शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

या सामानाचं काय करावं ?

By admin | Updated: June 27, 2015 18:28 IST

न्यू यॉर्क आणि शिकागोतल्या थंडीचा त्रास चुकवण्यासाठी त्यांनी फ्लोरिडातल्या गरम हवेत स्थलांतर केलं. तिथल्या मोठय़ा घरातून इथल्या लहान घरात येताना काय आणायचं आणि काय ठेवायचं? - कारण प्रत्येक गोष्टीत भावना अडकलेल्या..

दिलीप वि. चित्रे
 
रात्रीचे दहा वाजून गेले होते. उद्या शनिवार. सकाळी लवकरच TRASH PICK-UP ची ट्रक येणार. ट्रॅश कॅन्सबाहेर ड्राइव्ह वेच्या कोप:यावर ठेवण्याची आठवण शोभानं करून दिली म्हणून बाहेर आलो, तर समोरच्या घराचं गराज डोअर उघडं. दिवे लागलेले आणि प्रचंड सामानानं भरलेल्या गराजमध्ये, त्या सामानाच्या पसा:यात 400 पौंड वजनाचा चार्ली खाली फतकल मारून बसलेला; आणि त्याची बायको नॅन्सी बाजूला हतबल होऊन उभी.
मी शोभाला हाक मारली आणि चटकन दोघेही रस्त्यापलीकडे धावून गेले. पण करणार तरी काय? त्याला उठवणार कसं? माझ्या डोक्यात आयडिया आली. अॅम्ब्युलन्सला फोन केला. दोन-तीन मिनिटांतच अॅम्बुलन्स, फायर इंजिन वगैरे दारात येऊन थडकले.
दोन पहिलवान गडय़ांनी दोन बाजूंनी त्याच्या काखेत हात घातले आणि त्याला सटकन् उठवून बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर बसवला.
मी हसत हसत नॅन्सीला विचारलं, ‘‘चार्ली इथं येऊन का बसला होता? त्याला घरातून बाहेर काढलं बिढलंस की काय?’’ - यावर सगळेच हसले. पण चार्ली अस्वस्थ दिसत होता. खरं म्हणजे तो अॅम्ब्युलन्सला फोनच करू देत नव्हता. त्याची काळजी एकच ! रात्रीच्या वेळी सायरन वाजवत, लाल-निळे दिवे डोक्यावर लावून अॅम्ब्युलन्स, फायर इंजिनवाले सगळे येतील आणि उगाच सगळ्या गावाला गवगवा.
गराजमधल्या त्या सामानाच्या प्रचंड ढिगा:यात कुण्यातरी खोक्याला थडकून चार्ली पडला; आणि मग त्याला उठताच येईना. स्वत:च्याच वजनानं, तो कुल्ल्यावर आपटल्याने दोन्ही बाजूच्या बरगडय़ांना फ्रॅक्चर झालं. त्याला धड श्वासही घेता येईना. मग आलेल्या अॅम्ब्युलन्समधूनच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अन् मागोमाग नॅन्सीला घेऊन मी आणि शोभाही तिथे जाऊन पोचलो.
चार्ली आणि नॅन्सी मुळात श्रीमंत लोक. न्यू यॉर्क राज्यातल्या ‘लाँग आयलंड’ विभागातून थंडी चुकवून फ्लॉरिडातल्या गरम हवेत स्थलांतरित झालेले. तिथल्या मोठय़ा 5-6 बेडरूम्सच्या घरातून इथल्या लहान दोन बेडरूम्सच्या घरात येताना काय आणायचं, काय आणू नये याचं तारतम्य असू नये? फ्लोरिडातलं आमच्यासमोरचंच घर त्यांनी विकत घेतल्यावर दोन-चारदा इथं ते येऊनही गेलेले. त्यामुळे इथल्या जागेचा अंदाज नव्हता असंही नाही. मग एक प्रचंड ट्रक भरून आणलेलं सामान ठेवणार कुठे? आता चार्ली आणि नॅन्सी किंवा त्यांची आता मोठी होऊन बाहेर पडलेली मुलं यापैकी कोणीच पियानो वाजवत नाही. मग वडिलोपाजिर्त घरात असलेला भला मोठा पियानो इथे घेऊन येण्याचे कारण काय?
मग जाणार कुठे हे सगळं सामान? अर्थातच गराजमध्ये. मग पडून राहील तिथेच कितीतरी र्वष. त्या सगळ्या सामानात एक मोठी थोरली गारमेण्ट बॅग मी पाहिली. खूप भारी असावी.
मी चार्लीला विचारलं, ‘‘काय आहे त्यात?’’ नॅन्सीकडे हात दाखवत तो म्हणाला, ‘‘हिचा वेडिंग गाऊन.’’ मनात आलं, आता हा वे¨डंग गाऊन घालून नॅन्सी बेडिंग बांधल्यासारखी दिसत असेल! पण म्हणालो, ‘‘वा:! लगAबिगA करतेय की काय?’’ 
‘‘छे: रे, तेवढं कुठलं आलंय माझं नशीब!’’ - चार्ली म्हणाला.
पण काय सांगत होतो? हां, सामान! का मोह बाळगतात लोक जुनं सामान जतन करण्याचा कळत नाही. मोह म्हणण्यापेक्षा भावना गुंतलेल्या असतात का? बडोद्यातल्या आमच्या जुन्या दोन खोल्यांच्या घरात एक लाकडी नक्षीदार फ्रेम असलेला, पण पारा उडालेला आरसा होता. एकदा मी ‘तो टाकून देऊ का’ म्हणून वडिलांना विचारलं तर ते म्हणाले, ‘अरे, हळू बोल, ऐकेल ना तिकडे तुझी आई ! आमच्या लगAात तिच्या माहेराहून आलेला आहे हा.’ मी म्हटलं, ‘अहो, यात धड चेहरासुद्धा दिसत नाही नीट.’ 
‘मग बरंच आहे की ते! जर दिसला तर पंचाईतच नाही का?’ 
- तेही खरंच!!
हॉस्पिटलमध्ये चार्लीचे सगळे फॉर्म्स भरण्याचे, अॅडमिशनचे, त्याला खोली मिळण्याचे सगळे औपचारिक विधी होईर्पयत आम्ही थांबलो. त्याला तिस:या मजल्यावरच्या लांबलचक कॉरिडॉरमधून गेल्यावर टोकाकडची खोली देण्यात आली. व्हीलचेअरवर त्याला बसवून नर्स खोलीकडे निघाली; तिच्या मागोमाग आम्हीसुद्धा.
कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पेशण्ट्सच्या रूमवरील त्यांच्या नावाच्या पाटय़ा वाचत जात असताना, ‘डेबी जॉन्सन’ आणि ‘रॉबर्ट जॉन्सन’ ही नावं वाचून आम्ही दोघेही थांबलो.
‘‘अरे, हे तर आपले नवे शेजारी. नुकतेच शिकागोहून फ्लोरिडात राहायला आलेले.’’ - मी म्हणालो.
ते आले तेव्हा त्यांच्या ट्रकमधलं सामान उतरवून झाल्यावर, शेजारधर्म म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. स्वत:ची ओळख करून दिली. ‘काही मदत हवी असेल तर संकोच न बाळगता सांगा’ असं बजावून सांगितलं; आणि संध्याकाळी वाइन घ्यायला यायचंही आमंत्रण दिलं. माङया या कृतीनं दोघेही भारावून गेले.
संध्याकाळी दोघेही आले तेव्हा खूप मजा आली. भरपूर गप्पा झाल्या. दोघेही स्वभावानं अगदी मोकळे. भडभडून बोलणारे, खळखळून हसणारे. मला अशी माणसं आवडतात. पोटात एक आणि ओठावर दुसरंच असं काही नाही. गंभीर चेह:याच्या माणसांची मला भीतीच वाटते. वाटतं, न जाणो आपल्या हातून चुकून विनोद बिनोद घडला तर यांना जुलाब होईल की काय! असो, डेबी आणि रॉबर्ट या दोघांशीही आमची चांगली दोस्ती जमली. दोघेही आमच्याहून वयानं कितीतरी मोठे. पण अगदी बरोबरीनं वागणारे. इथे एक बरं आहे, ही सगळी रिटायरमेण्ट कम्युनिटी. त्यामुळे इथे येणारे, राहणारे सगळेच ‘सिनियर सिटीझन्स’. श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेद नाही. वयाचा नाही, वृत्तीचा नाही आणि परिस्थितीचाही नाही.
डेबीची प्रकृती तशी नाजूकच वाटली. सांधेदुखीचा त्रस. तो वाढत वाढत असह्य होऊ लागला तेव्हा शिकागोच्या थंड हवेतून फ्लोरिडाला येण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. पण फ्लोरिडाला आल्याबरोबर जादूची कांडी फिरल्यासारखी प्रकृती लगेच सुधारणार थोडीच? डॉक्टरनं सकाळ-संध्याकाळ तिला चालण्याचा व्यायाम करायला सांगितलं. रोज स्वत:ला ढकलत असल्यासाखी चालते बिचारी.
ट्रकमधून उतरवलेलं त्यांचं सामान अजून गराजमध्ये आणि घरातल्या इतर खोल्यांमध्ये अस्ताव्यस्त पडलेलं. उरापोटाबरोबर आणलेलं सगळं सामान. मोठय़ा घरातून लहान घरामध्ये येताना डाऊन सायङिांग करायला नको? चार्लीप्रमाणो पियानो, वेडिंग ड्रेसेससारख्या गोष्टी कशासाठी आणायच्या? अमेरिकेत तर वेडिंग ड्रेसमध्ये बायकांच्या केवढय़ा भावना गुंतलेल्या असतात! स्वत:च्याच नाही, तर आईचा-आजीचा वेडिंग ड्रेससुद्धा जपून ठेवलेला असतो. मला नेहमी वाटतं, आयुष्यात दोन-दोन, चार-चार लगAं करणा:या स्त्रिया आपले किती वेडिंग ड्रेसेस कसे जतन करत असतील!
चार घरं सोडून पलीकडे राहणा:या 86 वर्षाच्या सिंथियानं बातमी आणली, ‘‘डेबीला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय!’’
संध्याकाळी मी व शोभा तिला भेटायला गेलो. जाताना फुलांचा गुच्छ न्यायला विसरलो नाही. रूमच्या दारावर ‘डेबी जॉन्सन’च्या नावाची पाटी होतीच.
रॉबर्ट बिचारा घरी आला. एकटाच होता. इथे खाण्या-पिण्याच्या सगळ्याच गोष्टी तशा तयार मिळत असल्यानं तो प्रश्न नव्हताच. फक्त घरात सगळीकडे पसरलेल्या सामानाचं व खोक्यांचं काय करायचं!
पुन्हा डोक्यात सतत भेडसावरणारा प्रश्न उपस्थित झालाच. ‘डाऊन सायङिांग’ का करत नाहीत हे लोक, या वयातसुद्धा?
माङयाकडे पाहुणो आले होते. स्कॉचचे ग्लास हातात धरून आमच्या गप्पाटप्पा चालल्या होत्या. एवढय़ात घाब:याघुब:या आवाजात मला हाका मारत सिंथिया धावत आली. म्हणाली, ‘‘दिलीप, कम कम, सम वन इज शाउटिंग. हेल्प हेल्प!’’  
मी तसाच धावलो.
डेबीचा हॉस्पिटलमधून फोन आला म्हणून शॉवर घेता घेता रॉबर्ट तसाच ओलेत्यानं धावला आणि पाय घसरून पडला. कमरेचं हाड मोडलं, पायाला फ्रॅक्चर झालं. कसा तरी घसरत गराजच्या डोअर्पयत आला व रस्त्यावर कोणीतरी ऐकेल असा ‘हेल्प हेल्प’ म्हणून ओरडू लागला. घर तसंच सामानानं भरलेलं.
आता हॉस्पिटलच्या त्याच रूमच्या दारावर डेबी जॉन्सन आणि रॉबर्ट जॉन्सन अशी दोघांच्याही नावाची पाटी आहे; आणि आम्ही फुलांचे दोन गुच्छ घेऊन त्यांना भेटायला निघालोय..
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, 
‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक 
मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, संयोजक, संघटक.)