केळवद : सावनेर तालुक्यातील केळवद-ढालगाव खैरी मार्गाच्या दुरुस्ती व डांबरीकरणाला नऊ महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली. हे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे रहदारीस अडचणी येत असून, या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
या मार्गाच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावनेर कार्यालयाच्या देखरेखीखाली केले जात आहे. दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने या मार्गाच्या दाेन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात खाेदकाम केले आहे. त्यामुळे केळवद, आष्टी, हत्तीसर्रा, ढालगाव खैरी यासह अन्य गावांमधील नागरिकांना रहदारीदरम्यान विविध अडचणी येत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे.
राेडलगत केलेल्या खाेदकामातील मातीचा वावर पुन्हा या राेडच्या दुरुस्तीसाठी केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. या कामाचा दर्जा सुमार असल्याने त्यात घाेळ करण्यात आल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, या मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच गुण नियंत्रण कार्यालयाकडून या कामाचा दर्जा तपासून द्यावा, अशी मागणी रमेश नखाते, राजेंद्र बावनकर, संदीप डांगाेरे, गाेलू ढाेले, सागर ढाेबळे यांच्यासह नागरिकांनी केली.
...
विना परवानगी वृक्षताेड
या राेडच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने राेडच्या दाेन्ही बाजूला असलेली झाडे विना परवानगी ताेडल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. या राेडलगत केळवद ग्रामपंचायत प्रशासनाने आठ वर्षापूर्वी वृक्षाराेपण कार्यक्रमांतर्गत झाडे लावली हाेती. ती झाडे ताेडण्यात आली आहेत. ही वृक्षताेड कुणाच्या परवानगीने करण्यात आली, असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.