन्यांवर दिवसभर सुरू असणाऱ्या मोदींच्या भाषणाच्या जाहिरातीही मदतीला होत्याच. या सर्वांचा फायदा भगवी लाट निर्माण होण्यास कारणीभूत झाला. पक्षाच्या काही उमेदवारांना मिळालेली मते आणि त्यांचे मताधिक्य पाहिले तर याची खात्री पटते.निवडणुकीच्यापूर्वी मोदींनी केलेले ‘मेट्रो रेल्वे’सह कोट्यवधी रुपयाच्या रस्ते व पुलाच्या कामाचे भूमिपूजन, एम्ससाठी नागपूरची निवड आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘विकास पुरुष’म्हणून असलेली प्रतिमा तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदासाठी आलेले नाव आणि तरुणांमध्ये असलेली मोदींची क्रेझ याचाही फायदा भाजपला झाला. लोकसभेप्रमाणे उघडरीत्या नसले तरी संघ स्वंयसेवकांची फळीही सक्रिय होती. या उलट स्थिती प्रतिस्पर्धी पक्षाची होती. शिवसेना, राष्ट्रवादीची शक्तीच नव्हती आणि कॉंग्रेस सुस्त होती. ही बाबही भाजपच्या पत्थ्यावर पडली.(प्रतिनिधी)