शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

- तर नाकारले जाऊ शकते याकूबच्या मृतदेहाचे हस्तांतरण

By admin | Updated: July 24, 2015 02:40 IST

अंत्यसंस्कार करताना सार्वजनिक प्रदर्शन होण्याची शक्यता वाटल्यास किंवा तशी गुप्त माहिती मिळाल्यास याकूब मेमनच्या मृतदेहाचे त्याच्या नातेवाईकांना हस्तांतरण नाकारले जाऊ शकते.

कारागृह अधीक्षकांना पूर्ण अधिकार : नातेवाईकांकडून सार्वजनिक प्रदर्शन नकोराकेश घानोडे नागपूरअंत्यसंस्कार करताना सार्वजनिक प्रदर्शन होण्याची शक्यता वाटल्यास किंवा तशी गुप्त माहिती मिळाल्यास याकूब मेमनच्या मृतदेहाचे त्याच्या नातेवाईकांना हस्तांतरण नाकारले जाऊ शकते. यासंदर्भात कारागृह अधीक्षकांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. कारागृह नियमावलीनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर कैद्याच्या मृतदेहावर त्याच्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. कैद्याच्या नातेवाईकांना स्वत: अंत्यसंस्कार करायचे असतील तर, त्यांना तसा लेखी अर्ज कारागृह अधीक्षकाला सादर करावा लागतो. कारागृह अधीक्षक स्वत:च्या अधिकारक्षेत्राखाली हा अर्ज मंजूर करू शकतात. परंतु, त्यापूर्वी कैद्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक प्रदर्शन करणार नाही असे हमीपत्र नातेवाईकांकडून लिहून घेण्यात येते. यानंतरही सार्वजनिक प्रदर्शन होत असल्याचे आढळल्यास कारागृह अधीक्षक हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून परिस्थितीनुसार स्वत: अंत्यसंस्काराची तयारी करू शकतात. याप्रसंगी कारागृह अधीक्षकांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्य करावे लागते. कोण राहू शकतो उपस्थित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना कारागृह अधीक्षक, उप-अधीक्षक, सहायक अधीक्षक, जिल्हा दंडाधिकाऱ्यांद्वारे नियुक्त कार्यकारी दंडाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहू शकतात. कैद्याची इच्छा असल्यास त्याच्या धर्माच्या प्रार्थनागुरूला सुरक्षा, कारागृहातील शिस्त व इतर बाबींच्या अधीन राहून उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. वर्तमानात संशोधन करीत असलेले शास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आदींनाही उपस्थित राहण्याची परवानगी कारागृह अधीक्षकांकडून मिळू शकते. परंतु, कैद्याचे नातेवाईक व अन्य कोणत्याही सामान्य व्यक्तींना उपस्थित राहण्याची नियमानुसार परवानगी देता येत नाही. फाशी देताना किमान दहा पोलीस कॉन्स्टेबल व दोन हेडकॉन्स्टेबल किंवा तेवढ्याच संख्येत सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात ठेवणे आवश्यक आहे. काय केले जाते फाशी देण्यापूर्वीकारागृह अधीक्षक, कार्यकारी दंडाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कारागृह उपअधीक्षक यांना फाशी देण्याच्या एक तासापूर्वी कैद्याला त्याच्या सेलमध्ये जाऊन भेटावे लागते. यानंतर कारागृह अधीक्षक व कार्यकारी दंडाधिकारी हे कैद्याला त्याच्या मातृभाषेत वॉरंट वाचून दाखवतात. दरम्यान, कैद्याचे हात पाठीच्या मागे बांधून ठेवले जातात. फाशीच्या स्तंभावर प्रवेश करण्यापूर्वीच कैद्याच्या चेहऱ्यावर कापडी पिशवी टाकण्यात येते. कैद्याला फाशीचा