शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

गँगवारच्या दहशतीत अजनी!

By admin | Updated: July 10, 2014 00:51 IST

अजनी ही रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत. पूर्वी या वसाहतीच्या संरक्षणासाठी गणेशपेठ पोलीस ठाण्याची अजनी ही चौकी होती. त्याकाळी अजनी भागात रेल्वे वॅगन फोडण्यावरून टोळीयुद्ध व्हायचे.

नवीन टोळ््यांचे अधिराज्य : गुन्हे वाढले, मनुष्यबळ घटलेमंगेश व्यवहारे - नागपूरनागपूर : अजनी ही रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत. पूर्वी या वसाहतीच्या संरक्षणासाठी गणेशपेठ पोलीस ठाण्याची अजनी ही चौकी होती. त्याकाळी अजनी भागात रेल्वे वॅगन फोडण्यावरून टोळीयुद्ध व्हायचे. कोळशाची हेराफेरी मोठ्या प्रमाणात चालत होती. रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे अवैध दारू आणि जुगारांचे अड्डे फोफावले होते आणि या अवैध व्यवसायातूनच गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या. निक्सू, संमतसारख्या गँगस्टरने त्याकाळी आपली दहशत निर्माण केली होती. आज ते नाहीत, मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काही नवीन टोळ्या तयार झाल्या आहेत. आजही गँगवारची दहशत कायम आहे. गँगस्टरच्या टोळ्यांची वाटचाल सध्याच्या डीसीपी झोन चार कार्यालयात पूर्वी अजनीचे पोलीस ठाणे होते. त्याकाळी पोलीस ठाण्याच्या व्याप फार जास्त नव्हता. पुढे हळूहळू वस्त्या वाढल्या, गुन्हेगारी वाढली आणि पोलीस ठाण्याचा व्यापही वाढला. त्यामुळे १९८९ ला वंजारी नगर रोडवर हे पोलीस ठाणे हलविण्यात आले. अजनी पोलीस ठाण्याच्या निर्मिती पूर्वीपासून कुख्यात गुंडांच्या टोळ्यांची दहशत येथे राहिली आहे. अजनी भागात कुख्यात निक्सू फत्तेसिंग राठोड, संमद, पापा पाल आणि नर्मद चौधरी यांचे साम्राज्य होते. ठाण्याच्या हद्दीतील नवीन बाभूळखेडा भागातील परदेशी मोहल्ला आता चौधरी मोहल्ला या नावाने प्रसिद्ध आहे. १९६० ते ७० या काळात नर्मद ऊर्फ बुक्का हरिदास चौधरी याच्या दारूच्या भट्ट्या होत्या. नर्मद चौधरी आणि श्यामलाल या टोळ्यांची या भागात दहशत होती. नर्मदच्या अड्ड्यावर शहरभरातील गुन्हेगार आश्रय घ्यायचे. नर्मदच्या टोळीने एका फौजदाराचाही खून केला होता. नर्मदनेच ‘टोली’ या नावाने प्रसिद्ध वस्ती वसविली होती. नर्मदच्या नंतर दिलीप जोग्या, मनोज तिवारी, अमर धनविजय, या गुंडांची दहशत राहिली. त्यानंतर कुख्यात मनोज खांडेकर, इंदिरानगरातील रॉकी, गिजऱ्या लोणारे, बाळू मंडपे, प्रदीप भोयर या गुंडांनीही आपली दहशत पसरविली. सध्या अमर लोहकरे, नयन चिंतलवार यांच्या टोळ्या आहेत. ठाण्याचे क्षेत्र आठ चौरस किलोमीटरच्या वरअजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्याने सध्या या ठाण्याचे क्षेत्र आठ चौरस किलोमीटरच्या वर आहे. अंदाजे लोकसंख्या ३.५० लाखावर आहे. मेडिकल चौक, अजनी रेल्वे लाईन, नरेंद्रनगर, बेसा नाला, बेसा रोड, मानेवाडा सिमेंट रोड, क्रीडा चौक असे या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र आहे. या ठाण्याच्या मेडिकल, शताब्दी चौक, बालाजीनगर व सिद्धेश्वर हॉलजवळ चौकी आहे. ठाण्याच्या हद्दीतील जोगीनगर, शताब्दीनगर, कौशल्यानगर, विश्वकर्मानगर, कुकडे ले-आऊट, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, टोली हा भाग अतिसंवेदनशील समजला जातो. पुतळे व धार्मिक स्थळे या ठाण्याच्या क्षेत्रात धार्मिक स्थळे आणि पुतळे बऱ्याच प्रमाणात आहे. ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांच्या विटंबनेच्या वादाचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले आहे. ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २९ मंदिर, १५ चर्च, ३ मस्जिद, २ मदरसे व २१ पुतळे आहेत. तर ५ झोपडपट्ट्या आहेत. आशियातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल येथे आहे. मनुष्यबळाचा अभावपोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ३५०० ते ४००० लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी आहे. सध्या ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, ३० महिला पोलीस कर्मचारी, १०० पोलीस कॉन्स्टेबल असा एकूण १४५ पोलिसांचा स्टाफ आहे. प्रत्यक्ष मंजूर पदे लक्षात घेता, हे मनुष्यबळ अपुरे आहे.