शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

निमित्त. ब्ल्यू मोरमॉन!

By admin | Updated: June 27, 2015 18:13 IST

‘ब्ल्यू मोरमॉन’च्या निमित्तानं ‘राज्य फुलपाखरू’ घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. निर्णय स्तुत्यच, मात्र कोणतीही मानचिन्हं ठरवताना त्याचे निश्चित मापदंडही असावेत. तसं केलं तर अनेक राज्यांतील मानचिन्हं बदलतील, समर्पक होतील.

- डॉ. राजू कसंबे
 
इंद्रधनुष्यालाही लाजवेल असे मनोहारी रंग अंगावर धारण करून उडणारं फुलपाखरू पाहून मन हरखलं नाही असा माणूस सापडणं तसं विरळच. याच फुलपाखरांनी सामान्य माणसांपासून तर कवी, लेखकांर्पयत सर्वाच्या मनावर कायमच गारुड केलेलं असलं, तरी फुलपाखरांना राज्याचं मानचिन्ह म्हणून अद्याप तरी मान्यता नव्हती.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘ब्ल्यू मोरमॉन’ या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून मान्यता देण्याचा स्तुत्य निर्णय नुकताच घेण्यात आला. निसर्गप्रेमींनीही त्याचं आवजरून कौतुक केलं. यानिमित्तानं ‘राज्य फुलपाखरू’ घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. 
महाराष्ट्र राज्याची इतर मानचिन्हं म्हणजे शेकरू हा प्राणी, हरियाल हा पक्षी, आंबा हा वृक्ष आणि जारूळ हे फूल.
‘ब्ल्यू मोरमॉन’ला राज्य फुलपाखरू घोषित केल्याच्या निमित्तानं महाराष्ट्रानं फुलपाखरांचं निसर्गातलं महत्त्व अधोरेखित करण्यात पुढाकार घेतला आहे. वन्यजीवसंवर्धन म्हणजे केवळ वाघ अथवा मोठे प्राणीच नव्हे, तर संपूर्ण जैवविविधतेचं संवर्धन. त्यात छोटय़ात छोटे कीटकसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात.
‘राज्य फुलपाखरू’ घोषित करण्यात महाराष्ट्रानं तर आघाडी घेतली, आता इतरही राज्यं आपलं अनुकरण करतील अशी आशा करायला हरकत नाही.
मात्र अशी मानचिन्हं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा त्याचे निश्चित मापदंडही असायला हवेत. तसं असलं तर इतरही अनेक निर्णय राज्य सरकारांना घेता आले असते. उदाहरणार्थ राज्य पक्षी ठरवताना त्या पक्ष्याची प्रदेशनिष्ठता, संवर्धनमूल्य, ती प्रजाती संकटग्रस्त अथवा दुर्मीळ आहे का, तसेच त्याचे सौंदर्यमूल्य बघितले गेले तर अनेक राज्यांना त्यांचे पक्षी अथवा इतर राज्य मानचिन्हे बदलावी लागतील. पण काही राज्यांची मानचिन्हे ख:या अर्थानं त्या राज्यांची ओळख पटवतात. जसं मणिपूर राज्याचा राज्यप्राणी ‘संगाय’ हरीण व फूल ‘सेरॉय लिली’ असून, दोन्ही प्रजाती मणिपूर सोडून जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. त्यामुळे ही मानचिन्हे मणिपूर राज्याची ओळख वा मानचिन्ह होण्यास पात्र आहेत. 
आणखी काही राज्यांचे ‘राज्यप्राणी’ जसे आसामचा ‘गेंडा’ व गुजरातचे ‘सिंह’ हे प्राणी त्या त्या राज्याची ओळख पटवतात आणि त्या राज्याचं त्या विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठीचं (आणि आता पर्यटनमूल्याचं) महत्त्व आपल्या मनावर ठसवतात. अशीच सुंदर उदाहरणं म्हणजे जम्मू-काश्मीरचा राज्यपक्षी काळ्या मानेचा क्रौंच, राजस्थानचा गोदावन (माळढोक), गुजरातचा मोठा रोहित व आसामचा राज्यपक्षी पांढ:या पंखाचं रानबदक! या पक्षी प्रजातीसुद्धा आता त्या राज्यांची ओळख झाल्या आहेत. 
या दृष्टीने विचार केला तर अनेक राज्यांची मानचिन्हं बदलण्याची आवश्यकता असल्याचं जाणवतं. 
जसं, महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल महाराष्ट्राची ओळख बनू शकत नाही असे वाटतं. त्याऐवजी रानपिंगळा हा 113 वर्षानंतर महाराष्ट्रात पुनशरेध लागलेला घुबड प्रजातीतील पक्षी ‘योग्य उमेदवार’ ठरू शकतो. घुबड हे लक्ष्मीचं वाहन असून, शेतीच्या दृष्टीने 
अत्यंत उपयोगी पक्षी आहे. विशेष म्हणजे, रानपिंगळा (मध्य प्रदेशातील बोटावर मोजण्याइतके पक्षी वगळता) केवळ महाराष्ट्रात आढळतो. रानपिंगळ्याला राज्यपक्षी केल्यास अंधश्रद्धेपोटी किंवा जादूटोण्याच्या नावाखाली घुबडांची होत असलेली हत्त्या थांबेल व ख:या अर्थानं घुबडाला राज्यपक्षी घोषित करणारं महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातलं पहिलं राज्य ठरू शकेल.
 परिसंस्थेतलं महत्त्व
फुलपाखराचं अन्नसाखळीतलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक पक्षी प्रजातींचा प्रजनन काळ हा कीटक-फुलपाखरांची संख्या जेव्हा सर्वाधिक असते त्या काळात अर्थात पावसाळ्यात असतो. बुलबुल, कोतवाल (ड्रोंगो), वेडे राघू (बी-इटर) इत्यादि प्रजातीच्या पक्ष्यांच्या आहारात फुलपाखरांचं प्रमाण बरंच असतं. फुलपाखरांच्या परागीभवनामुळे तर अनेक वनस्पतींच्या नवनवीन प्रजाती उत्क्रांत पावतात. फुलपाखरं कुठल्याही परिसंस्थेच्या प्रतीचं आणि तिथे झालेल्या बदलांचं निदर्शक असतात. त्यांचा अभ्यास केला तर विशिष्ट जंगल किती समृद्ध आहे हे लक्षात येतं. म्हणून फुलपाखरांच्या अभ्यासाला फार महत्त्व आहे. ‘राज्य फुलपाखरू’मुळे त्याला चालना मिळू शकेल.
 अनेक जाती संकटग्रस्त
संपूर्ण जगात फुलपाखरांच्या अनेक प्रजातींची संख्या रोडावते आहे. अनेक प्रजाती विलुप्त झाल्या आहेत.  भारतातील फुलपाखरांच्या एकूण 45क् प्रजाती संरक्षित असून, पहिल्या परिशिष्टात त्यापैकी 128 प्रजातींचा समावेश आहे. 
अमेरिकेसारख्या देशात मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराच्या मार्गातील जंगलांचे अनेक भाग ‘मोनार्क बटरफ्लाय बायोस्फेअर रिझर्व’ म्हणून संरक्षित करण्यात आले आहेत. आपल्याकडे तर फुलपाखरे कुठून कुठे स्थलांतर करतात त्याचाच आपल्याला अजून थांगपत्ता नाही! ‘ब्ल्यू मोरमॉन’च्या निमित्तानं आपल्या मानसिकतेत आणि कायद्यात थोडासा बदल केला तरी बरंच काही साध्य करता येईल.
 
