शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

कचरा आणि कंपोस्ट

By admin | Updated: July 18, 2015 13:29 IST

पूर्वी परसातल्या झाडांच्या मातीत आपण कचरा टाकत असू. त्यानंतर कचरापेटी, कचराकुंडय़ा, अगदी घंटागाडय़ाही आल्या. आता गार्बेज डिस्पोझल युनिट, इनसिंकइरेटर आणि स्मार्टबिनच्या माध्यमातून डिझायनर्स कच:याची समस्या सोडवू पाहताहेत.

नितीन कुलकर्णी
 
आज कचरेवाला आला नाही का?’ या माङया प्रश्नावर माझ्या मुलीनं फर्मान सोडलं, ‘त्याला कचरेवाला नाही म्हणायचं, तो सफाईवाला आहे. तो आहे म्हणून आपले घर व सोसायटी साफ आहे. आमच्या टीचरने आम्हाला सांगितलं आहे की समाजातल्या सर्व वर्गांना मानाने जगण्याचा अधिकार आहे, आणि आपण त्यांना तसं वागवलं पाहिजे.’ खजिल व्हायला झाले होते तरी या शिकवणीचा, उदात्तता व कौतुक अशा मिश्र भावनेचा मनावर ठसा उमटला आणि नंतर  कचरानिर्मिती व सफाईव्यवस्था या जोडप्रणालींच्या अनेक परस्परावलंबी घटकांच्या दृश्यानुभवांचा पट मनात उमटला गेला. 
आपल्या घराच्या परिसरात फिरायला गेलं असता एक चित्र ब:याचदा दिसतं (अर्थात जिथे घंटागाडीची व्यवस्था नसेल तिथेच), कचरापट्टीवर मोठय़ा लोखंडी कचरापेटय़ा ठेवलेल्या असतात व या ठिकाणावरून आठवडय़ातून एकदा कचरा उचल होत असते. सोसायटय़ांचे स्वच्छता कामगार किंवा रहिवासी कचरापेटीच्या बाहेरच कचरा टाकून जात असतात. या परिसरात पूर्ण कच:याचं साम्राज्य असतं. कशा प्रकारचा असतो हा कचरा? अनेक प्लॅस्टिकच्या छोटय़ा मोठय़ा पिशव्यांची बोचकी असं असतं. प्रामुख्यानं यात स्वयंपाकघरातला सेंद्रिय कचरा असतो. कधी कधी हा कचरा उघडाच टाकलेला असतो. इतर कचरा व ढिगारेदेखील असतात. (आजकाल लोक काहीही कच:यात टाकत असतात.) बंद पिशव्या उघडय़ा करण्याचं कामं कचरावेचक विकण्यासाठी काही मिळेल याच्या आशेने करत असतात. दुसरं म्हणजे रस्त्यावरील कुत्रे खायला काही मिळतंय का याच्या आशेने त्या पिशव्या उघडत असतात. ही कुत्रगँग जणू त्या कचरापट्टीची रखवालदारी करत असते आणि मिळेल ते खाणं खात असते. इथे जणू कचरावेचक आणि कुत्रे यांचं ‘को-ऑपरेटिव्ह’ असतं. 
आपणा सर्वांनाच आपलं घर घरातील कचरापेटीसकट स्वच्छ ठेवायचं असतं. त्यामुळे आपण आपला कचरा अगदी सुरक्षितपणो कॅरिबॅगमधे भरून घट्ट गाठ मारून मगच घरातल्या कचरापेटीत टाकतो. हे करत असताना आपल्याला पुरेपूर माहीत असतं की हा कचरा जैविक आहे आणि त्याचं विघटन व्हायला, त्याचा पाणी व मातीशी संपर्क यायला हवा. प्लॅस्टिकचे अगणित वर्षांपर्यंत विघटन होत नाही हेही माहीत असतेच पण केवळ स्वच्छतेच्या हव्यासापोटी आपण तो कचरा प्लॅस्टिकमधे बंद करत असतो. अर्थात पुढे तो कचरावेचक आणि कुत्र्यांद्वारे उचकला जातो हा भाग उपद्रवाबरोबरच काही अंशी उपकारकही ठरत असावा हेही आलेच. 
कच:याची विल्हेवाट लावणं ही एक भयानक समस्या म्हणून आज आपल्यासमोर उभी राहत आहे. कचरा व्यवस्थापन हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक संवेदनशील कारभार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थापलेल्या कमिटीच्या रिपोर्टनुसार 2000 साली अंमलात आलेल्या नियमावलीचे प्राप्त परिस्थितीत पालन करणो, दिवसेंदिवस शहरांचे वाढत चाललेले आकारमान आणि डंपिंग ग्राउंड्सची वाढत चाललेली पातळी यामुळे हे काम बिकट होत आहे. प्रत्येक घर ही एक संस्था असं गृहीत धरून काम करण्याची गरज निर्माण होत आहे. कच:याची निर्मिती होते ते घर (आजचा आपला संदर्भ घरापुरता मर्यादित आहे म्हणून) इथेच आळा घालता येइल का? 
