शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

पहिली पायवाट

By admin | Updated: July 25, 2015 18:22 IST

अनवाणी पाय, अंगावर असलंच तर एखादं कातड्याचं धडुतं, सोबत ना शिदोरी, ना नकाशा! वाहन म्हणून ना घोडा होता, ना बैल.चाकही माहीत नव्हतं तर गाडी कुठून असणार? -तरीही अन्नाच्या शोधात वणवणत, आपलं रानघर सोडून माणूस पाय नेतील तिकडे निघाला. तो त्याने सुमारे सव्वा लाख वर्षापूर्वी केलेला पहिला प्रवास! - त्याची ही कहाणी!!

- डॉ. उज्ज्वला दळवी
 
कसदे सफर का पता नहीं, 
चल पडे मगर रास्ता नही’ 
सुमारे सव्वा लाख वर्षांपूर्वी माणसाचा पहिला मोठा प्रवास सुरू झाला. पण आपण प्रवासाला निघालो आहोत हे त्याचं त्यालाही माहीत नव्हतं. कसं जायचं, कुठे पोचायचं सारंच अनिश्चित होतं. रस्ता कशाला, पायाखाली साधी मळवाटही नव्हती. मुक्कामाचं ठिकाण ठरवायला जगात कुठेही गाव नावाची वस्तीच नव्हती! अनवाणी पाय, अंगावर असलंच तर एखादं कातडय़ाचं धडुतं, सोबत ना शिदोरी, ना नकाशा! वाहन म्हणून ना घोडा होता, ना बैल. चाकही माहीत नव्हतं तर गाडी कुठून असणार? तरीही अन्नाच्या शोधात वणवणत, त्याचं रानघर सोडून तो पाय नेतील तिकडे निघाला होता.
आदिमानवाच्या त्या खडतर प्रवासाची कहाणी भूतकाळाच्या उदरात गडप झाली होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ते प्रवासवर्णन कुणालाही माहीत नव्हतं. पण निसर्गानं मात्र इमाने इतबारे त्या सगळ्या प्रवासाच्या नोंदी जपल्या होत्या. विज्ञानाची प्रगती झाली. आधुनिक माणसाला कार्बनचं, पोटॅशियमचं वय ठरवणं, 3ँी1े’4्रेल्ली2ूील्लूी, स्र3्रूं’ ंि3्रल्लॅ वगैरे अनेक नवी तंत्रं अवगत झाली. विज्ञानाच्या संगतीने खरोखरच प्राचीन गुहांमधल्या दगडांना जिभा फुटल्या. त्यांनी किरणोत्सारी कथा सांगितल्या. मग डीएनएची गूढ लिपी वाचायला संशोधक शिकले. सांगाडय़ांच्या हाडांनी हकीकती ऐकवल्या. दातांमधल्या डीएनएने दंतकथांना इतिहासाचा सन्मान दिला. त्या सगळ्या ऐवजातून एक अद्भुतरम्य ऐतिहासिक कादंबरी शास्त्रज्ञांना वाचता आली. 
- भूगोलाच्या इतिहासाची आणि आदिमानवाच्या प्रवासाची गोष्ट सांगणारी कादंबरी! पृथ्वीच्या भूगोलाला त्याचा स्वत:चा इतिहास आहे. त्या इतिहासातली एक-एक घटना ब्रrादेवाच्या घटकेसारखीच लाखो-करोडो वर्षं व्यापते. हिमयुगांचा प्रत्येक हिवाळा हजारो-लाखो वर्षं चालतो. पावणोदोन लाख वर्षांपूर्वीच्या थंडीने जंगलं गोठली, प्राणी गारठले. त्यातून तगू शकले तेच जगले. त्या तगण्याच्या धडपडीत दोन पायांवर चालणा:या  मानवसदृशांनी नवे शेलके जीन्स स्वीकारले, उत्क्र ांती झाली आणि दीड लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत आधुनिक मनुष्यप्राणी जन्माला आला. हिमयुग भरात असताना दोन्ही ध्रुवांवरच्या बर्फाने विषुववृत्ताकडे मैलोन्मैल हातपाय पसरले. त्यासाठी त्याने