शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मेक इन व्हिलेज !

By admin | Updated: May 9, 2015 20:33 IST

गावात बारा बलुतेदार असायचे. त्यातला एखादा मास्टर असला की त्याच्या नावाने अख्खे गाव ओळखले जायचे. आता परिस्थिती बदलली.

 गजानन दिवाण, (लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीचे उपवृत्त संपादक आहेत) - 

गावात बारा बलुतेदार असायचे. त्यातला एखादा मास्टर असला की त्याच्या नावाने अख्खे गाव ओळखले जायचे. आता परिस्थिती बदलली. गावच्या नाभिकाने गावातच किंवा शहरात जाऊन दुकान थाटले. घोंगडी करणा:यांना शेळ्यांना विकून पैसा मिळविणो सोपे वाटू लागले. सुताराला शेतक:यांकडून वर्षाला धान्य घेण्यापेक्षा पैसे घेणो सोयीचे वाटू लागले. इतर सा:या बलुतेदारांचेही तेच. हळूहळू ही बलुतेदारीच संपुष्टात आली आणि त्या-त्या गावांची वेगळी ओळखही नाहीशी झाली. गावातला छोटय़ातला छोटा बलुतेदारही शहर, जिल्हा, महानगरार्पयत पोहोचला. तरुणांचा भार शहरांवर, तर म्हाता:यांचा भार गावांवर वाढला. ज्याला पर्याय नाही आणि ज्याच्या हातात वय नाही ते गावचे, आणि जे रोजगारक्षम, कमावत्या हातांचे आणि कौशल्याचे ते सारे शहरात उडालेले, असा अलिखित नियम बनू लागला. देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहत असताना केवळ शहरे सुधारून कसे चालेल.? 

कापूस गावात पिकतो. शेतकरी आपल्या शेतात तो पिकवतो; मात्र त्यावर प्रक्रिया होते शहरात.. शेतकरी झोपडीतच राहतो, फारफारतर दगड-विटांचे एखादे घर  बांधतो, पण इमल्यावर इमले चढतात ते शहरात.  पिकविण्यापासून ते प्रक्रिया उद्योगांर्पयत सारेच गावात झाले तर शहरांवर हा ताण वाढणार नाही आणि गावचे गावपणही जाणार नाही. 
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हेच तर हवे होते. खेडय़ाकडे चला, ही त्यांची हाक आधुनिक भारताच्या नियोजनकत्र्यार्पयत  पोहोचलीच असे नाही; पण साता समुद्रापारच्या जर्मनीला मात्र ती महत्त्वाची वाटली. म्हणूनच, अख्खी गावेच्या गावे बदलून दाखवली या देशाने. छोटी गावे, त्या एकेका गावात एका सूत्रभोवती उभे राहणारे उद्योग आणि एका गावाला एका विशिष्ट उत्पादनाशी जोडून घेऊन मोठे औद्योगिक यंत्र फिरवण्याची क्लृप्ती, हे गणित जर्मनीने  अचूक जमवले आहे. इतके, की ‘खेडय़ाकडे चला’ म्हणणा:या राष्ट्रपित्याचा आजवर शहरांना सुजवण्यामागे लागलेला देश आता जर्मनीच्या मार्गाने जावे असे ठरवतो आहे.
 केंद्र सरकारने  ‘मेक इन इंडिया’चा, तर राज्य शासनाने ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा दिला. याही पुढे जाऊन आता ‘मेक इन व्हिलेज’ची नवी हाक समोर आली आहे.  
जर्मनीतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये जर्मनीचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांसोबत या शिष्टमंडळात मूळचे परळीचे आणि आता पुण्यात स्थायिक झालेले 33 वर्षीय उद्योजक भरत गिते, बुलडाण्याचे बाळासाहेब दराडे आणि लातूरचे विजय केंद्रे हेदेखील होते. जर्मनीच्या दौ:यावरून परतलेले आणि गावच्या मातीशी नाळ असलेले हे मराठी उद्योजक आता  ‘खेडय़ाकडे जाण्याचा’ नवा प्रयोग करण्यास आतुरले आहेत.
साधारण कुठलाही परदेशी नागरिक पहिल्याच भेटीत मित्र बनू शकतो आणि दुस:याच दिवशी तो या मैत्रीला गुडबायदेखील करू शकतो.. जर्मन नागरिक कुठलाच निर्णय असा झटपट घेत नाही. त्यासाठी अनेक दिवस-महिने-वर्षेसुद्धा लागतात; मात्र त्यांचा 
 
