- कुमार केतकर
गेल्या आठवडय़ात लंडन येथील ‘द गार्डियन’ या दैनिकाने एक इशारावजा भविष्यवाणी प्रकाशित केली़ ही भविष्यवाणी करणारी बातमी मग जगभरच्या वृत्तपत्रंनी प्रसिद्ध केली़ काही जागतिक दूरचित्रवाहिन्यांनी त्या बातमीला चित्रमय रूप देऊन त्या भविष्यवाणीतील ‘थरार’ अधिक धक्कादायकपणो सादर केला़
ती भविष्यवाणी काय होती? तर पुढील शंभर वा फार तर दोनशे वर्षात पृथ्वीवरील अवघी मानवजात नष्ट होणार आह़े म्हणजे फार तर पाच ते दहा पिढय़ा! मानवजात नष्ट होणार म्हणजे माणसाने उभे केलेले हे सर्व समांतर विश्वही त्याचबरोबर नष्ट होणाऱ परंतु पृथ्वी नष्ट होणार नाही़ त्याचप्रमाणो सर्वच्या सर्व जीवसृष्टी नष्ट होईल असेही नाही़ काही जीव आणि काही प्राणी राहतील; पण मानवजात मात्र नाही़ किंबहुना बहुतेक सस्तन आणि पाठीचा कणा असलेले प्राणी लयाला जातील़
फक्त मानवजातीवरच हे संकट का आले आहे?
- खरे म्हणजे फक्त मानव जातीलाच हा ‘शाप’ मिळाला आह़े, असे म्हणता येणार नाही़ असे संकट या भूतलावर पूर्वी आले आहे - नव्हे तोच संदर्भ घेऊन हा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आह़े
मेक्सिको विद्यापीठातील एक जानेमाने मानववंश शास्त्रज्ञ गेराडरे कॅबॅलोस यांनी गेल्या एक-दोन वर्षात पृथ्वीतलावरून नष्ट झालेल्या असंख्य जीव प्राणिजातींचा अभ्यास, त्यांच्या सविस्तर नोंदी व त्या त्या वेळची स्थिती याविषयीचे संशोधन करून मानवजातीवर ओढवलेल्या या संकटाबाबतची भविष्यवाणी केली आह़े
या पृथ्वीवर म्हणजे पाण्यात, वाळवंटात, जंगल-द:या-खो:यात अवघ्या भूतलावर अक्षरश: अब्जावधी जीव-जंतू-प्राणी आहेत़ सूर्यमालिकेचा जन्म साधारणपणो दहा अब्ज वर्षापूर्वीचा़ सूर्याचे आयुष्यमान म्हणजे पर्यायाने सूर्यमालिकेची ‘लाइफ लाइन’ अजून सुमारे साडेचार/पाच अब्ज वर्षे बाकी आह़े (काही लाख वर्षाची चूकभूल गृहीत धरून) म्हणजे साडेचार अब्ज वर्षानी पृथ्वी हा ग्रहच असणार नाही़ कारण सूर्य हा ताराच ‘भस्मसात’ झालेला असेल! परंतु सूर्य असा कायमचा अस्तास जाण्यापूर्वी विस्फोटकपणो विस्तारत जाईल़ म्हणजे ‘शेवटची’ सुमारे दीड-दोन अब्ज वर्षे, त्यामुळे निर्माण होणा:या महाउष्णतेत पृथ्वी बेचिराखच होणार आहे! तरीही साधारणपणो असे मानले जात असे की पृथ्वीला आणि मानवजातीला अजून किमान दोन अब्ज वर्षे तसा ‘धोका’ नाही़ त्यामुळे माणूस ‘बिनधास्त’ होता़ त्याची गेली सुमारे दहा हजार वर्षे अगदी मनमानी चालली होती़, ती त्याच बिनधास्तपणातून! पण गेल्या दीड-दोनशे वर्षात विज्ञान-तंत्रज्ञान त्याचप्रमाणो प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भविज्ञान, अंतरिक्ष संशोधन आणि मानववंशशास्त्र या शाखांमध्ये झालेल्या अभ्यासामुळे काही धोके हळूहळू पुढे येऊ लागल़े
मानवजात जन्माला येण्यापूर्वी या पृथ्वीतलावर ज्या उलथापालथी होत होत्या त्यात महाज्वालामुखी होते, महाभूकंप होत़े तसेच महात्सुनामी, महावणवे होत़े महादुष्काळ होत़े अतिमहावृष्टी होती़ त्या काळातही जीवसृष्टी जन्माला येत होती आणि लयाला जात होती़ कित्येक जीव-जाती कायमचा नष्ट झाल्या़ पण माणसाला ‘शोध’ लागला तो डायनॉसोरचा! या महाकाय डायनोसॉरच्या अनेक जाती होत्या़ उडणा:या, पोहणा:या, पळणा:या वा हे सर्व काही करणा:या़ या कर्दनकाळ-महाकाय क्रूर प्राण्याने या पृथ्वीवर स्वत:चे अधिराज्य प्रस्थापित केले होत़े काही लाख वर्षे त्या डायनोसॉरची मनमानी चालू होती़ पण पुढे ती जमातच कायमची नष्ट झाली़ ती का व कशी आली़, नक्की केव्हा नष्ट झाली याबद्दल थोडेफार वाद असले तरी बहुतेक शास्त्रज्ञ मानतात की, सुमारे एक कोटी वा अधिक वर्षापूर्वी डायनोसॉर जात नष्ट झाली़ असे प्रचंड सामथ्र्य असलेले डायनोसॉर नष्ट झाले तर माणूसप्राणी का नष्ट होणार नाही?