महासागरांकडून पाणी उसनं घेतलं. सातासमुद्रांना ओहोटी लागली. समुद्रपातळीखालची बेटं उघडी पडली. बर्फाने आणि बेटांनी पृथ्वीवरच्या भूखंडांना जोडणारे सेतू निर्माण केले. हिमयुगाने जंगलातली फळं-मुळं घटली होती. शिकारीसाठी पुरेसे प्राणीही उरले नव्हते. म्हणून माणसांचा एक कळप कशासाठी-पोटासाठी करत समुद्राकाठी पोचला. तेव्हा माणूस मच्छिमारी करून, पाण्यातून लाखाचं धन लुटणारा दर्याचा राजा नव्हता. तो शिकारी-वेचकरी पंथाचाच होता. त्याने किना:यावरच्या शिंपल्या-चिंबो:या वेचून खाल्ल्या.  हिंस्र पशूंपासून वाचवेल तो निवारा आणि पोट भरेल तो किनारा यांचा तो ‘पारधी-शोधी’ वृत्तीचा पाहुणा होता. एका ठिकाणच्या शिंपल्या-चिंबो:या खाऊन संपल्या की नव्या शिंपली किना:याच्या शोधात, काठाकाठानेच तो पुढल्या मुक्कामाला जाई. तशा माणसांचा तो कळप रक्तसमुद्राच्या उत्तर किना:याला पोचला. तिथे त्यावेळी सुवेझ-कालवा नव्हता. सुवेझ-सेतू होता. त्याच्यावरून मनुष्यगट अरेबियाच्या उत्तर भागात गेला. लंबगोलाकार मार्गाने फिरणा:या पृथ्वीने नेमकी त्याच काळात सूर्याशी थोडी जवळीक साधली होती.  त्या प्रेमाच्या उबेने अरेबियाच्या त्या भागात कधी नव्हे तो वसंत बहरला होता. आसमंत हिरवा होता. माणसांची ती तुकडी नि:शंकपणो त्या हरित-व्यूहात शिरली. काही काळाने भटकभवानी पृथ्वी सूर्यापासून दूर सरली.  वसंत ओसरला, हिरवाई लोपून भयाण वाळवंट अवतरलं. परतीची वाटही गोठली. सव्वा लाख वर्षांपूर्वीच्या त्या पहिल्या मानवतुकडीचा त्या हिमव्यूहात अडकून निर्वंश झाला.   
सुमारे ऐंशी हजार वर्षांपूर्वी दुसरा मानवगट तसाच सागराच्या काठाकाठाने, शिंपल्या-चिंबो:या  खात आफ्रिकेहून निघाला. रक्तसमुद्राच्या दक्षिणोला ओहोटीमुळे पायवाट बनली होती. तिच्यावरून माणसांचा जथ्था सध्याच्या जिबूतीहून एडनला पोचला. सातासमुद्राच्या ओहोटीमुळे जवळजवळ सलग किनारा चालूच राहिला. त्याच्यावरच्या शिंपल्यांचा पुख्खा झोडत, कवचांचे ढिगारे मागे सोडत किनार-यात्रींच्या पिढय़ा पुढली दहा हजार वर्षं पुढे पुढे सरकत गेल्या. त्यांनी ओमानहून पर्शियन आखात पार करून इराण गाठला. मग भारताच्या पश्चिम किना:याचा पाहुणचार घेऊन ते पुढे चीनला आणि इंडोनेशियाला पोचले. त्या सुमाराला इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या टिमोर समुद्राची पातळी पार खालावली होती. जेमतेम मुंबई-पुण्यायेवढं अंतर पाण्याखाली होतं. लहान होडग्यांतून किंवा तराफ्यांवरून ती पाणपट्टी पार करणं शिंपलेखाऊंना जमलं. पुरातन पुरात नोआहच्या होडीतून प्राण्यांच्या अनेक जाती तरल्या. ऐतिहासिक ओहोटीत मात्र मानवाच्या तराफ्यांवरून एकही प्राणी ऑस्ट्रेलियाला गेला नाही. 
