गूढरम्यतेची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:00 IST2016-12-06T15:00:00+5:302016-12-06T15:00:00+5:30

प्रेक्षकांना गूढ रहस्य असणाºया मालिका सध्या छोटया पडदयावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच गूढ रहस्य असणाºया मालिकांचे ...

Mysteriousness | गूढरम्यतेची चाहूल

गूढरम्यतेची चाहूल

रेक्षकांना गूढ रहस्य असणाºया मालिका सध्या छोटया पडदयावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच गूढ रहस्य असणाºया मालिकांचे प्रमाण मराठीमध्येदेखील पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनी वर चाहूल ही नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ही मालिका १२ डिसेंबर पासून बघायला मिळणार आहे. प्रत्येकाला जाणीवे पलीकडच्या गूढरम्यतेचं आकर्षण असतं आणि त्याविषयी भीतीही असते. याच भयाच्या भावनेला चाहूल या मालिकेतून साद घालण्यात येणार आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम केल्यानंतर त्याला विसरणं अशक्य असतं आणि ती व्यक्ती आपली न होता कोणा दुसºयाची होणार आहे, ही भावना तर असह्य असते. मग सुरू होतो खेळ, एक अधुरी प्रेमकहाणी जन्मजन्मान्तरी पूर्ण करण्याचा... आयुष्यसंपलं तरी प्रेम संपत नाही, या न्यायाने रहस्याच्या आधारे भीती आणि प्रीतीच्या प्रवासाचा... हीच चित्तथरारक प्रेमकहाणी चाहूल मालिकेत साकार होणार आहे. चांगल्या कमार्चं फळ हे चांगलंच मिळतं आणि दुष्कृत्याचं फळ हे वाईटच असतं, या सर्वमान्य कर्मसिद्धांतावर ही मालिका आधारित आहे. गूढ-रहस्य, अतृप्त इच्छा आणि अपुरं प्रेम या सगळ्यांचे नातेसंबंधांवर, कुटुंबावर उमटणारे पडसाद म्हणजे चाहूल ही मालिका. चाहूल या मालिकेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लीझान ही परदेशी युवती या मालिकेत जेनिफरची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका परदेशी युवतीने नायिकेची भूमिका करणं, हे मराठी दैनंदिन मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.याखेरीज कमला मालिकेत अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता अक्षर कोठारी सजेर्रावची भूमिका साकारणार आहे. तसेच शाश्वती पिंपळकर, माधव अभ्यंकर, उमा गोखले, विजय मिश्रा, प्रज्ञा जाधव हे कलाकारही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 









Web Title: Mysteriousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.