शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

विदर्भाला कॅन्सरचा विळखा

By admin | Updated: December 7, 2015 06:24 IST

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली असता नागपुरात एका लाख लोकसंख्येमागे

 दीड वर्षानंतरही ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’चा पत्ता नाही : ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ कधी होणार ?सुमेध वाघमारे ल्ल नागपूरनुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली असता नागपुरात एका लाख लोकसंख्येमागे ९४ महिला तर ८१ पुरुष कॅन्सरने पीडित आहेत, तर मुंबईत हेच प्रमाण ९३ महिला तर ७१ पुरुष असे आहे, असे असतानाही नागपूरला डावलून मुंबईच्या केईएम रुग्णालयाला ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ मिळाले, तर नागपुरला ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ दिले. याची घोषणा होऊन दीड वर्ष झाले, मात्र, या सेंटरच्या प्रस्तावित जागेचा अद्यापही पत्ता नाही. विदर्भात वाढते कॅन्सरचे रुग्ण, उपलब्ध सोयी आणि नागपूर मेडिकलवर विदर्भासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश आणि झारखंडमधून येणाऱ्या कॅन्सर रुग्णांचा भार पाहता ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ऐवजी ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक तिसरा लागतो. अन्ननलिका, तोंडाच्या व इतर प्रकारातील कॅन्सरमध्ये राज्यात नागपूर पहिला क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे १० हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची नोंद होते. उपराजधानीत मेडिकलमध्येच नाहीतर खासगी इस्पितळांमध्येही कॅन्सर रु ग्णांची संख्या वाढत आहे. यातील साधारण ६० टक्के रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु येथील कर्करोग विभाग मरणासन्न अवस्थेत आहे. विदर्भावर अन्याय४याच दरम्यान केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशात वाढत्या कॅन्सर रुग्णांसाठी २० राज्यांमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ४९ ठिकाणी‘सर्जरी कॅन्सर केअर’ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यात विदर्भावर अन्याय झाला. नागपूरच्या मेडिकलला डावलून मुंबईच्या केईएम रुग्णालयाला कॅन्सर इन्स्टिट्यूट दिले, तर नागपूरला ४५ कोटीचे ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ मिळाले. मात्र, अद्यापही या सेंटरचे कार्य थंडबस्त्यात आहे. मेडिकलमध्ये कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’पेक्षा ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. नाहीतर लाखामागे २२९ महिला तर १८२ पुरुषांना कॅन्सर४राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून त्यात वाढ होत आहे. या शहरांमधील वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास केला तर नागपूरची स्थिती भयावह आहे. केंद्राने अलीकडेच देशातील आरोग्यसंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरु ष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.