शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकाची ३५० लोकांना रक्ताची मदत

By admin | Updated: June 14, 2016 02:23 IST

त्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते.

 घनश्याम चकोलेंचा आदर्श : ग्रामीण भागात उभी केली रक्तदानाची चळवळसुमेध वाघमारे ल्ल नागपूरत्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते. रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्याच्या मनात होती. स्वत: रक्त न देता मित्रांची मदत घेतली. मित्रांनी कुठलेही आढेवेढे न घेता सहज रक्त दिले. पत्नी वाचली. एक गोंडस बाळ त्याच्या कुशीत होते. मात्र डोक्यात काहूर माजला होता. ते रक्त देऊ शकतात, मी का नाही?. याच प्रश्नातून त्याने नंतर रक्तदानाची चळवळ उभी केली. त्याने आपल्या आॅटोवर स्वत:चा मोबाईल नंबर लिहून रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आवाहनच केले. आतापर्यंत ३५० लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याने रक्ताची मदत केली.माणुसकीच्या भूमिकेतून मोठे कर्तव्य पार पाडणाऱ्या या आॅटोचालकाचे नाव घनश्याम चकोले. कामठी अजनी येथील गोदा या गावात तो राहतो. ३८ वर्षीय घनश्याम प्रवाशांना घेऊन नेहमीच नागपूर-कामठी रहदारी करीत असतो. बर्डीवर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असताना त्याला बोलते केल्यावर त्याने वरील आपबिती सांगितली. जे रुग्ण रक्ताविना तडफडत असतात, त्यावेळी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूत नसतो तर प्रत्यक्ष देवच असतो. रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या. मात्र, विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. आजही रक्तदानाला पर्याय नाही. म्हणूनच घनश्यामसारखे रक्तदाते ‘हिरो’ ठरतात.संकोच नको म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधलेघनश्याम म्हणाला, त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत पोहचविली. स्वत: १९ वेळा रक्तदान केले. ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली. रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले. आतापर्यंत २२ शिबिरे घेतली. यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रक्तपेढ्यांना दिले. रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोहचावी म्हणून आॅटोवर मोबाईल क्रमांक लिहिला. मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधले. कुणाकडूनही कशाची मदतीची अपेक्षा न करता हे कार्य सुरू आहे. परंतु आजही रक्तदानाबद्दल विशेषत: ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे. रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत. दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास ‘रिप्लेसमेंट’ची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहनही त्याने केले.