शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लाईट , कॅमेरा, अॅक्शन

By admin | Updated: September 12, 2015 18:03 IST

आमच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी देहरादूनच्या दोन वर्षाच्या (1977-78) प्रशिक्षण काळातील कामगिरीवर आधारित आम्हाला काही पुरस्कार दिले गेले होते

 प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
आमच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी देहरादूनच्या दोन वर्षाच्या (1977-78) प्रशिक्षण काळातील कामगिरीवर आधारित आम्हाला काही पुरस्कार दिले गेले होते. अभ्यासक्रमाबाहेरील कामगिरीवर आधारित पुरस्कार मला प्राप्त झाला होता. पुरस्कारात गौरवपत्र व वन्यजीवविषयक पुस्तकांचा मोठा संच दिला होता. हा पुरस्कार तेव्हाचे कृषिमंत्री सुरजितसिंग बर्नाला ह्यांच्या हस्ते मिळाला होता. (त्याकाळी वन खातं कृषिमंत्र्यांकडे होतं.) मसुरीच्या अकादमीतल्या चार महिन्यांच्या प्रशिक्षणात भारतीय वन सेवा, पोलीस सेवा व प्रशासन सेवेच्या अधिका:यांचा तो मिश्र समूह असतो. छंद वर्गाचा सेक्रेटरी ह्या फार मागणी असणा:या पदाचा मी अधिकारी होतो. गाण्याचे जलसे, फोटोग्राफी प्रदर्शनं, ट्रेक्स, पक्षी निरीक्षण असे त्यावेळी केलेले उपक्रम आठवतात. आणि हो, ‘टाकाऊतून सृजन’ असा नावीन्यपूर्ण उपक्रमही आम्ही राबवला होता. मला वाटलं, या माङया दोन उद्योगांचं महत्त्व इथल्यापुरतंच राहील, नोकरीत याचा काही उपयोग होणार नाही. पण तसं नव्हतं. माझा हा कल माङया पूर्ण नोकरीत चिकटून राहिला होता. त्यामुळे माङयातला निसर्गप्रेमी व्यक्त व्हायला व पर्यायाने प्रतिकूल प्रसंगातही आनंद घ्यायला मदत झाली.  
लाईट - तारुबंद्याच्या विश्रमगृहातल्या एकटेवाण्या दिवसांत माङो छंद माङो मित्र बनले होते. ब:याचदा रात्रीच्या जेवणानंतर माझा बिछाना व्हरांडय़ात लावून मला एकटय़ाला सोडून माझा ऑर्डर्ली गावात जाण्यासाठी सटकायचा. मागच्या व्हरांडय़ातल्या कंदिलाकडे बरेच नाकतोडे, किडे, पतंग आणि बरेचसे किडेमकोडे जवळपासच्या जंगलातून आकृष्ट होत आणि माझा संग्रह वाढत चालला होता. सर्वात मौल्यवान म्हणजे 15 सेमी लांबीचा हिरवट निळा पतंग होता. 
अशाच एका अमावास्येच्या रात्री व्हरांडय़ात मी एकटाच होतो. पावसाळा अजून सरला नव्हता. पण त्या रात्री आकाश निरभ्र होतं. भोजनानंतरची हलकीशी शतपावली करावी ही कल्पना चांगली होती. आकाश ग्रह-ता:यांनी खच्चून भरलेलं होतं. रात्रीचा हा नजारा म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती. आजूबाजूला विजेचं अस्तित्व नसल्यानं सुस्पष्ट दिसणा:या आकाशगंगा म्हणजे आकाशदशर्नासाठी पर्वणीच होती. मी रस्त्यावरच्या एका वळणाशी आलो आणि एक आगळंवेगळं दृश्य माङयासमोर ठाकलं. विश्रमगृहापासून अध्र्या किलोमीटरवर चमचमणारं मोठं झाड मी पाहिलं होतं. स्मशानाच्या जराशा मागच्या दरीत हे झाड होतं. हे झाड जवळ जाऊन पाहावं अशी लालसा निर्माण झाली होती. मी एकटाच असल्याने क्षणभर यावर चिंतन केलं. पण हा अविचार होऊन माङया जिवावर बेतू शकतं हे मला माहीत होतं. त्यामुळे तो विचार बाजूला सारून विश्रमगृहातून दुर्बीण घेतली आणि तो आश्चर्यजनक प्रकार पाहण्यासाठी त्या वळणावर एकटाच गेलो. तो ऐनाचा भला मोठा (शंभर फुटावरचा) वृक्ष लाखभर काजव्यांनी लडबडला होता. लक्षावधी काजव्यांची एकाच वेळी होणारी प्रकाशाची उघडझाप कमालीची लयबद्ध होती. वृक्ष बुंध्यापासून वर शेंडय़ापर्यंत चमकत जात होता. तीन-चार सेकंदात जाणारी प्रकाशाची लाट, त्यानंतर दोन सेकंदाचा मिट्ट काळोख आणि परत तीच प्रकाशाची हलकी लाट असा खेळ चालू होता. मी भारावून, हरवून गेलो होतो. मसणातल्या घुबडाच्या कर्कश आवाजाने माझी समाधी भंग पावली. तृप्त होऊन मी विश्रमगृहाकडे धाव घेतली. माङया  मन:पटलावर ते दृश्य कायमचं कोरलं गेलं आहे. करोडो रुपये खर्चूनही कृत्रिमरीत्या हे दृश्य निर्माण करता आलं नसतं आणि ते पाहण्याचा मला पगार मिळत होता!