पोटोबाच्या दिंडीने आफ्रिकेहून निघून, पूर्व आणि दक्षिण दिशा धुंडाळत ऑस्ट्रेलियापर्यंत ङोंडे रोवले. त्यांच्यातल्या काहीजणांनी अधल्यामधल्या मुक्कामांनाच आपलं बस्तान बसवलं. त्यांची प्रजा तिथूनच आजूबाजूला फैलावली. दिंडीच्या वाटेत युरोप लागलाच नाही. शिवाय युरोपच्या दिशेला सर्द गोठली वाळवंटं होती. माणूस त्यांच्या वाटेला गेला नाही. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी पृथ्वीने पुन्हा सूर्याशी जवळीक साधली. त्या उबेने नेगेवसारख्या वाळवंटात ‘मऊशार हरिख दाटला’ आणि आशियातल्या मानवगटांना उत्तरायण जमलं. काही तुर्कस्तानमार्गे गेले, तर काहीजण सिंधू नदीच्या काठाकाठाने तिच्या उगमापर्यंत जाऊन तिथून उत्तरेला सरकले. पुढल्या काही हजार वर्षांत माणसाची लेकरंबाळं युरोपभर पसरली. पुन्हा पृथ्वीची लहर फिरली. वसंत ओसरला. पण पहिल्या वसंतव्यूहापासूनच्या पंचाहत्तर हजार वर्षांत माणसाने सतत प्रगतीच केली होती. आफ्रिकेहून निघाल्यापासूनच्या वीस-तीस हजार वर्षांत तर माणूस अधिकच हिकमती झाला होता. नवा शीतव्यूह भेदायला त्याच्यापाशी अधिक प्रगत आयुधं होती. कडाक्याच्या थंडीत रेनडियर-मॅमथ-अस्वलांची शिकार करत त्याने गुजराण केली. हिमयुगामुळे समुद्र आटलेलेच होते. सैबेरिया आणि अलास्कामधली बेरिंजची सामुद्रधुनी आटून तिथे कोरडा, बेरिंजिया नावाचा विस्तीर्ण भूखंड उघडा पडला होता. त्या ओहोटवाटेवरून आधी रेनडियर अमेरिकेला गेले. त्यांच्या मागून, ‘अरे, अरे रेनडियर’ करत, बावीस ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीच्या अवधीत, माणसांच्या पाच भिन्न टोळ्या त्या नव्या खंडात वेगवेगळ्या वेळी पोचल्या. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी वातावरण तापलं, बर्फ वितळलं आणि भरती आली. बहुतेक पायवाटा पाण्याखाली गेल्या. पण त्यापूर्वीच मानवाने जग पादाक्र ांत केलं होतं!
हे त्या ऐतिहासिक कादंबरीतलं केवळ प्रवासवर्णन झालं. खुद्द कादंबरीत मानववंशाच्या आदिमायेचं कूळ, तिच्या लेकरांचे निरनिराळे चेहरेमोहरे, त्यांची कुत्र्यामांजरांशी दोस्ती वगैरेंची रहस्यंही उलगडलेली आहेत. जसजसं विज्ञान अधिक प्रगत होईल तसतशा त्या निसर्ग बखरीतल्या आणखी छुप्या नोंदी प्रगट होत जातील आणि अद्यमानवाला आद्यमानवाची वाटचाल अधिकाधिक समजत जाईल.
 
शिंपल्यांच्या कवचांचे ढिगारे 
सुमारे ऐंशी हजार वर्षांपूर्वी माणसांचा एक गट सागराच्या काठाकाठाने शिंपल्या-चिंबो:या  खात आफ्रिकेहून निघाला. सध्याच्या जिबूतीहून एडनला पोचला. सातासमुद्राच्या ओहोटीमुळे किना:यावरच्या शिंपल्यांचा पुख्खा झोडत, कवचांचे ढिगारे मागे सोडत किनार-यात्रींच्या पिढय़ा पुढली दहा हजार वर्षं पुढे पुढे सरकत होत्या. त्या प्रवासाचा आधुनिक शास्त्रने ‘शोधलेला’ हा पुरावा, आंतरजालावरून साभार!
 
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मानवाचा ‘प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, 
संशोधनाचा विषय आहे.)
 
ujjwalahd9@gmail.com