शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

खालसावाली भीड

By admin | Updated: July 11, 2015 18:32 IST

कुंभमेळ्यात साधू चिमूटभर, संसारी माणसांचीच गर्दी मोठी असते. कुठूनकुठून येतात ही माणसं! येतात आणि खालशात मिळेल तिथं पथा:या लावतात. - खायचं काय नी राहायचं कुठं? असले प्रश्न हे बायाबापे विचारत नाहीत. त्यांना फक्त गंगा नहायला कुंभात यायचं असतं.

- मेघना ढोके
 
कुंभमेळा फक्त साधूंचा नसतो!
साधू समाजाचे लाडकोड होतात, कुंभमेळ्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला सळो की पळो करून सोडणारे साधू समाजाचे  म्होरके आदळआपट करून आपलं ‘अस्तित्व’ दाखवण्याचा प्रयत्न करतात. शाही पर्वण्यांच्या दिवशी साधूंच्या मिरवणुका निघतात आणि मानापानाप्रमाणं त्या साधूंची शाहीस्नानं पार पडतात. एरवी ते  साधुग्रामातल्या आपापल्या आखाडय़ात बसून भजन-कीर्तन करतात, काही प्रवचनं करतात, तर काही ‘नाम के वास्ते’ साधू असलेले चिलीम ओढत पथा:या टाकून पडून राहतात. काही तारेत असतात, तर काही ‘हट’योगवाले स्वत:भोवती जमलेल्या गर्दीला स्वत:विषयीच माहिती देत राहतात!
- हा झाला कुंभमेळ्याचा एक चेहरा!
पण पर्वणीच्या दिवशी गंगेत बुटकुळी मारायला मिळावी म्हणून येणारी संसारी माणसं या ‘साधूं’पेक्षा कितीतरी जास्त असतात. आकडय़ांच्या भाषेत सांगायचं तर जमलेल्या एकूण गर्दीत साधू जेमतेम 1क् टक्के असतील. मग लाखालाखांची संख्या भरवणारे बाकीचे कोण असतात? 
- तर तो सगळा भाविकांचा पूर! त्या पुरातले हे सश्रद्ध लाटांचे लोंढे गंगेत बुटकुळी मारून आखाडय़ातल्या अन्नछत्रत जेवायला पंगती धरतात. मिळेल त्या आखाडय़ात ‘आसन’ लावतात. हॉटेल्स तर दूरच, साध्या धर्मशाळांचीही चैन न परवडणा:या आर्थिक स्तरातून येणारी माणसं या गर्दीत बहुसंख्य असतात. जिथून आखाडय़ाचा खालसा निघतो, त्याच्या आसपासच्या गावखेडय़ातलेच असतात अनेकजण. बाबाजींच्या गाडय़ांबरोबरच निघतात किंवा नंतर गाडय़ा भरभरून निघतात आणि आपल्याला माहिती असलेल्या खालशात मिळेल तिथं पथा:या लावतात. 
असतात तरी कोण ही माणसं? कशासाठी पावसापाण्याची नाशकात येतात, अलाहाबादला जातात. जिथे कुंभ भरेल ते देशाचं टोक आटापिटा करून गाठतात? तेही काहीशे किलोमीटरचा प्रवास करून? तथाकथित शहरी-सुसंस्कृत आणि शिक्षित म्हणवणा:या माणसांना वाटतं की, ही सगळी अडाणी खेडय़ापाडय़ातली येडीगबाळी माणसं, अर्धपोटी-अशिक्षित जनता, एकदम मागास, घाणोरडे लोक आपल्या शहरात येऊन घाण करतात, गलिच्छ असतात. 
- नाशिकच्या सिंहस्थाच्या निमित्तानं आत्ताच सोशल मीडियावर सुरू झालंय की, कशाला येणार ही घाणोरडी जनता नाशकात? त्या प्रश्नात तिटकारा, किळस आणि त्या येणा:या गर्दीशी आपलं कसं काहीच नातं नाही असं सांगणारा एक सूरही असतो आणि तुच्छतेचा वासही!
2क्13 मधे अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही ‘एलिट्स’नी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती की, या (‘गलिच्छ’?) गर्दीला जरा अटकाव व्हायला हवा, येणा:या लोकांची संख्या नियंत्रित करायला हवी. आमचं शहर आणि आमचं आरोग्य यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी त्या ‘एलिट्स’ना असं सुनावलं होतं की, हा आपल्याच देशातल्या माणसांचा एक चेहरा आहे, आपलं ‘देसी’ वास्तव आहे. प्रश्न मांडायला हरकत नाही, पण ते सुधारणांसाठी असावेत. किळस करत वेगळा वर्गद्वेष त्यातून दिसू नये. 
- ती याचिका पुढं टिकली नाही. एलिट्सनी ती याचिकाही मागेच घेतली. तिथं तो विषय थांबला.
नाशकात अजून असलं काही सुरू झालेलं नसलं तरी तसा एलिट सूर इथं नाही असं काही म्हणता येत नाही! येणा:या गर्दीविषयी खासगीत का होईना नाकं मुरडली जात आहेतच.
