शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

जुने ते गेले?

By admin | Updated: May 16, 2015 14:29 IST

प्रत्येक जमातीची रीत वेगळी, कुळाचार वेगळे. कोणी वृक्ष सांभाळणार, कोणी प्राणी. कोणी शेती करणार, कोणी शिकार, व्यवसाय. निसर्गातला प्रत्येकाचा हिस्सा वेगळा. कोणाच्याच पोटावर पाय नाही! जे दुस:याचं, ते आपण का घ्यायचं ही भावना. -आणि आता?

- मिलिंद थत्ते 
 
आमच्या भागातल्या काहीच जाती काही विशिष्ट जनावरे खातात. अमूक प्राणी किंवा पक्षी अमूक कुळातल्या लोकांना वज्र्य असतो. काही कुळांवर एखादी वृक्ष प्रजाती वाचवण्याची जबाबदारी असते. थोडं हिंडून पाहू गेलं, तर देशात सर्वत्र अशा रीती दिसतात. झारखंडमधल्या संथाल जमातीत प्रत्येक गोत्रचे स्वामी एखादे झाड किंवा पशू आहे. त्या त्या गोत्रने त्या जिवाचे रक्षण करायचे अशी रीत आहे. जिथे शेती करणारे आणि शिकार करणारे समूह एका क्षेत्रत राहत आले, तिथे कोणी कशाची शिकार करावी याचेही संकेत रूढ झालेले होते. नदीजवळच्या सपाट भागात आणि मंद उतारावर कुणबी शेती करत. तर उंचावरच्या डोंगराळ भागात फिरते गवळी आपल्या गाई-म्हशी चारत. गवळी शिकार करत नसत. कुणबी मात्र शिकार करत. शिकार केलेल्या मांसावर त्यांची प्रथिनांची गरज भागत असे. तर गाडगाभर ताक पिऊन गवळ्यांना प्रथिने मिळत. गवळी दूध आणि तूप विकत आणि त्याबदल्यात कुणब्यांकडून धान्ये-डाळी घेत. कोणती संसाधने कुणी वापरायची याची रूढ व्यवस्था होती. दोघांचे परस्परावलंबन आणि दोघांच्याही गरजा भागण्याची सोय होती.
कनार्टकातल्या अघनाशिनी नदीतले एक बेट आहे - मसूरलुक्केरी. या बेटावरच्या समाजव्यवस्थेबद्दल 1883 च्या गॅङोटमध्ये काही उल्लेख आहेत. आणि 1984 साली अभ्यास करणा:या संशोधकांनाही यातल्या अनेक गोष्टी अजूनही प्रचलित आहेत असे लक्षात आले. या बेटावर 13 जातींचे लोक होते. अम्बिगा ही मासेमारी करणारी जात होती. हाळक्की, पटगर, आणि नाईक या तीन शेती करणा:या जाती होत्या. यांपैकी नाईक हे सैनिकी आणि पाटीलकीही करत. हविक ही ब्राrाण जात होती. हे फळबाग शेती करण्यात मुरब्बी होते. देशभंडारी हे देवळात नृत्य-गायन करणारे लोक होते. भंडारी ताडी काढायचा व्यवसाय करत. कोडेया हे न्हावीकाम तर मिदवाळ हे धोबीकाम करत. शेट हे सोनार, आचारी हे सुतार व लोहार, मुखरी हे पाथरवटाचे (दगड घडवण्याचे) काम करत. गौड सारस्वत ब्राrाण हे व्यापारी होते. या सर्व तेरा जातींपैकी हविक सोडले, तर इतर सर्व जाती मांसाहार करत. पण शेट, कोडेया, आणि गौडसारस्वत हे स्वत: शिकार किंवा मासेमारी करत नसत. ते इतरांकडून मासे व मांस रोखीवर किंवा वस्तूविनिमयावर खरेदी करत. इतर नऊ जातींपैकी फक्त अम्बिगा हे निव्वळ मासेमारी करत. बाकी सर्व फावल्या वेळात किंवा स्वत:ला खाण्यापुरती मासेमारी करत. या सर्व जातींची मिळून मासेमारी आणि शिकारीची 33 प्रकारची तंत्रे होती. तंत्रे वेगवेगळी असल्यामुळे निसर्गाच्या वेगवेगळ्या हिश्यात आणि वेगवेगळ्या जिवांची शिकार हे करत. एकमेकांच्या पायावर (किंवा पोटावर) पाय येत नसे. 
खोल पाण्यात नावा नेऊन आणि मोठी जाळी टाकून मासेमारी करणो हे फक्त अम्बिगा करत. त्यात तेच वाकबगार होते. मोठय़ा सस्तन प्राण्यांची शिकार फक्त हाळक्की करत. वाघळे आणि इतर काही पक्षी सापळे लावून पकडणो पटगर आणि मदिवाळांना जमे. फक्त नाईक सापळे लावून जमिनीवर वावरणारे छोटे प्राणी धरत. उथळ पाण्यात उतरून उजेड पाडून मासे पकडणो हे काम आचारी करत. आपली साधने तयार करण्यासाठी ही मंडळी जी झाडे वापरत तीही वेगवेगळी होती. हाळक्की जाळी विणताना शिंदीच्या धारदार झावळ्यांची विणत, तर पटगर उथळ पाण्यातल्या एका गवतापासून जाळी तयार करत. सर्वांची अन्नाची गरज भागेल आणि निसर्गातल्या कोणत्याच एका घटकावर कमालीचा ताण येणार नाही - अशी काळजी घेणारी ही व्यवस्था होती. 
