शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अक्कू यादवचा खात्मा झाला, तेव्हा..

By admin | Updated: March 23, 2015 19:47 IST

कस्तुरबानगर येथील पन्नास-साठ स्त्री-पुरुषांचा जमाव जिल्हा न्यायालयातील दगडी इमारतीच्या उत्तर दिशेकडील भागात जमला होता.

राहुल अवसरे
 
शुक्रवार 13 ऑगस्ट 2004. दुपारी अडीचच्या सुमारास उत्तर नागपुरातील श्रमिकांची वस्ती कस्तुरबानगर येथील पन्नास-साठ स्त्री-पुरुषांचा जमाव जिल्हा न्यायालयातील दगडी इमारतीच्या उत्तर दिशेकडील भागात जमला होता. लोक घोळक्या-घोळक्याने उभे होते. आठ मजली न्यायमंदिराच्या बाजूला इंग्रजांच्या काळातल्या दगडी इमारतीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका:यांची न्यायालये. चोहोबाजूंनी सुरक्षा. चारही दिशांना लोखंडी चॅनल गेट. उत्तरेकडे सीताबर्डी - धंतोली, गणोशपेठ, कोतवाली आणि जरीपटका, अशा चार पोलीस ठाण्यांसाठी चार न्यायालये.  त्यापैकी न्यायालय क्रमांक 7 मध्ये जरीपटका पोलीस ठाण्यातील आरोपींना हजर केले जाते.  
- अक्कू यादवला इथेच आणतील याची पूर्वकल्पना  जमावाला होती. न्यायालय क्रमांक 7 च्या समोर आणि चॅनल गेटजवळ एकवटलेला जमाव एखाद्या हिंस्त्र जनावरासारखी अक्कूची वाटच पाहत होता. 
काही वेळात पोलीस कॉन्स्टेबल दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी हे दोघेच खतरनाक अक्कू आणि त्याचा साथीदार नितीन बालाघाटी या दोघांना घेऊन आले. दोघांनाही हातकडय़ा होत्या. हातकडय़ांचा दोरखंड पोलिसांच्या हातात. अक्कूची न्यायालयातली ही लागोपाठ दुसरी पेशी होती. कस्तुरबानगरातील पीडित नागरिकांनी अक्कू आणि त्याच्या टोळीविरुद्ध साध्या पोलीस निरीक्षकापासून आयुक्तांर्पयत निवेदने दिली होती. पत्रकार परिषदा घेऊन आवाज उठविला होता. राजरोस दहशत माजवणा:या अक्कूला अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांवर सतत दबाब वाढत असल्याने त्याच्या खास मर्जीतील एका शिपायाने 7 ऑगस्ट 2004 रोजी अक्कूला जरीपटका पोलीस ठाण्यात हजर केले होते.  
10 ऑगस्टला अक्कूला न्यायालयात हजर केले गेले तेव्हाच त्याचा गेम करण्यासाठी कस्तुरबानगरातील संतापलेले लोक एकत्र आले होते. पण तत्कालीन पोलीस उपआयुक्त यशस्वी यादव यांनी जमावावर पिस्तूल रोखल्याने अक्कू वाचला.
 न्यायालयाने अक्कूच्या पोलीस कोठडीत 13 ऑगस्टर्पयत वाढ केली.
13 ऑगस्टच्या पेशीच्या दिवशी मात्र वातावरणात हिंस्त्र तणाव होता. अक्कूला पाहताच जमाव पेटून उठला होता.  ‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, असे म्हणत चिडलेले बायका-पुरुष अक्कूच्या दिशेने धावत सुटले. ज्याच्या-त्याच्या हाती मिरची पावडर, चाकू, भाल्याचे पाते, गुप्त्या आणि दगड होते. संतप्त जमाव सरसावलेला पाहून अक्कू आणि बालाघाटीला दोन्ही पोलीस शिपायांनी कसेबसे दगडी इमारतीच्या आत ढकलून चॅनल गेट बंद केले. दोघांनाही न्यायालय क्रमांक 7 मध्ये नेण्यात आले होते. तिथले प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अवकाशावर होते. आरोपींना दुस:या न्यायालयात नेण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात असतानाच आत घुसलेल्या जमावाने न्यायालयाचे लाकडी दार तोडले. काहीजण तुटलेल्या दारातून तर काही चॅनल गेटमधून आत घुसले. या कल्लोळात फौजदार सहारे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाकडे खबर देण्यासाठी धावले. 
वखवखलेल्या जनावरासारख्या रागाने थरथरणा:या जमावाने आधी दहशतखोर अक्कूच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याला जायबंदी केले. एकाच वेळी दहा-पंधरा जणांना निपटवण्याची ताकद असणारा रानटी अक्कू ङोलपाटला. हल्ला होताना पाहून दोन्ही पोलीस आणि दुसरा आरोपी बालाघाटी स्वत:चा जीव वाचवीत हातकडीसह   पळून गेले. न्यायालयातील कर्मचारीही त्यांच्यामागोमाग जीव घेऊन पळाले. रिकाम्या न्यायासनासमोरच जमावाने अक्कूवर धारदार आणि तीक्ष्ण शस्त्रंनी वार करून, दगडाने ठेचून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. अवघ्या अध्र्या तासातच कस्तुरबानगरचा दहशखोर अक्कू कायमचा संपला. त्याच्या देहाची अक्षरश: चाळण झाली.
ठरवलेले काम फत्ते झाल्यानंतर जमावातील लोक काहीही घडले नाही अशा तो:यात मिळेल त्या वाहनाने सरळ निघून गेले.  
मेयो इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी अक्कूचा मृतदेह पोहोचला. उत्तरीय तपासणीत त्याच्या पोटात 100 एम.एल. मद्य आढळून आले आणि देहावर एकूण 56 घाव!
 