या अशा स्वाभाविक आणि छुप्या विरोधात प्रश्न दिसतात. आपण नक्की काय नाकारतोय? ही गर्दी की त्या गर्दीचा वास्तव चेहरा? की आपल्याच देशातलं एक वास्तव, जे आजच्या तथाकथित चकचकीत विकासचित्रत आपल्याला पूर्णत: नाकारायचंच आहे? मागच्या कुंभमेळ्यात तमाम आखाडे, धर्मशाळांमध्ये फिरत असताना, साधू समाजाविषयी जितकं कुतूहल  वाटत होतं, तितकंच कुतूहल आणि उत्सुकता या गर्दीविषयी होती. सरसकट सगळी गर्दी नाही, तर जी गर्दी खालशांतून येते ती गर्दी. तिला कुंभाच्या प्रचलित भाषेत ‘खालसावाली भीड’ म्हणतात. 
 जातपात मानणा:या देशात कुंभाच्या गर्दीत मात्र हे भिन्नतेचे, उच्चनीचतेचे लवलेश दिसत नाहीत. नाही म्हणायला कुणीतरी साधूच एकदम विचारायचा, ‘कौन जात?’ आपण जात सांगितली की विषय संपला. जात हे आपल्या समाजातलं वास्तव आहे, विचारली झालं, असाच एकूण सूर. त्यात मानअपमान, तिरस्कार असं काही कधी जाणवलं नाही. आणि खालशातल्या भीडला तर जातीपातीचे वास कधी चुकून आले नाहीत. त्या गर्दीत जाऊन तिच्याशी बोलण्याची मग चटकच लागली. अर्थात ती ‘भीड’ आपल्याशी चटकन बोलत नाही, मन के पट खोलत नाही, त्यासाठी मग त्या गर्दीचाच भाग होऊन तिच्यात शिरावं लागतं.
गेल्या कुंभमेळ्यातली गोकुळाष्टमीची रात्र होती. इस्कॉनच्या पंडालमधे भजन-कीर्तन चालू होतं. कृष्णजन्म झाला, प्रसाद मिळाला आणि गर्दी पांगली. शेजारीच ओडीशातून आलेला एक खालसा होता. आणि समोर एक पार होता. चालून चालून पाय शिणले म्हणून मी त्या पारावर जाऊन टेकतच होते, तर शेजारी कुणीतरी भसकन उठून बसलं. दचकायला झालंच, तर एक पन्नाशीची बाई होती.
 बाई उठली तशी तिच्या शेजारी झोपलेली तिची नातही चटकन उठून बसली. कोण? काय? - गप्पा सुरू झाल्या? कुठल्याशा बाबाजींच्या खालशाच्या गाडय़ांमधून आजीबाई नातीसह आल्या होत्या. चार मुलींच्या पाठीवर झालेली ही पाचवी मुलगी. 12-13 वर्षाची होती. नकोशीच. आजी सांगत होत्या, तिला दुधाच्या घंगाळ्यात घातलेली मी वाचवली नी जगवली. या मुलीला कोण कुठं नेणार, तिला कधी जग दिसणार, म्हणून तिच्यासाठी मी या कुंभाला आले. नाहीतर एवढय़ा लांब आम्हाला कोण पाठवणार?
दोन-तीन दिवसांनी पुन्हा भेटल्या. रात्रीचे तीन वाजलेले असतील. बोलता बोलता एकदम म्हणाल्या,  ‘जिंदगी में पहली बार रात के तीन बजे खुले आसमांतले, सर पर बिना पल्लू लिए बैठी हूॅँ, मै तो सच गंगा नहा ली!’ - या बाईंना अडाणी, मागास म्हणण्याचं धाडस कुठल्या तोंडानं करायचं?
कुंभमेळा श्रद्धा की अंधश्रद्धा, गंगेप्रती कृतज्ञतेचा उत्सव की महान भारतीय परंपरा, समाजविषयक चिंतनमनन की पैशाचा अपव्यय - असा सारा खल ज्या काळात सुरू होतो, त्याच काळात ही गर्दी गोदाघाटाच्या ओढीनं नाशकाकडे निघते. गोदावरीत डुबकी मारण्याचं ते एक निमित्त असतं. ती अनेकांसाठी मनासारखं जगून पाहण्याची, नवीन अनुभव घेण्याची एक संधी असते. स्वातंत्र्याचा मोकळा श्वास असतो. गंगेत डुबक्या मारून पुण्य मिळतं, आपली पापं धुतली जातात असं वाटण्याइतकी ही माणसंही आता भाबडी उरलेली नसावीत कदाचित, पण तरी त्या कुंभाच्या रेटारेटीत त्यांना हवंसं असं काहीतरी मिळतंच!
ही गर्दी, तिचा चेहरा हे आपल्या समाजाचं एक ‘देसी’ वास्तव आहे. आता बारा वर्षानंतर हे वास्तव बदललंय का? बदललं असेल तर काय? आणि नसेलच बदललेलं तर त्याला जबाबदार कोण?
या सा:या प्रश्नांची उत्तरं शोधायला पुन्हा एकदा ‘खालसावाल्या भीड’मधे हरवून जायला हवं.
  ते फार सुंदर असतं, पण सोपं नसतं.
 
‘चावल-ओढना सब ठीक?’ 
‘कौन साथ आये?’ - असं ही गर्दी एकमेकांना विचारते. ‘बडा खालसा, अयोध्यावाला’ - आपल्या खालशाचं जे नाव असेल ते सांगत समोरच्यानं उत्तर दिलं की, पहिला पुन्हा विचारतो,
‘आप’?
‘तेराभाई खालसा’ - तो आपल्या खालशाचं नाव सांगतो. ‘चावल-ओढना सब ठीक?’ (म्हणजे जेवायला आणि अंथरापांघरायला मिळालंय ना नीट?)
‘राधेश्याम की किरपा रहे, गंगा नहा लिये की निकले, अगला कुंभ कौन देखे, नहीं देखे.’
ओळखपाळख नसलेल्यांचे असे ख्यालीखुशालीचे संवाद खालशात सर्रास ऐकायला मिळतात. आणि मग सगळे भाषा-राज्य नी जातपात भेद विसरून ही ‘खालसावाली भीड’ एका सरसकट चेह:याची दिसायला लागते. 
( लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com