शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

'क्लायमेट चेंज'चे राजकारण

By admin | Updated: December 6, 2014 17:49 IST

‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेन्ट’तर्फे (सीएसई) ‘वातावरणातील बदल’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय पत्रकार चर्चासत्र नुकतेच नवी दिल्ली येथे झाले. ‘तापमानवाढीमागील राजकारण’ या गंभीर विषयावर या वेळी तितक्याच गंभीरपणे झालेल्या चर्चेचा गोषवारा..

- राजीव मुळ्ये
 
निवडणूककाळात ‘राजकारणाचा ज्वर’ चढला, असा शब्दप्रयोग केला जातो. घोटाळ्यांसह अनेक मुद्यांवरून ‘राजकारण तापले’ असे म्हटले जाते. तथापि, या ठिकाणी ‘राजकारण’ शब्दाचा अर्थ खूपच संकुचित असतो. जगाच्या पाठीवर व्यापक अर्थाने जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपल्या सुंदर वसुंधरेला खरोखर ‘ताप’ आला आहे आणि त्यावर औषध शोधण्याऐवजी चुकीचे निदान करून, दिशाभूल केली जात आहे. अनेकांना राजकारणाचा ताप होतो. इथे तापाचे राजकारण सुरू असून, ते शेखचिल्लीचे राजकारण आहे. ‘जागतिक तापमान वाढ’ हा शब्द सौम्य करून, ‘वातावरणातील बदल’ असा शब्दप्रयोग केला, तरी वास्तव बदलत नाही.
 १९५0 हे वर्ष जमीनवापर आणि घातक वायूंचे उत्सर्जन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. या वर्षानंतर कार्बनडाय ऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साइड या दोन घातक वायूंचे हवेतील प्रमाण अचानक प्रचंड गतीने वाढल्याचे दिसते. कोळशाचे ज्वलन आणि सिमेंटचा वाढता वापर, ही त्यामागील कारणे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जंगले आणि अन्य हरित कारणांसाठी होणारा जमीनवापर १९५0 नंतर झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. २000 पासून तर वनाच्छादन प्रचंड वेगाने घटत आहे. मागील तीन दशकांत पृथ्वीच्या तापमानात वेगाने वाढ झाली असून, तापमानवाढीस कार्बनडाय ऑक्साइड ७५ टक्केजबाबदार आहे. १९0१ पासून २0१0 पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीतील वाढीचा सरासरी वेग प्रतिवर्ष १.७ मिलिमीटर इतका नोंदविला गेला. मात्र, १९९३ ते २0१0 या काळाचा स्वतंत्र विचार करता, समुद्रपातळीतील वार्षिक वाढ ३.२ मिलिमीटर इतकी दिसून येते. औद्योगिक क्रांतीनंतर आजतागायत समुद्रामधील आम्लाचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले आहे. ध्रुवीय प्रदेशांमधील बर्फाचा थर आणि जगभरातील हिमनद्या संकोचल्या आहेत. दुष्काळ, पूर, अवर्षण, वादळे, चक्रीवादळे अशा आपत्तींची संख्या १९00 ते १९0९ या काळात प्रतिवर्षी सरासरी दोन ते तीन इतकी होती. २000 ते २0१0 या काळात प्रतिवर्षी सरासरी ३५0 आपत्ती कोसळल्या. 