ही ‘नष्ट’ होण्याची प्रक्रिया का होते?
- अनेक कारणो आहेत़
पृथ्वीवर जो प्राणवायू आहे तो सर्व प्राणिसृष्टीचा खरोखरच ‘प्राण’ आह़े म्हणूनच तो त्या नावाने ओळखला जातो़ निसर्गक्रमात हा प्राणवायूच पृथ्वीतलावरून शोषला गेला तर काही मिनिटांमध्येच जीवसृष्टी लयाला जाईल़ प्रत्येक प्राण्याला लागणा:या प्राणवायूचे प्रमाण वेगवेगळे आह़े मुंगी (जिच्या किमान दहा हजार जाती आहेत), माशी आणि देवमासा, चिमणी आणि गरुड, वाघ आणि माणूस - अशा सर्व जिवांना प्राणवायू वेगवेगळ्या प्रमाणात लागतो़ डायनोसॉर इतका अजस्त्र व विराट होता की त्याला जगण्यासाठी खूप प्राणवायू लागत अस़े त्या प्राणवायूचे हवेतील प्रमाण कमी होत गेले आणि बिचारा डायनोसॉर त्या प्रक्रियेचा बळी झाला़
काहींच्या मते पृथ्वीवर एखादा धूमकेतू आदळला आणि पृथ्वीचे पर्यावरणच बदलल़े ज्यात डायनोसॉर टिकणो शक्य नव्हत़े काहींच्या मते महाज्वालामुखी व महाभूकंप होऊन डायनोसॉर नष्ट होत गेल़े सर्व शास्त्रज्ञांचे आता एका मुद्दय़ावर एकमत झाले आहे, ते म्हणजे पर्यावरणातील अनिष्ट बदल (म्हणजेच क्लायमेट चेंज क्रायसिस). हे प्राणिसंशोधन धोकादायक आह़े डायनोसॉरच त्याला बळी होता!
आज आपण नेमके त्याच अरिष्टात सापडलो आहोत़ फरक इतकाच की, हे माणसाने ओढवून घेतलेले संकट आहे!
अंतरिक्ष-आकाश-अवकाश निरीक्षणातून माणसाला अशा अनामिक संकटाची शक्यता आणि भीतीही वाटू लागली आह़े उल्का पडताना पाहिलेल्या माणसाला फार पूर्वीपासून असे वाटत आले आहे की, कुठचा तरी धूमकेतू, गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतून बाहेर सटकलेला आणि भरकटलेला लहान-मोठा ग्रह, उपग्रह अनपेक्षितपणो पृथ्वीवर येऊन आदळेल आणि सर्वत्र हाहाकार माजेल़़़
नाहीतरी आपली सूर्यमालिका अशी तुकडे होऊन नाही का विस्तारत गेली? मग एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळून आपल्या ग्रहाची शकले झाली तर? अमेरिका, रशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन या सर्व देशांनी त्यांच्या दुर्बिणी, उपग्रहातून सोडलेले रेडिओ-टेलिस्कोप आणि विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे टिपलेल्या ध्वनिलहरी व प्रकाशलहरी यांच्या मदतीने अशा वांड व ‘दिशाहीन’ धूमकेतूंचा शोध चालू ठेवला आह़े
माणसाप्रमाणोच पृथ्वीला, आपल्या सूर्यमालिकेला, या विश्वालाही नैसर्गिक वा असा अपघाती मृत्यू येऊ शकतो ही भीती फार पूर्वीपासून असली, तरी त्या भीतीचे वैज्ञानिक शक्यतेत रूपांतर झाले ते गेल्या शे-दीडशे वर्षात़ पृथ्वीवर अनेक ठिकाणी महाविवरे आहेत़ प्रचंड मोठे तलाव आहेत. ब:याच प्रकारच्या ‘कॉस्मिक’ खुणा आहेत, ज्या हे दर्शवितात की असे आघात-अपघात पूर्वी झाले आहेत़ त्यांतून कित्येक संस्कृती जन्माला येऊन नष्ट झाल्या असाव्यात़ उत्कांती प्रक्रियेला छेद देणारे (?) जीव निर्माण होऊन कायमचे नष्ट झाले असावेत असे तर्कवितर्क यासंबंधात केले गेले आहेत़