 
‘राणी पाकोळी’!
‘ब्ल्यू मोरमॉन’ या फुलपाखराला महाराष्ट्राच्या प्राणिकोषातलं अस्सल मराठी नाव आहे ‘राणी पाकोळी’! संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळतं. पण सह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात तुलनेत त्यांचं प्रमाण अधिक! सातपुडा पर्वतरांगा, ताडोबा आणि विदर्भातील इतर जंगलांमध्ये ते तुरळक प्रमाणात आढळतं. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खूप शहरीकरण झालेलं आहे, अशा मुंबईत, अगदी कुलाब्यार्पयत तसंच नागपूरला महाराजबाग परिसरातसुद्धा हे फुलपाखरू दिसतं.
आकाराने (म्हणजे पंख विस्तार - दोन्ही पंख सपाट उघडे ठेवून दोन पंखांच्या टोकांमधील मोजमाप) 15 सेंटीमीटर्पयत असणा:या या फुलपाखराचं शरीर आणि पंख काळे असतात. पुढील व मागील पंखांवर निळे पट्टे, मागच्या पंखांच्या निळ्या रंगावर स्पष्ट काळ्या खुणा असतात. खालील बाजूस पंखांच्या शरीराकडील टोकावर चटकदार लाल ठिपका असतो. वेगात उडताना त्याच्या काळ्या पंखांवरची निळी झळाळी सहजच आपलं लक्ष वेधून घेते. 
हे फुलपाखरू लिंबूवर्गीय वनस्पती (संत्री, इडलिंबू, मोसंबी इ.) तसेच ‘ग्लिकॉसमिस अबरेरिआ’ व अॅटलांटिआ’वर्गीय वनस्पतींवर अंडी घालतं. फुलांतला मधुरस चाखायला तसंच चिखलातून क्षारशोषण करायला त्याला खूप आवडतं. पण फुलांना भेट देताना ते स्वस्थ बसत नाही. आपले पंख सतत फडफडत ठेवतं. त्यामुळे फुलावर बसलेलं असतानाचं त्याचं छायाचित्र घेणं तसं आव्हानच. पण दुपारच्या वेळेस ते पंख उघडे ठेवून छान विश्रंती घेताना दिसलंच तर छायाचित्रकाराची लॉटरीच!
(लेखक ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे प्रकल्प अधिकारी व ‘महाराष्ट्रातील फुलपाखरे’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)