पूर्वापार शेतीप्रधान असलेल्या भारतात पावसाळ्याचे दिवस घटत आहेत आणि एकाच दिवसात अचानक अतिरेकी पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. २00५ मध्ये २४ तासांत ९९५ मिलिमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आणि ५000 जणांना प्राण गमवावे लागले. थंड वाळवंट मानल्या गेलेल्या लेह शहरात २0१0 च्या ढगफुटीत ३0 मिनिटांत १५0 ते २५0 मिलिमीटर पाऊस पडला आणि २५५ जणांनी प्राण गमावले. उत्तराखंडमध्ये २0१३ मध्ये २४ तासांत ३४0 मिलिमीटर पाऊस पडला. तेथे दर आठवड्याला पडणार्‍या सरासरी पावसापेक्षा ३८0 टक्के जास्त असणारा हा पाऊस ५७00 जणांना यमसदनी घेऊन गेला. २0१४ मध्ये जम्मू-काश्मिरात २४ तासांत २00 मिलिमीटर पाऊस पडला आणि ३00 हून अधिक जणांचा बळी गेला.
वेळीच दखल न घेतल्यास एकविसाव्या शतकात पृथ्वीचे तापमान १ ते २ अंशांनी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. २0३५ पर्यंतच तापमान 0.३ ते 0.७ टक्क्यांनी वाढेल.  अतिरिक्त पाऊस, वादळे अशा आपत्तींची संख्या आणि तीव्रता वाढतच जाईल. समुद्राची पातळी दर वर्षी २ मिलिमीटरने वाढेल आणि आम्लामुळे पाण्याचे तापमानही वाढेल. मानव, प्राणिप्रजाती आणि पर्यावरणीय परिसंस्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, हे स्पष्ट झाले आहे.
२0१२ च्या आकडेवारीनुसार कबरेत्सर्जनात भारताचा चौथा क्रमांक आहे. २९ टक्के कबरेत्सर्जन करणारा चीन प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिका (१६ टक्के) दुसर्‍या, तर युरोपीय महासंघ (११ टक्के) तिसर्‍या स्थानावर आहे. भारताचे कबरेत्सर्जन आहे ६ टक्के. तथापि, प्रतिव्यक्ती कबरेत्सर्जनात अमेरिका पहिल्या, तर भारत १३ व्या स्थानी आहे. १७५0 ते २0१0 या प्रदीर्घ काळात श्रीमंत देशच कबरेत्सर्जनात आघाडीवर राहिले असून, दहा टन कार्बनडाय ऑक्साइडपैकी साडेसहा टन या देशांनी वातावरणात सोडला आहे. या काळात या देशांनी प्रतिव्यक्ती ११२0 टन कबरेत्सर्जन केले, तर चीनने शंभर टन आणि भारताने प्रतिव्यक्ती ३५ टन कबरेत्सर्जन केले. या पार्श्‍वभूमीवर कबरेत्सर्जन तातडीने आणि मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याची निकड संपूर्ण जगाला समजली आहे; मात्र यासंदर्भातील चर्चा पर्यावरणाऐवजी अर्थव्यवस्थेभोवतीच फिरत आहेत. तुमचे कबरेत्सर्जन अधिक की आमचे? तुम्ही ते कमी करायचे की आम्ही? अशा मुद्यांवर विकसित आणि विकसनशील देश भांडत आहेत.  सर्वाधिक दुष्परिणाम मात्र अविकसित देशच भोगत आहेत, याची कुणालाच चाड नाही. उत्सर्जन रोखलेच पाहिजे, याबाबत सहमतीचा जागतिक करार १९९२ मध्येच झाला आहे; मात्र २२ वर्षांनंतर आजही अळमटळम आणि कृती टाळण्यासाठी कारणांचा शोध याभोवतीच चर्चा फिरत आहेत. याच काळात कार्बनचा थर कैक पटींनी वाढत जाऊन ४00 पीपीएमपर्यंत (पार्ट्स पर मिलियन) पोहोचला आहे. 
 या अतिसंवेदनशील मुद्यावर जे काही सुरू आहे, ते फक्त राजकारण! विकसित देश त्यांचे उत्सर्जन नजरेआड करून, विकसनशील देशांच्या नव्याने वाढलेल्या उत्सर्जनाकडे बोट दाखवितात. चर्चा राजकारणाच्या पुढे सरकतच नाही. याच राजकारणाचा ताप वसुंधरेला आला असून, तो आटोक्यात येण्याच्या शक्यता दिसत असेपर्यंत उतरला नाही, तर सगळ्यांचेच अवघड आहे, इतकेच!
 
