दिलीप चित्रे
अमेरिकन जगतामध्ये ‘डाऊन सायङिांग’ या शब्दांचे वेगवेगळ्या क्षेत्रतले निरनिराळे अर्थ असतात.
व्यावसायिक क्षेत्रतल्या एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ‘डाऊन सायङिांग’ म्हणजे कर्मचा:यांची संख्या कमी करून उरलेल्या कर्मचा:यांकडून कामे करवून घेणो. कित्येकदा हे डाऊन-सायङिांग तात्कालिक असते, तर ‘हायर-फायर’ या तत्त्वावर चालणा:या अमेरिकन विश्वात या गोष्टीचे फारसे नावीन्य नसते. तात्कालिक डाऊन-सायङिांग हे कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कर्मचा:यांना कामावरून तात्पुरते काढून टाकल्याने झालेले असते. परंतु पुन्हा आर्थिक स्थिती सुधारल्यावर त्याच कर्मचा:यांना पुन्हा कामावर बोलावले जाते. कित्येकदा ‘पर्मनन्ट डाऊन सायङिांग’ केलेल्या कंपन्यांतून कर्मचा:यांना पुन्हा कामावर बोलावले जात नाही, कारण त्या कंपनीने आर्थिक उन्नती खालावल्यामुळे आपला कामाचा विस्तारच मर्यादित केलेला असतो. काही कंपन्यांमधे कंपनीतल्या कर्मचा:यांच्या उत्पादनक्षमतेवर बारीक नजर ठेवली जाते. आठ तासांच्या त्यांच्या सक्त मजुरीसाठी दिलेल्या पगारातून कंपनीला फायदा होतो की नाही. झाला तर तो किती होतो याचा ताळेबंद सतत मांडला जातो; आणि हवी तेवढी उत्पादन क्षमता नसलेले कर्मचारी ताबडतोब ‘डाऊन सायङिांग’चे बळी होतात. मग त्या कर्मचा:याचं नुकतंच लगA झालंय किंवा त्याला दोन अगदी लहान मुलं आहेत अथवा त्याचे वृद्ध आजारी आईवडील यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याला जर नोकरीवरून काढलं तर त्यांचं काय होईल या गोष्टींचा मुळीच विचार केला जात नाही. असले भावनिक प्रश्न सोडवण्यात कंपनीचे अधिकारी कधीच गुंतत नाहीत. कंपनीचा फायदा तोटा किती हाच मुख्य प्रश्न!!
कमीत कमी नोकरवर्गाकडून जास्तीत जास्त काम करवून घेणो यातच खरे कसब. या तत्त्वावरच अमेरिकेतली अर्थसत्ता बळकट होते. मुळात अगोदरच जास्त कर्मचारी कामावर घ्यायचे आणि पुरेसा फायदा होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांना कामावरून काढून टाकायचे म्हणजे डाऊन सायङिांग नव्हे. 198क् च्या दशकात अमेरिकेतल्या आर्थिक उन्नतीचा जेव्हा :हास होऊ लागला तेव्हा बहुतांश कंपन्यांनी वरील तत्त्वाचा अंगीकार केला. अर्थात असे डाऊन सायङिांग करू पाहणा:या कंपन्यांना अमेरिकेतल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कडक धोरणांना, नियमांना तोंड द्यावेच लागते.
कंपन्यांचा आर्थिक फायदा असणो यावरच डाऊन सायङिांगची गरज नसणो हे अवलंबून असते. 2क्क्7 च्या सुमारास अमेरिकेतल्या आर्थिक उतरंडीच्या काळात कंपन्यांना, कारखान्यांना उत्पादनासाठी लागणारे कर्ज अथवा भांडवल बँकांकडून मिळेनासे झाले. त्यावेळी कित्येक कामगारांना, कर्मचा:यांना हा डाऊन सायङिांगचा फटका सोसावा लागला. अनेक कचे:यांमधून जास्त पगार मिळणा:या, कित्येक वर्षे कंपनीत कामाला असणा:या अनुभवी कर्मचा:यांना काढून टाकून त्यांच्या जागी तरुण पिढीतल्या नवीन, अनुभवी परंतु कमी पगाराची अपेक्षा असणा:या कर्मचा:यांना वाव देण्यात येऊ लागला.
