नागपूर : युवतीवरून झालेल्या वादात गंगा जमुना वस्तीत एका गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना २६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. फैजान शेख अनवर शेख (२१) रा. बालाजी मंदिर, गंगा जमुना असे जखमीचे नाव आहे. फैजानविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. तो मंगळवारी सायंकाळी गंगा-जमुना वस्तीत उभा होता. त्याच वेळी हर्ष अनिल यादव (२१) आपल्या दोन साथीदारांसह तिथे आला. गंगा-जमुनातील एका युवतीवरून त्याचा वाद झाला. दरम्यान, आरोपींनी फैजानवर चाकूने हल्ला केला. पोटावर वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या विचारपूस दरम्यान फैजानने सांगितले की, आरोपींनी त्याला तू कोण आहेत, इथे काय करतो, असे म्हणत हल्ला केला. लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
युवतीच्या वादात हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST