शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

अंकित कन्स्ट्रक्शनची चौकशी

By admin | Updated: July 10, 2014 00:47 IST

किशोर कन्हेरे यांच्या अंकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरव्यवहाराची नव्याने चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्टात शासनाचे प्रतिज्ञापत्र : तीन आठवड्यांत देणार अहवालनागपूर : किशोर कन्हेरे यांच्या अंकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरव्यवहाराची नव्याने चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने आज, बुधवारी तीन आठवड्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावरील पुढील सुनावणी ३० जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.यापूर्वी शासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर अंकित कंस्ट्रक्शन कंपनीला १ वर्षासाठी वर्ग-१-अ दर्जावरून वर्ग-१-ब मध्ये अवनत केले होते. तसेच, कंपनीच्या इतर चालू कामाच्या देयकातून नुकसान भरपाई वसुल करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव वि. दि. सरदेशमुख यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली होती. न्यायालयाने या कारवाईवर असमाधान व्यक्त करून शासनाला कडक शब्दांत फटकारले होते. राजकीय दबावामुळे अंकित कंस्ट्रक्शनला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, अवर सचिव वि. दि. सरदेशमुख, उपसचिव आर. जी. गाडगे, सचिव एस. के. मुखर्जी व कक्ष अधिकारी पी. जी. वंजारी यांना कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने अंकित कंस्ट्रक्शनवरील कारवाई रद्द करून कायद्यानुसार नव्याने चौकशी व कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने अंकित कंस्ट्रक्शनलाही प्रतिवादी करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने अद्याप प्रतिज्ञापत्र सादर करून बाजू मांडलेली नाही. याशिवाय न्यायालयाने अंतरिम आदेशामध्ये अंकित कंस्ट्रक्शनला कोणतेही नवीन कंत्राट देण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागात २००७ ते २०१० या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांची मध्यस्थी याचिका आहे. सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागात ११९.५४ कोटी रुपयांचा घोटाळा करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित जोशी, तर मध्यस्थातर्फे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)