डाऊन सायङिांगच्या नावाखाली कामावरून एकदम कर्मचा:यांना काढून टाकणा:या कंपन्यांसाठी सरकारी नियमांचा गळफास मालकांना बसू लागला. किमान 6क् दिवसांची आगाऊ लेखी नोटीस दिल्याशिवाय कोणालाही नोकरीवरून काढून टाकता येणार नाही, हा नियम लागू झाला. त्या 6क् दिवसात नोटीस बजावली गेलेल्या दिवसांमधे त्याला दुसरी नोकरी शोधण्याची परवानगी असावी असाही.
हे झालं एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रतल्या किंवा व्यावसायिक विश्वातल्या डाऊन सायङिांगसंबंधी. तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या डाऊन सायङिांगचा प्रकार आणखीच वेगळा. माङयासारख्या भारतीय संस्कृतीचं आणि संचयवृत्तीचं ‘अमृत’ रक्तात भिनलेल्या व्यक्तीला हा डाऊन सायङिांगचा प्रकार न मानवणाराच म्हणायला हवा.
आयुष्याच्या गोरजवेळेवर लक्ष केंद्रित करून, सारासार विचारानं नको असलेल्या वस्तू बाजूला सारणो यातच जीवनाचे सार नाही काय? NEED AND WANTS या गोष्टीचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. ‘गरज आणि हव्यास’ या दोन वेगळ्या गोष्टी. आवश्यक आहे म्हणून एखादी गोष्ट विकत घेणो किंवा घरात बाळगणो, आणि केवळ आवडली म्हणून गरज नसलेली एखादी वस्तू घरात आणून जागा व्यापणो यात शहाणपणाचं काय याचा विचार नको करायला?
डाऊन सायङिांगच्या नावाखाली मोठय़ा 4-6 बेडरूमच्या घरातून 2-3 बेडरूम्स असलेल्या घरात राहायला येणारे मी जसे अनेक पाहिले तसेच त्या मोठय़ा घरांमधून केवढं तरी सामान बरोबर आणणारेही पाहिले. मग याला काय डाऊन सायङिांग म्हणायचं?
माङया एका मित्रचं म्हणणं असतं की एखादी वस्तू जर सहा महिन्यात वापरली गेली नाहीे तर सरळ ती टाकून द्यावी. मी त्याला गमतीने म्हणालो, ‘‘बायकोला कधीही सहा महिन्यांहून जास्त पाठवू नकोस हां माहेरी!’’ तर तो वैतागलाच.
पण डाऊन सायङिांगच्या बाबतीत एक परवलीचा मंत्र म्हणजे DECLUTTER करणो. घरातली ‘अडगळ’ टाकून देणो. अगदी मन घट्ट करून, कुठलाही मोह न ठेवता. बुटाचा अथवा चपलेचा नवीन जोड आणल्यावर जुना टाकायला हवा. नाहीतर नवा झिजेल म्हणून काय जुनाच घालून खुरडत चालायचं?
आता बदलत्या काळाप्रमाणो नवीन टेक्नॉलॉजी आली. नवनवे शोध लागले. नवीन वस्तू बाजारात आल्या. वाढत्या वयातसुद्धा नव्या शोधाच्या, नवीन वस्तू घरात आल्या. टेलिफोनच्या विश्वातच केवढी प्रगती झाली पाहा. एच.एम.व्ही.च्या फोनोग्राफचं युग जाऊन कॅसेट्स आल्या, त्या जाऊन सीडीचं युगं आलं. व्हिसीआर- व्हिडीओज् आल्या. यूएसबी- पेनड्राइव्ह आले. कॉम्प्युटर्स आले आणि काय काय! आम्हाला मात्र कॉम्प्युटर्समधल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नातवंडांवर अवलंबून राहावं लागतं ही गोष्ट वेगळी; पण आपल्याला आजोबांपेक्षा जास्त कळतं या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेह:यावर पाहण्याचं समाधानही केवढं मोठं असतं.
