नागपूर : कोरोनाचा वेग आणखी कमी झाला आहे. मागील चार दिवसांपासून २०० ते २५० दरम्यान दैनंदिनी बाधितांची नोंद होत आहे. गुरुवारी २५५ पॉझिटिव्ह व ४ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १३५१८२ झाली असून, मृतांची संख्या ४१८२वर पोहोचली. २३१ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाºया रुग्णांचे प्रमाण ९४.५९ टक्क्यांवर गेले आहे.
नागपूर जिल्ह्यात आज ४२०५ चाचण्या झाल्या. यात ३५२७ आरटीपीसीआर, तर ६७८ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून २१४ ते अँटिजेनमधून ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये शहरातील २१७, ग्रामीणमधील ३६, तर जिल्हाबाहेरील दोन रुग्ण आहेत. मृतांमध्ये पुन्हा एकदा ग्रामीण भागात शून्य मृत्यूची नोंद झाली. शहरात व जिल्हाबाहेर प्रत्येकी दोन रुग्णांचे मृत्यू झाले. सध्या ३१३२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ८२८ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती, तर २३०४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत १२७८६८ रुग्ण बरे झाले आहेत.
दहा लाखांवर चाचण्या
नागपूर जिल्ह्यात या ११ महिन्यांच्या काळात १०७९६४८ चाचण्या झाल्या. यात ६,९६,४२७ आरटीपीसीआर, तर ३,८३,२२१ रॅपिड अँटिजेन चाचण्या आहेत. एकूण चाचण्यांमध्ये शहरात ८,२४,५८६ व ग्रामीण भागात २,३५,०६२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
-दैनिक संशयित : ४,२०५
-बाधित रुग्ण : १,३५,१८२ -
बरे झालेले : १,२७,८६८
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,१३२
- मृत्यू : ४,१८२