सरकारच्या आत्तापर्यंत प्रसिद्ध अहवालांनुसार मुंबईच्या घरातल्या कच:यात  साधारणपणो 3क् ते 57 टक्के इतका कचरा सेंद्रिय असतो, ज्याचे कंपोस्ट खत बनवता येऊ शकते. ज्यात भाज्या, फळांच्या साली व इतर खाद्याचे उर्वरित भाग असतात. 40 ते 54 टक्के इतर निरुपयोगी कचरा असतो ज्यात कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर वस्तू येतात व 5 ते 10 टक्के पुनप्र्रक्रिया (रिसायकल) हा करता येण्याजोगा भाग येतो. साधारणपणो दिवसाला माणशी 300 ते 500 ग्रॅम इतका जैविक कचरा तयार होत असतो. 
या पाश्र्वभूमीवर 70 च्या दशकात दूरदर्शनवर दाखवल्या गेलेल्या सरकारी अॅनिमेशनपटाची आठवण येते. यात कच:याच्या समस्येमुळे शहरातून पायी चाललेल्या एका माणसाच्या क्रोधाचा विस्फोट दाखवला होता. सुरुवातीच्या भागात त्याच्या डोक्यावर सतत काही ना काही कचरा येऊन पडत असतो. मग तो छत्री घेऊन चालायला लागतो. पुढे कच:याच्या ढिगा:यांमधून वाट काढताना नाकीनव येते व संयम सुटून हा नागरिक जोरजोरात लाथा मारत हे कच:याचे ढीग पुन्हा स्वच्छ घरांमधे विराजमान होतात अशी काहीशी पटकथा होती.
स्वयंपाकघरातील जैविक कचरा शिळे अन्न वगैरेची विल्हेवाट लावण्याचा आधुनिक (विसावे शतक) अमेरिकन प्रकार म्हणजे गारबेज डिस्पोझल युनिट. हे इंडस्ट्रीअल मिक्सरसारखे काम देणारे युनिट किचन सिंकच्या पाणी वाहून जाण्याच्या तोंडाखाली बसवलेले असते. हे यंत्र आपण टाकलेला घन कचरा व अन्नाचे तुकडे थोडय़ाच वेळात बारीक बारीक तुकडय़ांमधे रूपांतरित करतो व सांडपाण्याच्या पाइपांमधून वाहवून नेतो. या यंत्रचा शोध 1927 मधे पेशाने स्थपती असलेल्या जॉन डब्ल्यू. हॅम्स याने लावला. 1933 मधे दाखल केलेल्या पेटंटच्या अर्जासाठी 1935 मधे त्याला पेटंट मिळालेही; परंतु अमेरिकन बाजारपेठेत यायला 194क् साल उजाडावे लागले. यांचे नाव इनसिंकइरेटर. यानंतर जीई इलेक्ट्रिकल्सनेदेखील अशा प्रकारचे यंत्र बाजारपेठेत आणले. 
हा अमेरिकन उपाय, अन्न फेकण्यात पाप समजणा:या आपल्या समाजात कसा काय रुजावा? सुखवस्तू कुटुंबांमधे उरलेले अन्न मोलकरणीला अथवा कुत्र्यांना देण्याच्या पद्धतीलाही शहरांमधे तडे जात आहेत, ही बाब नवीन उपाय शोधण्यास पोषक ठरावी. अर्थात अमेरिकेत नागरी संस्थांनी घेतलेला सहभाग (आधी बंदी व नंतर पुरस्का) ही महत्त्वाची बाब होती, तसे काही आपल्याकडे होऊ घातले आहे का, असा शंकावजा प्रश्न अनेकाच्या मनांत येत असावा. 
घरगुती स्वरूपाचे कंपोस्टर्स हा एक दुसरा उपाय आपल्याकडे रुजावा. पूर्वी जमिनीवरील घरांमधे परसातल्या झाडांच्या मातीमधे आपण कचरा टाकत असू याची काहीशी आठवण येऊ शकते. फ्लॅट पद्धतीच्या घरांमध्ये जमण्यास कठीण असलेला हा प्रकार डिझाइनमुळे सोपा झाला आहे. स्मार्टबिन हे या कंपोस्टरचे नाव. घरातल्या मोठय़ा कचरापेटीएवढे हे साधन आपल्याला सिंकच्या खाली अथवा बाल्कनीत ठेवता येते. स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचरा यात वेगवेगळ्या थरांमधे साठवून ठेवता येतो व काही आठवडय़ांच्या काळात कंपोस्टमधे रूपांतरित होतो. एनआयडीमधे शिकलेले बेंगळुरूस्थित डिझाइनर अरिजित मिश्र यांनी ही बीन तयार केली आहे. या बिनची जोडी 16क्क् इतक्या किमतीवर ऑनलाइनवर उपलब्ध आहे.
 
(लेखक ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ 
या संस्थेत ‘डिझाइन’ या विषयाचे प्राध्यापक आहेत.)