- एका थिअरीप्रमाणो डायनोसॉर पर्व असेच नष्ट झाले असाव़े काहींच्या मते ‘डायनोसॉर पर्व’ सुमारे लाख- सव्वा लाख वर्षे हळूहळू लयाला जात होते, तर काहींच्या मते ते अशा अपघातामुळे एका फटक्यात नष्ट झाल़े (‘जुरासिक पार्क’ या चित्रपटात डायनोसॉरच्या डीएनएद्वारे त्यांना पुन्हा निर्माण करता येऊ शकते, हा संकल्पना सिद्धांत मांडला आह़े ती सर्वस्वी फँटसी नाही़) म्हणूनच काही ‘कॅटॅस्ट्रोफीवादी’ ऊर्फ विनाशवादी वैज्ञानिक असे मानतात की, ही जीवसृष्टी (माणसासहित) नष्ट झाली तर आश्चर्य वाटायला नको़ परंतु माणसाची प्रज्ञा ही या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी आह़े किंबहुना हे विश्व आहे, तेच आपल्याला त्याची जाणीव आहे म्हणून आह़े प्रज्ञावान माणूसच नसेल तर विश्व असले काय, नसले काय वा कसेही असले काय, यात काय फरक पडतो? या विश्वातील तारे, ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, तारकासमूह जर ‘निर्जीव’पणो आणि प्रज्ञाहीन अवस्थेत फिरत राहिले, विस्तारत राहिले, फुटत राहिले तर राहीनात का. म्हणूनच आपण आहोत त्यामुळे या विश्वाला अर्थ आहे आणि विश्वाचा अर्थ अन्वयार्थ लावणो ही आपली ‘नैतिक’ जबाबदारी आह़े म्हणूनच माणूस व त्याची संस्कृती-प्रगल्भता अर्थात ज्ञान-विज्ञान-प्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणो हे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे.
जगातील काही माणसे आशावादी असतात आणि काही निराशावादी़ आशावाद्यांच्या दृष्टिकोनातून जीवन अधिकाधिक सुंदर, समृद्ध आणि सुखी होत जाणार आह़े जरी प्रश्न भेडसावतील, कलह होतील, अरिष्टसदृश परिस्थितीही येईल पण माणूस त्यांच्यावर मात करू शकेल़ निराशावाद्यांच्या दृष्टिकोनातून जग आता पर्यावरण विनाशाच्या अशा उंबरठय़ावर उभे आहे की :हास - कदाचित सर्वनाशही - अटळ आह़े निराशावादी जवळजवळ अशा निष्कर्षाप्रत आले आहेत की अण्वस्त्र स्पर्धा, अणुयुद्ध आणि अधिक व्यापक दहशतवाद यामुळे हे जग नष्ट होऊन अश्मयुगात जाऊन थडकेल़ वाढती लोकसंख्या आणि क्षीण होत जाणारे ऊर्जा स्नेत, अन्नधान्य उत्पादन आणि पिण्याच्या पाण्यावरून सर्वत्र होऊ लागलेले संघर्ष आटोक्यात राहणार नाहीत़
याचा अर्थ असा नव्हे की निराशावादी निष्क्रियपणो त्या प्रलयाची वाट पाहत आहेत़ त्याचप्रमाणो असेही म्हणता येणार नाही की आशावादी निवांतपणो त्या सुख-समृद्धीची वाट पाहत आहेत आणि संभाव्य संकटांबद्दल बेपर्वा आहेत़ आशावादी आणि निराशावादी या दोन्ही प्रवृत्तींच्या लोकांमध्ये आणखी दोन उपगट असतात़ दोन्ही प्रवृत्तींमध्ये काही प्रयत्नवादी असतात तर काही उदासीऩ
- आपल्याला प्रयत्नशील आशावाद हवा आह़े
आशा-निराशेच्या मध्ये
निराशावादी जवळजवळ अशा निष्कर्षाप्रत आले आहेत की आता :हास - कदाचित सर्वनाशही - अटळ आह़े अण्वस्त्र स्पर्धा, अणुयुद्ध आणि अधिक व्यापक दहशतवाद यामुळे हे जग नष्ट होऊन अश्मयुगात जाऊन थडकेल़़
पण याचा अर्थ असा नव्हे की निराशावादी निष्क्रियपणो त्या प्रलयाची वाट पाहात आहेत़ त्याचप्रमाणो असेही म्हणता येणार नाही की आशावादी निवांतपणो कोण्या सुख-समृद्धीची वाट पाहात आहेत आणि संभाव्य संकटांबद्दल बेपर्वा आहेत़
- या दोन्ही गटांच्या मध्ये काय होते, ते महत्त्वाचे!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि
जागतिक घडामोडींचे भाष्यकार आहेत.)