स्वीकारा अथवा नाकारा..
 १९५0 नंतर वातावरणात अभूतपूर्व बदल झाले आहेत.
 हरितगृहवायूंच्या मानवनिर्मित उत्सर्जनाने इतिहासातील अत्युच्च पातळी गाठली आहे.
 घातक वायू वातावरणात साचण्याचे प्रमाण गेल्या आठ लाख वर्षांतील सर्वाधिक आहे.
 पृथ्वीच्या तापमानातील वाढ नि:संदिग्ध आहे.
 समुद्रातील आम्ल वाढून समुद्रपातळीही वाढत आहे.
 ध्रुवप्रदेशातील बर्फाचे आच्छादन बरेच संकोचले आहे.
 नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता वाढत आहे.
 खार्‍या-गोड्या पाण्यातील जलचरांसह अनेक प्राणिप्रजातींनी अनुकूलनाचा प्रयत्न म्हणून अधिवासात आणि हंगामी क्रियान्वयनात बदल केले आहेत.
 
आपलाच तोटा अधिक
विकासप्रक्रियेमुळे मिळालेल्या आर्थिक लाभावरच वातावरणातील बदलांनी हल्ला चढविला आहे. २00१ ते २00६ या काळात गरीब राष्ट्रांनी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील 0.३ टक्के हिस्सा नैसर्गिक आपत्तींमुळे गमावला. विकसित देशांनी केवळ 0.१ टक्के हिस्सा गमावला असून, भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांनी जीडीपीमधील तब्बल १ टक्का हिस्सा गमावला आहे. गरीब राष्ट्रांचे उत्पन्नच कमी असल्यामुळे, त्यांचे झालेले एकंदर नुकसान मोठे आहे. विकसित देशांचे नुकसान त्यांना पेलवणारे आहे, तर भारतासारख्या देशांचे नुकसान अपरिमित आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतीप्रधान देश म्हणून पूर्वापार असलेली प्रतिमा कायम ठेवायची, की आर्थिक विकासाच्या सरधोपट कल्पनांच्या मागे लागायचे, हा निर्णय धोरणकर्त्यांनी घ्यायचा आहे.
 
तातडीने काय केले पाहिजे?
 ‘विकासाचे मॉडेल’ बदलण्यासाठी संशोधन.
 ऊर्जेचा कमीत कमी वापर आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांना जास्तीत जास्त प्राधान्य.
 श्रीमंत आणि गरिबांमध्ये (देश आणि व्यक्ती) विकासाच्या फळांचे समन्यायी वाटप.
 विषमता आणि पक्षपाताची मानसिकता दृढ होऊ नये, यासाठी प्रयत्न.
 
शहाणपण की मुत्सद्देगिरी?
कार्बनडाय ऑक्साइड वातावरणात ७0 ते १00 वर्षे तसाच राहतो. १८५0 मध्ये सोडलेला कार्बन आणि २00५ मध्ये सोडलेला कार्बन याचा परिणाम सारखाच. त्यामुळे भूतकाळाचे ओझे घेऊन आपण भविष्यकाळात निघालो आहोत. कार्बनसाठी वातावरणात शिल्लक राहिलेली जागाच अत्यंत र्मयादित असून, तिच्यासाठी भांडणे सुरू आहेत. याकामी तंत्रज्ञान आणि निधी देण्याची आश्‍वासने पोकळ ठरली आहेत. तथापि, वाटाघाटी कितीही वेळा निष्फळ ठरल्या, तरी त्या करीत राहण्यावाचून पर्याय नाही. तू..तू.-मै..मै. न करता, आपण काय करू शकतो, हे प्रत्येक देशाने मांडले पाहिजे. दुर्दैवाने ही गैरसोयीची चर्चा निर्णयाविना कशी संपेल, यासाठी मुत्सद्देगिरी दाखविण्याची अहमहमिका लागलेली दिसते. प्रत्येक देशाला; मग तो विकसित असो वा अविकसित, आपलेच हित सांभाळायचे आहे आणि हेच सुरू राहिले, तर मुत्सद्देगिरीत जिंकणारे सगळेच शहाणपणात हरतील आणि कितीही विकास केला, तरी पुढील पिढय़ांसाठी आपण काहीच ठेवू शकणार नाही.
 
जगण्यासाठी आणि ऐषारामासाठी..
एअर कंडिशनर आणि फ्रिजमधून वातावरणात मिसळणारे घातक वायू केवळ ऐषारामासाठीच निर्माण होतात. एसीसारख्या उत्पादनांमधून बाहेर पडणार्‍या वायूंमुळे पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या थराला छिद्र पडले, हे उघड होताच, या उत्पादनांचे स्वरूप बदलण्यात आले. त्यातून नव्याने उत्सर्जित होणारा वायू ओझोनसाठी घातक नव्हता; पण त्या वायूने तापमानवाढीत भर घातली. या घडामोडींकडे जगाने बारकाईने बघितले पाहिजे आणि वातावरणातील बदलांचे गंभीर धोके वेळीच ओळखून, तारतम्य राखूनच चर्चा पुढे नेली पाहिजे. जीवनावश्यक बाबींसाठी जे उत्सर्जन होते त्यातील भेदही लक्षात घेतला पाहिजे. 
 
 
 
उत्सर्जनास कोण किती जबाबदार?
 
कचरा ३%
इतर २%
औद्योगिक प्रक्रिया ६%
इतर इंधनांचे ज्वलन ७%
शेती १५%
उत्पादन आणि बांधकाम १५%
वीजनिर्मिती ३६%
वाहतूक १६%
 
 
(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)