शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

१०० रुपयांसाठी दोघांचा खून

By admin | Updated: April 22, 2016 04:46 IST

जेवणासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरू युवकाने दोघांचा निघृन खून केला. अर्ध्या तासाच्या आत हे

नागपूर : जेवणासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरू युवकाने दोघांचा निघृन खून केला. अर्ध्या तासाच्या आत हे दोन्ही खून करण्यात आले. ही घटना अमरावती रोडवरील वाडी येथे घडली. माथेफिरू आरोपीला पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर ऊर्फ नाना बंडू राठोड (२४) रा. पुसागोंदी, मोठा तांडा, ता. काटोल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शामराव वामनराव खाडे (४७), रा. शिवाजीनगर, दखने मोहल्ला, वाडी व ओम अमृत गिरी (३५), रा. सहकारनगर, बुलडाणा अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या एका प्रकरणात त्याला शिक्षाही झाली आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी डीआयजी रंजन कुमार शर्मा आणि झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांनी घटनेची माहिती दिली. बलकवडे यांनी सांगितले की, बुधवारी रात्री १.३० वाजता वाडी नाक्यावरील पेट्रोल पंपासमोरील मंदिराजवळ श्यामराव खाडे यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर काठीने वार केल्यानंतर चेहरा दगडाने ठेचला होता. मृतदेहाजवळच काठी पडलेली होती. मृतदेहाची अवस्था पाहून काही वेळापूर्वीच खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीचा शोध घेत असतानाच पेट्रोल पंपापासून ७०० मीटर अंतरावर ओम गिरी नावाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचेही डोके दगडाने ठेचलेले होते. एकाच रात्री दोघांचा दगडाने ठेचून खून झाल्याने पोलीसही हादरून गेले. पोलिसांनी कॉम्बिंग आपरेशन राबविले. रस्त्यावर फिरणाऱ्या नशेखोरांना पकडणे सुरू केले. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पकडून आणले. आरोपीचा शोध घेत असतानाच आरोपी ज्ञानेश्वर हा एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झोपलेला दिसून आला. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते.सराईत गुन्हेगार : ज्ञानेश्वर राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात काही पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो रात्री बेरात्री कुठेही फिरत असून, चोरी व घरफोड्या करतो. एवढेच नव्हे तर, नागरिकांना विनाकारण धमकावणे, त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही त्याने केले आहेत. त्यामुळे त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा पूर्ण करून तो महिनाभरापूर्वी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्याकडून अन्य गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सायको प्रोफाईलचा शोधपोलीस ज्ञानेश्वरच्या वैद्यकीय तपासणीसोबतच सायको प्रोफाईलची तपासणीही करणार आहे. या माध्यमातून त्याच्या मानसिक अवस्थेचा पत्ता लावण्यात येईल. प्राथमिक तपासात तो रागीट स्वभावाचा गुन्हेगार असल्याचे दिसून येते. १०० रुपये दिले नाही म्हणून त्याने दोन्ही खून केल्याचे सांगत आहे. परंतु सखोल तपास केला असता लुटपाट करताना विरोध केला म्हणूनच खून झाल्याचे आढळून येते.