कॅमेरा - तारुबंद्यापासून पंधरा किलोमीटरवर असणा:या हरिसालला आमचा आठवडी बाजार होता. इतर गावक:यांप्रमाणो मीही ह्या बाजार दिवसाची वाट पाहत असे. आदिवासी तरुण-तरुणींसाठी हा आठवडी बाजार म्हणजे खरंतर एकत्र येण्यासाठी छान निमित्त असायचं. जीवनाचा साथीदार शोधण्याचं ठिकाण म्हणूनही त्याचा उपयोग होत असे. या आकर्षणापोटी जवळपासच्या गावातूनच नव्हे, तर पन्नास किलोमीटर अंतरावरून आदिवासी बाजाराला येत. त्यासाठी ते पहाटे पाचला निघत आणि मध्यरात्री परतत असत. संध्याकाळची वेळ म्हणजे मोहाच्या दारूचा आस्वाद घेण्याची असे. खिशात खुळखुळणा:या पैशाच्या हिशेबात ते घरी जाण्यापूर्वी तृप्त होत. (गावाकडची दुस्तर वाट सुसह्य होण्यासाठी आणखी एक घोट.)
या मोहाच्या दारू ढोसण्यावरून मला एक विनोदी प्रसंग आठवला. एका बुधवारी संध्याकाळी मी चौराकुंडहून हरिसालला छप्पर उघडलेल्या (वन्यप्राणी बघण्यासाठी) जीपमधून येत होतो. हरिसालपासून दहाएक किलोमीटरवर असताना वाटेत रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत एक मोठं अस्वल त्याच्या आवडत्या खाद्यावर वाळवीवर आडवा हात मारत असलेलं दिसलं. त्याचा चांगला फोटो घेण्यासाठी मी रस्ता सोडून थोडा आत घुसलो. साधारणपणो जंगली श्वापदं मनुष्य सहवासाचा तिटकारा करतात आणि दूर निघून जातात. पण ह्या अस्वलाने दोन पायावर उभं राहून जीपवर हल्ला करण्याचा पवित्र घेतला. तो जीपपासून पाच मीटरवर आल्यावर परत चार पायावर आला व त्याने हल्ल्याचा विचार सोडून दिला. पण त्याचा तो आक्रमक आवेश पाहून मी गाडी रिव्हर्समध्ये घेऊन परत रस्त्यावर आलो. अस्वलाचं ते वागणं मला गमतीशीर वाटल्याने मी त्याचा पाठलाग करत फोटो घेणं चालूच ठेवलं. त्याचा परिणामस्वरूप त्याने चार-पाच लुटुपुटीचे हल्ले चढवले. मी थोडय़ा वेळाने त्याचा नाद सोडला आणि हरिसालच्या दिशेने निघालो. शंभरएक मीटरवर गेलो असेल नसेल, तोच पाच-सहा आदिवासी तरुण मुलं हातात हात गुंफून झुलत झुलत गात येताना दिसले. मी विचार केला की त्यांना जवळ असलेल्या चिडलेल्या अस्वलाबाबत सावध करावं आणि म्हणून मी जीप थांबवली. ते सगळे थांबले. त्यांना एकेकटय़ाला स्वतंत्रपणो उभं राहणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते जीपच्या बॉनेटवर झुकले होते. त्यांनी माझा इशारा नीट ऐकला, शंका विचारल्या आणि त्यांची खात्री पटली की आपण संभाव्य प्रसंगाला तोंड देऊ शकतो. त्यांनी माङो आभार मानले व जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यातला कोणीही एकदुस:याचा आधार घेतल्याशिवाय स्वतंत्रपणो उभा राहू शकत नव्हता. मला आणि माङया  ड्रायव्हरला त्याची साखळी जोडून त्यांना मार्गस्थ करण्यात बरेच श्रम पडले. अशी ‘मोह’मयी जादू होती ती!
अॅक्शन - तारुबंद्याच्या विश्रमगृहातल्या माङया वास्तव्यात असाच एक मजेशीर प्रसंग घडला होता. एके रात्री मी व माङया सहका:याने रात्रीच्या गस्तीला जायचं ठरवलं. नेहमीप्रमाणो विश्रमगृहातल्या खुंटीला टांगलेला माझा खाकी शर्ट काढून पॅण्टमधे छानपैकी खोचला आणि स्टिअरिंगवर बसून हरिसालच्या दिशेने निघालो. अर्धा एक तास झाला असेल, माङया  शर्टात कसलीतरी हुळहुळ जाणवू लागली. मी लगेच ब्रेक लावले आणि जीपच्या बाहेर उडी मारली. हेडलाईटच्या उजेडात मी माझा शर्ट बाहेर काढला तेव्हा माङया सहका:याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. कारण माङया शर्टातून साधारण दहा इंची सापासारखा प्राणी बाहेर पडला. क्षणभर थबकून तो चटकन जवळच्या झाडीत नाहीसा झाला. माङया शर्टात बसून आमच्या जीपमधून फुकटची सैर करणारी ती सापसुरळी होती. हा सरपटणारा पाहुणा काही हालचाल न करता माङया शर्टाच्या आत शरीराजवळ चिकटून बसला होता. मला न चावता ती सापसुरळी अर्धा तास शांतपणो बसली होती. त्यातून मी निसर्गाचा एक महत्त्वाचा धडा शिकलो- जोपर्यंत तुम्ही त्यांना काही इजा करत नाही तोपर्यंत सहसा ते तुम्हाला इजा करणार नाहीत. अशा प्रकारे माङो छंद माङया  तारुबंद्याच्या विश्रमगृहातील वास्तव्यात जिवलग मित्र बनले. एक महिन्यानंतर मी गावात एका डॉक्टरच्या घरात स्थलांतर केलं आणि माङया आयुष्यातले पुढचे सहा रोमहर्षक महिने मी तिथे घालवले.
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त 
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
 
pjthosre@hotmail.com