शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

गडकरी योग्य तेच बोलले!

By admin | Updated: May 16, 2015 14:26 IST

मुंबईच्या मॉलमधले मूत्र जमवण्याची योजना तुम्ही मांडली आहे. तुम्ही सतत वादग्रस्त बोलता असे वाटत नाही का?

- एकनाथ खडसे,  महसूल आणि कृषीमंत्री
 
 मुंबईच्या मॉलमधले मूत्र जमवण्याची योजना तुम्ही मांडली आहे. तुम्ही सतत वादग्रस्त बोलता असे वाटत नाही का?
 
मी वादग्रस्त बोलतो यापेक्षा काय बोलतो हे पहा. मला आणि नितीन गडकरींना काय दुसरी कामे नाहीत का? आम्ही वेगळ्या विषयावर मुद्दाम काही (भलते) विचार मांडलेच पाहिजेत असे तरी आमच्यावर कोणाचे बंधन आहे का?
 
 ..पण थेट मुंबईच्या मॉलमधले मानवी मूत्र गोळा करून खतासाठी वापरण्याचा मुद्दा कसा काय..
 
 मुंबईत सव्वा ते दीड कोटी लोक राहतात. शेकडो मॉल्स आहेत. त्यात रोज येणारे लोक किती? मूत्रविसजर्न आणि त्यानंतर स्वच्छतेसाठी सोडले जाणारे पाणी एकटय़ा मुंबईत लाखो लिटर भरेल. असे पाणीयुक्त मूत्र जर टँकरद्वारे भरून नेले गेले आणि त्याचा सेंद्रीय खतांसाठी वापर केला गेला तर शेतीचा कस वाढेल असे संशोधन आहे.  टँकरमधील मूत्रचा वासही घालवण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे, मग का नको? आपल्याकडे हॉटेलांमधून किंवा अन्य ठिकाणाहून फेकून दिले जाणारे अन्न किती असेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. एकटय़ा मुंबईत हजारो टन पालेभाज्यांचा कचरा जमतो. शेकडय़ानी ट्रक भरून हा कचरा वाहून नेतात. यापासून तयार होणारा गॅस स्वयंपाकासाठी वापराला जाऊ शकतो. तसेच घनकच:यासह मलमूत्रचा वापर करून आपल्याही देशात अनेक प्रयोग झाले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीवादी आश्रमांमधून असे प्रयोग झाले. अकोल्यात उमरीला गांधीजींनी राष्ट्रीय विद्यालय स्थापन केले. तेथे मुलांना मैला वाहून नेणो, शौचालय साफ करणो शिकवले जात होते. तेथे सेफ्टी टँकद्वारे गॅसची निर्मिती केली गेली आणि 2क्क् मुलांपुरते ते विद्यालय स्वयंपूर्ण झाले. 
 
 .पण मानवी मूत्रचा प्रत्यक्ष वापर करणो लोक कितपत स्वीकारतील?
आमच्या जळगावात बाफनांकडे जवळपास चार हजार गायी आहेत. तेथे गोमूत्र नेण्यासाठी गर्दी होत असते.  आपल्याकडे  युरियाच्या अतिवापराने शेतजमिनीचा कस अत्यंत कमी झाला आहे. गायी म्हशींच्या मूत्रपासून जे खत तयार होते, त्यापेक्षा अधिक प्रभावी खत मानवी मूत्रपासून होते. गडकरी काहीही चुकीचे बोलले नाहीत. अशा खतापासून जमिनीचा कस वाढेल. शहरात ऑरगॅनिकच्या नावाखाली तुम्ही लोक ज्या गोष्टी विकत घेता त्याचा अभ्यास करा. गरज पडली तर जळगावी या, मी शेतीतले वेगवेगळे प्रयोग दाखवतो; मात्र सगळ्याच गोष्टी चेष्टेवर नेऊ नका. आपल्याकडे मर्यादित साधनसंपत्ती आहे अशावेळी वेगळे प्रयोग केले नाहीत तर कालांतराने आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी दुस:यांवर अवलंबून रहावे लागेल. हा दूरगामी विचार आहे आणि टिंगलटवाळी सोडून याकडे बघायला शिकले पाहिजे असे माङो मत आहे.
(मुलाखत : अतुल कुलकर्णी)