स्तंभ पाहू देऊ नये असे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. फाशीचा दोर बांधला असतो त्या बिमच्या अगदी खाली कैद्याला उभे केले जाते. त्यावेळीही कैद्याचे हात पाठीमागे घट्ट बांधलेले असतात. यानंतर कैद्याच्या गळ्याभोवती गळफास घट्ट बसवला जातो. कारागृह अधीक्षक गळफास योग्य पद्धतीने बसविल्याची व गाठ योग्य ठिकाणी असल्याची तपासणी करतात. ही सर्व प्रक्रिया एकाचवेळी व लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारागृह अधीक्षक फाशी देण्याचा इशारा करतात व हा इशारा पाहून फाशी देणारा कैद्याच्या पायाखालचे दार उघडण्याचा खटका ओढतो. फाशी देणाऱ्याला आवश्यक शुल्क देण्याची सूचना नियमात करण्यात आली आहे.अशी केली जाते फाशीची तयारीफाशीची तारीख निश्चित झाल्यानंतर कार्यकारी अभियंत्याला फाशीच्या स्तंभाचे प्रत्येक तीन दिवसांनी व फाशी देण्याच्या आदल्या सायंकाळी निरीक्षण करावे लागते. तसेच,कारागृह अधीक्षकाच्या सूचनेनुसारही निरीक्षणास जावे लागते. याप्रसंगी कारागृह अधीक्षक स्वत: उपस्थित असतात. या व्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी अधीक्षकांची असते. प्रत्येक फाशीकरिता नवीन दोराची गरज नाही पण, अधीक्षकाने जुन्या दोराची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. फाशीपूर्वी कैद्याच्या वजनापेक्षा दीडपट जास्त वजनाची डमी किंवा रेतीची बॅग लटकवून सहा ते आठ फुटावरून खाली सोडून प्रात्याक्षिक केले जाते. आकस्मिक प्रसंगाला तोंड देण्यासाठी दोन दोर अतिरिक्त ठेवावे असे नियमात सांगण्यात आले आहे. दोराच्या फाशाला लोणी किंवा मेण लावले जाते. अंतिम तपासणीनंतर दोर व इतर साहित्य स्टिल पेटीत सुरक्षित कुलुपबंद करण्यात येते. या पेटीचा ताबा उपअधीक्षकांकडे असतो.१ फाशीचा दोर कापसाचे सूत किंवा मनिलापासून तयार केला जातो. हा दोर १ ते १.५ इंचींचा किंवा २.५९ ते ३.८१ सेंटिमीटर व्यासाचा असतो.२फाशीची तारीख निश्चित झाल्यानंतर फाशीची वेळ ठरविण्याचा अधिकार कारागृह अधीक्षकांना आहे. काही दिवस आधीच वेळ निश्चित करून त्याची माहिती कारागृह महानिरीक्षक, सत्र न्यायाधीश व शासनाला द्यावी लागते. फाशीस्थळाच्या सभोवताल कुंपण किंवा भिंत असणे आवश्यक आहे.३ कैद्याला पहाटे (उजाडण्यापूर्वी) फाशी द्यावी असे कारागृह नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. फाशी दिल्यानंतर कैद्याचा मृतदेह पूर्ण पावित्र्य जपून कारागृहाच्या बाहेर आणणे आवश्यक आहे. मनपाची शववाहिनी किंवा रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कार स्थळापर्यंत घेऊन जावा लागतो. याचा सर्व खर्च कारागृह अधीक्षकाने उचलणे अपेक्षित आहे.४ फाशी दिल्यानंतर कारागृह अधीक्षक हे वैद्यकीय अधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांची डेथ वॉरंटवर स्वाक्षरी घेऊन तो वॉरंट संबंधित न्यायालयाला परत पाठवतात. तसेच, कारागृह महानिरीक्षकांना फाशीच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करतात.५ फाशी दिल्यानंतर कैद्याला अर्धा तास लटकलेल्या अवस्थेत ठेवले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राण गेल्याचे प्रमाणित केल्यानंतरच मृतदेह खाली उतरवला जातो. फाशीची अंमलबजावणी सुरू असताना सर्व गटातील कैद्यांना कुलूपबंद खोलीत ठेवण्यात येते.