पण एक आहे, या सगळ्या नवीन गोष्टींमुळे सगळं विश्वच COMPACT व्हायला लागलंय. एवढय़ाशा चकतीची ‘मेमरी’ तरी किती! ‘मेगाबाईट’ काय ‘गेगाबाईट’ काय कळतच नाही. सुरुवातीला नातवंडांच्या संभाषणातला शेवटचा ‘ट’ कळायचा नाही. वाटायचं, हा कुठल्या ‘मेगाबाई’ आणि ‘गेगाबाई’बद्दल बोलतोय कोण जाणो?
पण मन कितीही मुक्त करायचं म्हटलं तरी काही गोष्टी अशा असतातच की त्यातून मन मुक्त होणं शक्यच नसतं अन् ते करण्याचा प्रयत्नही करू नये असं माझं मत आहे. उदाहरणार्थ पुस्तकं. उगीच का मी फ्लोरिडात स्थलांतरित होताना 2क्क्क् पेक्षा अधिक पुस्तकांचे 4क्-42 बॉक्सेस ट्रकमध्ये घालून घेऊन आलो? तेच ‘सख्खे सोबती’ नाहीत का?
पण पुस्तकं ठीक आहे. ती असायलाच हवीत. मी अशीही घरं पाहिली आहेत की, घरात औषधालाही कुठे पुस्तकं सापडत नाहीत त्यांच्या. मला तर सवयच आहे की, कुणाकडे गेलं तर माझी नजर आधी पुस्तकं कुठे दिसतायत इकडे भिरभिरत असते. ती दिसली नाहीत तर माझा जीव कासावीस होतो. शोभाची आणि माझी सवय अशी की कुठेही प्रवासाला जाताना कपडय़ांच्या आधी पुस्तकं बॅगेत कोंबायची आणि घरातलं कुठलंही पुस्तक वाचून झाल्यावर टाकून द्यायचं नाही. मित्रंना आग्रहानं पुस्तकं वाचायला द्यायची आणि शेल्फवर ठेवलेल्या डायरीत त्यांनीच स्वत:च्या हातानं आपलं नाव, पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, तारीख-वार इत्यादि सर्व लिहायचं असा माझा नियम. त्यांनी पुस्तक परत आणल्यावर आपल्याच हातानं केव्हा परत आणलं हे लिहायचं. हा नियम मंजूर नसेल तर पुस्तक न्यायचं नाही.
माझा एक मित्र - मी त्याला मित्र का म्हणालो कुणास ठाऊक - एकही पुस्तक घरात ठेवत नाही, मासिक नाही की वर्तमानपत्र नाही. त्याचं म्हणणं असं की, हे सगळं म्हणजे ऋकफए अेअफऊ आगीला कारण! मी त्याला म्हणतो की, अरे पुस्तकांच्या आगीत जळून मेलास तर सरळ स्वर्गात तरी जाशील!
फ्लोरिडाला स्थलांतरित होताना कित्येक गोष्टी मी नुसत्या वाटून टाकल्या. मित्रंना, शेजा:यांना, संस्थांना, चॅरिटीला देऊन टाकल्या. आपोआपच ‘डाऊन सायङिांग’ झालं. एकाही पुस्तकाला कोणाला हात लावू दिला नाही. डाऊन सायङिांगसाठी दुस:या कमी का गोष्टी असतात घरात?
.काय चेष्टा आहे?
म्हणतात ना, ‘दुस:यास सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!’
- माझी अवस्था काय याहून वेगळी आहे? पुन्हा WHAT do you need ? आणि हँWhat do you want? हे प्रश्न आलेच की! वॉशिंग्टनमधल्या वास्तव्याची 40-42 वर्षे पुरी झाल्यावर निवृत्तीनंतर आम्ही जेव्हा फ्लोरिडा राज्यात घर घेऊन स्थलांतरित व्हायचं ठरवलं तेव्हा वॉशिंग्टनमधल्या आमच्या घरातल्या सामानापैकी ‘हे नकोच, ते नकोच, ते तर मुळीच नको’ असं म्हणता म्हणता ‘हे हवयं, ते असायलाच हवं, हे नसल्यानं कसं चालेल?’ हा जप केव्हा-कसा सुरू झाला कळलंच नाही. सगळ्या वस्तूंमधे आपल्या जखडलेल्या भावनांतून मन मुक्त करणं म्हणजे काय चेष्टा आहे?
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक,
संयोजक, संघटक)