टाईमपास 3 ची वाट पाहात असाल तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:38 PM2021-03-20T15:38:35+5:302021-03-20T15:41:10+5:30

टाईमपास आणि टाईमपास 2 या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना टाईमपास 3 पाहायला मिळणार आहे.

Hruta Durgule and Prathamesh Parab starer timepass 3 98% shooting is finished said director ravi jadhav | टाईमपास 3 ची वाट पाहात असाल तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

टाईमपास 3 ची वाट पाहात असाल तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

googlenewsNext
ठळक मुद्देटाईमपास 3 या चित्रपटाचे 98 टक्के शूट संपले असून रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला प्रथमेश परबला देखील पाहायला मिळत आहे.

केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाईमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर प्रेक्षकांना काही वर्षांनी टाईमपास २ हा चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच प्रियदर्शन आणि प्रियाच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती.

टाईमपास आणि टाईमपास 2 या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना टाईमपास 3 पाहायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर करत या चित्रपटाविषयी सांगितले होते. आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज आहे. टाईमपास 3 या चित्रपटाचे 98 टक्के शूट संपले असून रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला प्रथमेश परबला देखील पाहायला मिळत आहे. रवी जाधव यांनी या फोटोसोबत लिहिले आहे की, 98 टक्के शूट वेळेत पार पडलं.... 

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे.

Web Title: Hruta Durgule and Prathamesh Parab starer timepass 3 98% shooting is finished said director ravi jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.