रेल्वे मेन्सचा माजी विद्यार्थी अनिकेत कुत्तरमारे याने या माेहिमेबाबत माहिती दिली. येत्या रविवारी रेल्वे मेन्स शाळेजवळ या माेहिमेचा शुभारंभ करण्यात येत आहे. विविध पाेस्ट ऑफिसमधून पाेस्टकार्ड खरेदी करून शंभरावर तरुण कार्यकर्ते शाळेजवळ गाेळा हाेतील. त्यानंतर लाेकांना जागृत करून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे पत्र गडकरी यांच्या पत्त्यावर पाठविले जाणार असल्याचे अनिकेतने स्पष्ट केले. अजनी रेल्वे काॅलनी परिसरातील वनसंपदेमुळेच दक्षिण नागपूरचे पर्यावरण चांगले राहिले आहे. त्यामुळे इंटर माॅडेल स्टेशनसाठी परिसरातील हजाराे झाडांची कत्तल थांबवावी, अशी मागणी त्या पत्रात असेल. शिवाय रेल्वे मेन्स शाळा या भागातील वस्त्यांमधील गरीब मुलांच्या शिक्षणाचा आधार असल्याने ट्रान्सपाेर्ट हबच्या प्लॅनमधून ही शाळा वगळण्यात यावी, अशी मागणीही त्यांना करण्यात येणार असल्याचे अनिकेतने स्पष्ट केले.
अजनी काॅलनीला द्यावा हेरिटेजचा दर्जा
१०० वर्षापूर्वी उभारलेल्या रेल्वे काॅलनी परिसराला ऐतिहासिक वारसा म्हणून दर्जा मिळावा, अशी मागणी माजी नगरसेवक व काॅंग्रेस विचार जनजागृती अभियानाचे सदस्य तनवीर अहमद यांनी केली आहे. १९२५ साली स्थापित नागपूर रेल्वे स्थानकाला हेरीटेजचा दर्जा देण्यात आला आहे, मात्र त्याच्याशी संबंधित अजनी काॅलनीला वगळण्यात आले आहे. त्यामुळे हेरीटेजचा दर्जा देण्यात यावा म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात ॲड. अशाेक यावले, ॲड. शिरीष तिवारी, ॲड. अमिन दुपारे, राजेश कुंभलकर, बाबा कुर्हाडे, सुनील अगरवाल, मनाेज काळे, कुवर मेहराेलिया, हेमंत चाैधरी, विठ्ठलराव पुनसे, केतन ठाकूर, साेहन पटेल, शरद बाहेकर, संजय शिंदे, आनंदसिंग ठाकूर, शाम बागुल, राजू जीवने, भीमराव हाडके, राजू मिश्रा, नसीम अनवर, किसन निखारे, भीमराव लांजेवार, दामाेधर धर्माळे, सुरेश बाबुळकर, शामसुंदर आष्टीकर आदींचा सहभाग हाेता.