शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

कॉलेज सुरू, निकाल अडले!

By admin | Updated: July 2, 2015 03:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

कुलगुरूंचे आश्वासन हवेतच विरले : अंतिम वर्षाचे निकाल नाहीचनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल दोन ते तीन दिवसांत लावण्यात येतील, असे आश्वासन सुमारे आठवडाभराअगोदर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले होते. परंतु अद्यापदेखील विद्यापीठाचे निकाल लागलेले नसून विद्यापीठाकडून महाविद्यालयांवर याचे खापर फोडण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी उन्हाळी परीक्षांच्या निकालांची गाडी अतिशय संथ वेगाने सुरू आहे. मागील मंगळवारी यासंदर्भात परीक्षा विभागात बैठक झाली. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नसल्याची बाब समोर आली. कमीतकमी अंतिम वर्षाचे निकाल परीक्षा विभागाने लवकरात लवकर लावावेत व ज्यांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आलेले नाहीत त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवावेत, असे निर्देश कुलगुरूंनी दिले होते. अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कला व वाणिज्यच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु आठवडा उलटूनही अंतिम वर्षांचे निकाल अद्याप लागले नाहीत. (प्रतिनिधी)ही कुठली समाधानकारक स्थिती९५६ पैकी अवघ्या २५० परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. परीक्षा विभाग कोलमडलेला असताना कुलगुरू मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. मागील आठवड्यात त्यांना याबाबत विचारणा केली असता निकालाची स्थिती समाधानकारक असून, जाहीर झालेल्यांपैकी ७५ टक्के निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेले असताना कुलगुरूंना ही स्थिती समाधानकारक कशी वाटते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.उच्च शिक्षणाची संधी जाण्याची भीतीअंतिम वर्षांच्या अनेक विद्यार्थ्यांना बाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत निकालच लागले नाही तर प्रवेशाची संधी जाते की काय अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. निकाल लवकर लावण्याचे दावे दरवेळा करण्यात येतात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच का होत नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.