अक्कू जमावाला हिंस्त्र  बनवणारा क्रूरकर्मा
 
अक्कूच्या मृत्यूच्या सुमारे पंचवीस वर्षे आधीपासूनच अक्कूच्या संपूर्ण कुटुंबाचीच नागपूरच्या जरीपटका भागात दहशत होती. अख्खे कुटुंबच गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे.  कुख्यात गुन्हेगार अशी पोलिसांत नोंद असलेले.
कालिचरण यादव हा बेलिशॉप क्वार्टरचा दादा होता. एका महिलेच्या छेडखानीवरून कालिचरणविरुद्धचे वातावरण तापून तो कस्तुरबानगर भागात वास्तव्याला आला. येथेही त्याने आपल्या दहशतीचे जाळे पसरवले. कालिचरणला सहा मुले आणि सहा मुली. अक्कू हा त्याचा सर्वात लहान मुलगा.
अख्खे उत्तर नागपूर विशेषत: जरीपटका आणि कस्तुरबानगर वेठीस धरणारा अक्कू यादव क्रूरकर्मा होता. त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार, विनयभंग, लूटमार, प्राणघातक हल्ला आणि खंडणी वसुली आदि 26 गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांशी खास संबंध असल्याने त्याच्या 40 अपराधांची त्यांनी दखलच घेतली नव्हती. पोलिसांनी केवळ 12 वेळा त्याला अटक केली होती. अटक झाल्यानंतर काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर पडायचा. 
अक्कूच्या खुनाच्या घटनेच्या दहा महिन्यांपूर्वी त्याने एका 22 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला होता. पहाटे 3 वाजताच्या सुमारास तो आपल्या साथीदारांसह या महिलेच्या घरात घुसला. आधी तिच्या पतीला भोसकून जखमी केले होते. त्याला शौचागृहात बंद करून पीडित विवाहितेचे केस ओढत तिला घरात नेले होते. त्यानंतर अक्कूसह साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला या घटनेची तक्रार नोंदवण्यास पोलीस ठाण्यात गेली तेव्हा पोलिसांनी तिच्यावरच अक्कूसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. भयभीत होऊन ही महिला पतीसोबत वस्ती सोडून निघून गेली.
- हे नेहमीचे झाले होते.
एखाद्या मुलीवर अक्कूची नजर पडली, की तिचे अपहरण आणि बलात्कार हा जणू रिवाजच झाला होता. कुटुंबंच्या कुटुंबं मोहल्ला सोडून निघून जात, पण अक्कूच्या दहशतीमुळे कुणी पोलिसांत जाण्याची हिंमत करीत नसे.  अक्कूच्या तावडीतून सुटणो मुश्कील होते. त्याच्या भीतीमुळे अनेकांनी आपल्या मुलींना नातेवाइकांकडे ठेवले होते. 
अक्कूचा 13 ऑगस्ट 2004 रोजी न्यायालय कक्षात खात्मा होण्याच्या पूर्वी त्याची टोळी मार्टिननगर, मानकापूर, कुशीनगर, लष्करीबाग, बारा खोली, फरस, भीम चौक, जरीपटका, इंदोरा, इंदिरानगर आदि वस्त्यांमध्ये सक्रिय  होती.