शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आमचं रहस्य

By admin | Updated: February 15, 2015 02:26 IST

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली.

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली. 
त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’ म्हणून चर्चा होते आहे.
माजिक आंदोलनांच्या बातम्या घेऊन वर्तमानपत्रंच्या, वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही, ‘सोशल मीडिया’च्या मार्गाने ‘मध्यस्थ’   ओलांडता येतात, हे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनाच्या दिवसांपासून अनुभवाला आलं होतं. अर्थात, तेव्हा आम्ही सगळे नवखेच होतो. आम आदमी पक्षाचं काम सुरू झाल्यावर  आमच्या सोशल मीडिया सेलला आकार आला.
सोशल मीडिया आणि त्यातून होणा:या ‘थेट संवादाची’ ताकद आम्हाला 2क्13 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रथम जाणवली. त्या निवडणुकीतलं यश, अवघ्या 49 दिवसांत आमच्या सरकारनं दिलेला राजीनामा, त्यानंतरची नाराजी आणि लोकसभा निवडणुकीत उडालेला धुव्वा, त्यातून लोकांमध्ये उसळलेली चीड, नाराजी आणि संताप हे सारंच घेऊनच आम्ही नव्या निवडणुकीला सामोरे गेलो.
आमचे कार्यकर्तेही  सोशल मीडियावरचे ‘ट्रेण्ड्स’ आणि ‘ट्रेल्स’ पाहत होते. ‘आप’ल्या विषयी संताप-नाराजी आहे, त्यावर सोशल मीडियात जहरी टीका होते आहे, हे सारं दिसत होतं. या डाटाचा अभ्यास करणारं पहिलं रिसर्च टूल नोव्हेंबर 2क्14 मध्येच आम्ही सुरू केलं.  केवळ  ‘बोलण्याचं’ अगर  ‘माहिती देण्या’चं नव्हे, तर  ‘ऐकण्याचं’ आणि  ‘माहिती मिळवण्याचं’ माध्यम/ साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याच्या ‘आप’च्या निर्णयाची पहिली परिणती म्हणजे दिल्लीच्या जनतेला सामोरं जाताना अरविंद केजरीवाल यांनी घेतलेली भूमिका- ‘भाई, गलती हो गयी, माफ कर दो, अब की बार ऐसा नहीं करेंगे! 
मतदारांमध्ये आपल्या आधीच्या निर्णयाबद्दल किती संताप आहे, याचं मोजमाप करता येण्याच्या प्रक्रियेतून  विचारपूर्वक तयार झालेली ही पहिली भूमिका. त्यामागोमाग आम्ही ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’चे सलग प्रयोग केले. दिल्लीचे मतदार सोशल मीडियात  काय बोलतात, त्यांचा राग नेमका कशावर आहे,  तरुण मतदारांचा कल कुठे झुकतो आहे हे सारं आम्हाला  ट्विट्स, फेसबुक अपडेट्स, व्हॉट्सअॅपवरून शेअर होणारे जोक्स, मेसेजेस यावरून कळत होतं!  ‘पॉङिाटिव्ह-वीकली पॉङिाटिव्ह-न्यूट्रल-वीकली निगेटिव्ह-निगेटिव्ह’ अशा चाचणी-पट्टीवर प्रत्येक विषयावरल्या मत-मतांतरांना चाळणी लावली जाऊ लागली. त्यातून मिळणारा तपशील आम्ही नेतृत्वासमोर मांडत गेलो. प्रचाराच्या तोफा सुरू झाल्या तसे आमचे निष्कर्ष बदलू लागले कारण, विविध विषयांवरील मतं-मतांतरं आणि प्राथमिकतांचा लंबक बदलत्या दिशा दाखवत होता; पण त्यातूनच  ‘रिअल टाइम’ तपशील हाती आला. प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक मोहल्लय़ातल्या महत्वाच्या प्रश्नांचा  डाटा आमच्याकडे तयार झाला होता. त्यातून आमचे उमेदवार आणि नेते मतदारांशी थेट त्यांच्या प्रश्नाविषयी बोलू शकले.
 ‘मोनोलॉग’ म्हणजे एकतर्फी संवादाची ‘मन की बात’ संस्कृती रुजत असताना आम्ही उलटय़ा दिशेने चाललो म्हणूनच कदाचित ‘डायलॉग’पर्यंत पोहोचू शकलो. 
- याकाळात आमची हेटाळणीही बरीच झाली!
‘झुग्गीझोपडीवाले कहां इनके फेसबुक पढेंगे? असं म्हणत आम्हाला मोडीत काढणा:यांना अजून हे कळलंच नाही की, आता थेट कनेक्ट साधण्याची ताकद माणसांच्या हातात आली आहे. पन्नास-शंभर रुपयांचे पॅक मारून माणसं ‘कनेक्टेड’ राहण्यासाठी धडपडतात.  दिल्लीत 1.33 कोटी मतदार आहेत. 
त्यांपैकी 1 कोटींपेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल, व्हॉट्सअॅप होते!
- त्यांच्यार्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुकच्या चावडीवर चाललेल्या भांडणात आणि व्हॉट्सअॅपवरच्या फाजील, तिरकस फॉरवर्ड्समध्येदेखील डोकावण्याची यंत्रणा आम्ही उभी केली. त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’म्हणून चर्चा होते आहे. आमच्या टीमने प्रत्येक मतदारसंघाचा एक वेगळी डेमोग्राफी म्हणून विचार केला. माणसं  कशानं दुखावतात, कशानं सुखावतात, कशाबद्दल त्यांना काय वाटतं याचा अंदाज घेणं आणि आदर करणं ही तर लोकशाही प्रक्रियेची आद्य-अटच!
- एवढंच की आम्ही त्यासाठी आधुनिक तंत्र वापरलं.
 
(लेखक आम आदमी पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे संस्थापक ‘अॅडमिन’ आहेत)