एकदा झालेला निर्णय पक्का असतो.. जर्मन लोकांचा हाच गुण हेरून त्यांच्या मदतीने भारतात ‘मेक इन व्हिलेज’ची संकल्पना वास्तवात आणण्याचे प्रय} सुरू झाले आहेत.  
 मर्सिडीज, फोक्सव्ॉगन अशा मोठय़ा जर्मन कंपन्या याआधीच आपल्याकडे आल्या आहेत. भारतात सध्याच्या स्थितीत 8क्क् जर्मन कंपन्या आहेत. त्यातील तब्बल 3क्क् ते 35क् कंपन्या एकटय़ा पुण्यात आहेत. जर्मन लोकांना पुणो शहर भावले आहे. त्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ, संस्कृती, दळणवळणाची साधने आणि इतर सुविधा पुण्यातून त्यांना मिळतात. जर्मन भांडवलाबरोबरच औद्योगिक विकासाचा जर्मन पॅटर्न स्वीकारण्याच्या दिशेने आता विचार सुरू झाला आहे.
आधीच फुगत गेलेल्या शहरांमध्ये नवी गुंतवणूक करून त्यांचा आकार आणखी सुजू देणो जर्मनीने कटाक्षाने टाळले आहे. औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य प्रक्रियेत शहरांवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी/ टाळण्यासाठी गावातल्या गावातच तरुणांच्या हाताला कामे द्यायला हवीत. जर्मनी आणि त्यांचा ट्रेडिंग पार्टनर स्वीत्ङरलडने हे साधे सूत्र दीर्घकालीन नियोजनातून प्रत्यक्षात उतरवले आहे. 
 राडो कंपनीचे घडय़ाळ घातलेल्या मनगटात काय ताकद असते, हे तो ब्रॅण्ड वापरणा:यालाच ठाऊक. सर्वसामान्यांच्या वर्षाच्या किराणा बिलापेक्षाही जास्त किमतीचे हे घडय़ाळ बनविते कोण? - तर स्वीत्ङरलडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेले लेंगनाऊ हे गाव. शेती करण्यात पारंगत असलेले हे गाव हळूहळू घडय़ाळ निर्मितीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. 1889 ते 1927 या काळात घडय़ाळांच्या डझनावर कंपन्यांनी येथे कारखाने थाटले. राडो हे त्यापैकी एक. सोबत अनेक कारखानेही आले.  1857 साली येथे रेल्वेस्थानक उघडले गेले आणि दळणवळण आणखी सोयीचे झाले. या छोट्या गावात केवळ 2.6 टक्के परिसर औद्योगिकीकरणाने व्यापला आहे. डिसेंबर 2क्13 च्या गणनेनुसार चार हजार 672 लोकसंख्येचे हे गाव. गावातील 1459 नागरिक नगरपंचायतीतच कामाला आहेत. प्रायमरी इकॉनॉमिक सेक्टरमध्ये 1क् कंपन्या असून यात 31 जण काम करतात, सेकंडरी सेक्टरमध्ये 7क् कंपन्या असून यात 567 जण काम करतात. गावातील 87 टक्के लोक जर्मन भाषा बोलतात. कामाला जाण्यासाठी गावातील केवळ 15 टक्के नागरिक सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. उर्वरित नागरिक खाजगी कारनेच ऑफिसला जातात. गावक:यांच्या खिशात पैसा किती, याचा अंदाज यावरून यावा. स्वत:चे ब्रॉडबॅण्ड नेटवर्क तयार करणारे उत्तर जर्मनीतील लोवेनस्टेट हे आणखी एक गाव.
- अशी कितीतरी उदाहरणो देता येतील. मर्सिडीज किंवा फोक्सव्ॉगनच्या अग्निशामक वाहनांच्या बांधणीसाठी प्रसिद्ध असलेले जर्मनीतील बॅलन डार्फ. आपल्याकडे मोठय़ा फायरस्टेशनमध्ये असलेल्या गाडय़ांवर पाठीमागे ‘फिटिंग इन बॅलन डार्फ’ असा उल्लेख आढळतो.  वाईल्डपोल्डराईड हे असेच आणखी एक गाव. सौर ऊर्जा निर्मितीत बाप असलेले हे गाव स्वत:च्या गरजेपेक्षा तब्बल 381 टक्के जास्त ऊर्जानिर्मिती करते. या गावाची वार्षिक उलाढाल 5.7 दशलक्ष डॉलर्स आहे.. 
जर्मनीला जमले ते भारताला का जमणार नाही?- असा विचार आता मूळ धरू लागला आहे. जर्मनीतील 9क् टक्के उद्योग हे लघु आणि मध्यम आहेत. जर्मनीची लोकसंख्या 8 कोटींच्या घरात आहे. यातील तब्बल 1.57 कोटी लोकसंख्या लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित आहे. मोठय़ा उद्योगांबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांचे जाळे भारताच्या गावागावात पसरावे यासाठी आता प्रय} केले जात आहेत. या माध्यमातूनच भारतात ‘मेक इन व्हिलेज’ आकाराला येणार आहे.  
सुरुवातीलाच म्हटल्यापमाणो हे भारताला नवे नाही. आधुनिक अर्थव्यवस्थेआधी या देशात अस्तित्वात असलेली बलुतेदारी म्हणजे तरी वेगळे ते काय होते? या व्यवस्थेला पुढे चिकटलेली सामाजिक उतरंड आणि तिचे दुष्परिणाम क्षणभर नजरेआड केले, तर बलुतेदारीचा अर्थ काय होता?- एकच काम, पण ते विलक्षण कसबाने करणा:यांचे गावागावात वसलेले गट! 
 मराठवाडय़ातील उदगीरचा अडकित्ता असो वा चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जवळील हुपरी.. जिल्ह्या जिल्ह्यांत अशी गावे मिळतील. हे असे मेक इन व्हिलेज आमच्याकडे आहेच की ! या पारंपरिक व्यवस्थेतले शोषण दूर करून नव्या अर्थव्यवस्थेशी तिची नाळ जोडणो आणि गावागावातल्या तरुण मनुष्यबळाला गावाच्या वेशीच्या आतच काम देणो हे नवे तंत्र आता आत्मसात करावे लागेल.
गुणवत्तेशी तडजोड न करणो, गावखेडय़ात बनलेली उत्पादने देशोदेशीच्या बाजारात आपली मुद्रा कोरतील, अशा दर्जाचा ध्यास धरणो आणि सातासमुद्रापार जाण्याची जिद्द बाळगणो या नव्या गोष्टी आहेत; नव्याने जाग्या होणा:या भारताच्या खेडय़ांना त्या आता शिकाव्या लागतील.