शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर इन्स्टिट्यूट रखडणार!

By admin | Updated: June 13, 2017 02:00 IST

सामाजिक न्याय विभागाच्या १२० कोटींच्या निधीमधून मेडिकलमध्ये ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ साकारण्यात येणार होते.

मेडिकल : सामाजिक न्याय विभागाचा निधी खर्च करणे नियमबाह्यलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या १२० कोटींच्या निधीमधून मेडिकलमध्ये ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ साकारण्यात येणार होते. परंतु त्यासाठी अनुसूचित जाती (एसटी) व अनुसूचित जमातीतील (एससी) रुग्णांना या इन्स्टिट्यूटमध्ये विशेष सोईसवलती उपलब्ध करून देण्याची अट होती. याला घेऊन नुकत्याच झालेल्या सचिवस्तरावरील बैठकीत अशी आग्रही भूमिका न घेता मेडिकलने नव्याने प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठवावा, असा निर्णय घेण्यात आला. परिणामी, कॅन्सर इन्स्टिट्यूट रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनदरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत १२० कोटी रुपयांच्या मदतीने मेडिकलमध्ये ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ सुरू केले जाईल अशी घोषणा केली होती. घोषणेनंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात (डीएमईआर) बैठकाही पार पडल्या. मेडिकल प्रशासनाने कॅन्सर इन्स्टिट्यूट संदर्भातील प्रस्ताव नव्याने पाठविले. यात ‘ई-लायब्ररी’च्या पाठीमागील धोबीघाटाच्या परिसरातील चार एकर जागेवर हे कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रस्तावित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात तळमजल्यासह पहिला मजल्याच्या इमारतीचे बांधकाम होणार होते. यात रेडिओथेरपी विभाग होणार होता. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या मजल्यावर सर्जरी आॅन्कोलॉजी व तिसऱ्या टप्प्यात मेडिकल आॅन्कोलॉजी होणार होते. बांधकामासोबतच रुग्णाच्या उपचारासाठी दोन ‘लिनीअर एक्सीलेटर’, एक ‘कोबाल्ट’, एक ‘ब्रॅकीथेरपी’ व ‘सीटी सेम्युलेटर’ उपकरणांचा समावेश होता. परंतु सामाजिक न्याय विभागाने पुढील दहा वर्षांसाठी एसटी व एससीसाठी रुग्णांना या इन्स्टिट्यूटमध्ये विशेष सोईसवलती उपलब्ध करून देण्याची अट घातली. याला घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सामाजिक न्याय विभाग व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवस्तरावर बैठक झाली. या बैठकीचे ‘कार्यवृत्त’ नुकतेच मेडिकलला प्राप्त झाले. यात हे नियमात बसत नसल्याचे सांगून सामाजिक न्याय विभागाच्या निधीसाठी आग्रही भूमिका न घेता डीएमईआरला नव्याने प्रस्ताव सादर करावा, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.पीजीच्या जागाही धोक्यातमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमसीआय) विभागात अद्यावत उपकरण उपलब्ध करण्याच्या अटीवर रेडिओथेरपीच्या पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाला दोन जागा दिल्या आहेत. याला आज दोन वर्षे होत आहेत. तीन वर्षानंतर पुन्हा ‘एमसीआय’चे निरीक्षण होणार आहे. तो पर्यंत, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध न झाल्यास पीजीच्या या जागा जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.