दक्षिण महाराष्ट्रात तिरूमल नंदीवाले, वैदू, आणि फासेपारधी या तीन भटक्या समूहांच्या शिकारीच्या पद्धती पाहिल्या तरी त्यात असेच समतोल विभाजन दिसून येते. फासेपारधी हे निव्वळ शिकारी, तर बाकी दोघे इतर उद्योग असलेले पण पोटासाठी थोडीफार शिकार करणारे. तिरुमल नंदीवाल्यांच्या घरात शिकारीला सोबत येणारे चार कुत्रे, आणि तेही माग काढण्यापासून झडप घालण्यापर्यंत सगळेच करण्यात तरबेज. शिकार करायचे प्राणी - तरस, वाघटी, रानडुक्कर, ससा, आणि साळिंदर. वैदूंच्या सोबत एखादाच कुत्र. आणि शिकार करायची मुंगूस, ताडमांजर, मांजर, आणि इतर छोटय़ा मिश्रहारी प्राण्यांची. सापळ्यात एखादी खार ठेवून या प्राण्यांना अडकवण्याचे त्यांचे तंत्र होते. उलट फासेपारध्यांकडे कुत्रे अजिबात नाहीत. फास, सापळे लावून शिकार धरायची. आणि पोटासाठी शिकार विकायचीही. पूर्वी म्हणो ते प्रशिक्षित गाय वापरायचे शिकारीत मदतीसाठी. हरणांच्या कळपात ही गाय सोडायची आणि तिच्या आडोशाने सापळे रचत जायचे. फासे लावून तितर, लावरी, मोर असे पक्षी ते मोठय़ा प्रमाणात पकडत. या तीन शिका:यांच्या पद्धती वेगळ्या आणि त्यामुळे त्यात मिळणारे प्राणीही वेगळे. यात नीट पाहिले तर फासेपारधी हे सर्वात कुशल शिकारी. त्यांना वैदूंसारखे खारीचे सापळे लावणो सहज जमले असते. पण त्यांनी ते कधी केले नाही. जे दुस:याचे आहे ते आपण कशाला घ्यायचे, ही एक सहज आणि सामान्य भावना होती.  
‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ ची ही प्रत्यक्षातली आवृत्ती होती. ‘प्रत्यक्षातली’ म्हणताना ती बिनचूक नव्हती हे तर उघडच आहे. माणसाने निर्माण केलेल्या रचनांमध्ये त्रुटी असणारच. (म्हणून तर लोक एकसारखे मोबाइल अपग्रेड करत असतात!) याही रचनेतली सत्ताधारी मंडळी आपल्याला अधिक फायदा व्हावा अशी व्यवस्था करत असणारच. पण तरीही कागदाचा वा कायद्याचा वापर नसलेली आणि काही शतके चाललेली अशी ही प्रभावी रचना होती. 
स्थिर शेती सुरू झाल्यापासून आपल्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेणो माणसाला जमू लागले. शेती वाढली तशी अन्नधान्य स्वत: न पिकवता विकत घेणारी शहरेही वाढली. भोवती शेती आणि मध्ये शहरे ही रचना अशीच निर्माण झाली. शहर म्हणजे कमी कष्टाचे जीवन ही स्थिती मग ओघानेच आली. आपल्याला काही कमी पडू नये अशी काळजी प्रत्येक जीव घेतोच. शहरांना गावांच्या अंतर्गत रचनेशी काही घेणोदेणो नव्हते. आम्हाला काही कमी पडू नये म्हणजे झाले. शहरांचा आकार वाढला, तसे स्वत: न पिकवणारी माणसे वाढली. कुटुंबात खाणारी तोंडे जास्त आणि कमावणारे हात कमी असे झाल्यावर जे होते तेच व्हायला लागले. तिकडे गावातल्या परस्परपूरक रचनेचाही तोल ढासळू लागला. जंगल आकुंचित व्हायला लागले, शेती वाढायची तेवढी वाढली, भटक्या जमातींसाठी पोट भरण्याचीही जागा उरली नाही. त्यांचे व्यवसाय तर नामशेष झालेच. जंगल आणि शेतीवर भागत नाही अशी गावांची स्थिती झाली. 
या ढासळणीतून आपण मार्ग कसा काढणार? ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा एकच डार्विन सिद्धांत आपल्या डोक्यात शिल्लक आहे. डार्विनने निसर्गात परस्परपूरक आणि सहाय्यभूत होणारी कामे जीव कशी करतात हेही सांगितले आहे, पण त्याकडे आपल्या मेमरीत उरलेले नाही. सर्वेपि सुखिन: सन्तु, जो जे वांछील तो तो लाहो वगैरे सगळी वानगी आपण पुराणातली म्हणून टाकून दिली आहेत. 
परस्परपूरक समाज आणि निसर्ग हे आताही शक्य आहे. नवयुगाच्या नवीन रचनांचे सृजन त्यासाठी करायचे आहे. तसे घडतेही आहे. आपण फक्त आपल्या सततच्या अपग्रेडिंगच्या धबडग्यातून श्वास घेण्यापुरता वेळ काढला पाहिजे. मग आपणही त्या सृजनात सामील होऊ.
 
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत. )