शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

निळी सायकल

By admin | Updated: July 18, 2015 13:26 IST

वडिलांचं सायकलचं वेड माझ्यातही पुरेपूर उतरलं होतं.पुढे माझी सायकल अभिनव कला विद्यालयाच्या रस्त्याला लागली. नंतर तिला आणि मलाही वेगळंच वारं लागलं.

 
चंद्रमोहन कुलकर्णी
 
 
हँडलच्या मेन फ्रंट बारवर आणि मागच्या मडगार्डवरचा हर्क्यलसचा C आणि  H ही इंग्रजी अक्षरे असलेला लोगो आजही आठवतोय मला. 
सोनेरी रंगातली पुढे पुढे मोठी मोठी होत जाणारी सूर्यकिरणं मध्यभागी आणि त्यावरची लाल अक्षरातली ती उ आणि  ही अक्षरं. 
हँडलबारवर जरी फक्त तो उ आणि  या अक्षरांचा लोगो असला, तरी त्या (फुल!) चेनकव्हरवर मात्र त्यांनी हक्यरुलस ह्या मूळ इंग्लिश कंपनीचा लोगो कुणा पेंटरकडून सोनेरी-लाल रंगात हौसेनं रंगवून घेतला होता. 
त्यावरची ती उ आणि  ह्या अक्षरांभोवतीची ‘द हक्यरुलस सायकल अँड मोटर कं. लि., नॉटिंगहॅम, इंग्लंड’ ही काळ्या पट्टीवरची सोनेरी अक्षरं आणि त्या सगळ्या अक्षरांना टेकून उभा असलेला बलवान, दाढीवाला आणि हातात कसलातरी भलामोठा दंडुका घेतलेला मनुष्य आजही मला आठवतोय. (सहज म्हणून इंटरनेटवर सर्च करून पाहिलं तर सापडला गूगलवर!)
हक्यरुलसमधल्या  चा वापर मोठय़ा कौशल्यानं हँडलच्या मुख्य बारवर डायनमा अडकवण्यासाठी केलेला असायचा. हा डायनमा आणि आर्मिचर ही एक विशेष गोष्ट होती. सायकलच्या मागच्या चाकाला बाटलीवजा एक छोटी बॅटरी जोडलेली असायची. चाक फिरताना ह्या बॅटरीला गती मिळून घर्षणानं वीज निर्माण होऊन पुढे हॅँडलला जोडलेला दिवा लागायचा. 
हा असला दिवा म्हणजे मोठी कौतुकाचीच गोष्ट होती आमच्या निळ्या सायकलची! अर्थात, सायकलला दिवा असावा हा नियमच होता तेव्हा. पण ह्या दिव्याचं विशेष कौतुक अशासाठी, की त्याच्या आधीच्या जनरेशनचे सायकलचे दिवे चक्क रॉकेलवर चालणारे असत! त्यापुढे हा आमचा फारच स्पेशल होता. आमचं कसं सगळं स्पेशल, ‘विशेष’!!
पावसाळ्यात ह्या सायकलची विशेष आठवण होते त्याचं कारण स्पोक्स!
सायकलचे स्पोक्स ही तर फारच मजेदार गोष्ट होती. हे स्पोक्स स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियम ह्या दोन प्रकारचे मिळत. सायकलचे जे जे स्टीलचे पार्ट्स होते, ते सगळे अर्थातच चमकत. स्पोक्स तर विशेषच. सायकलच्या वेगाबरोबर प्रकाशाच्या रेघांचं मोठं मोहक कॉम्बिनेशन होत असे. ह्या स्पोक्सच्या संदर्भातली पावसाळ्यातली विशेष आठवण म्हणजे स्पोक्स आणि चमकणा:या इतर गोष्टी म्हणजे हँडल, सपोर्ट बार्स, घंटी, पेडलच्या मांडय़ा, चाकाची रिमं. ह्या सगळ्यांना त्या गंजू नयेत म्हणून पावसाचे दिवस संपेर्पयत कसलातरी घाणोरडय़ा रंगाचा एक लेप ते लावून ठेवत. हा लेप गंजप्रतिबंधक असायचा. पावसाळा संपला की हा लेप काढून टाकून सायकल चमकायला सज्ज!!
स्पोक्स चमकवण्यासाठी वडिलांनी स्पोक्ससाठी स्पेशल असं कोणतंतरी एक पॉलिश आणून ठेवलं होतं. ते लावलं रे लावलं, की स्पोक्सच्या तारा झळाळत. सकाळच्या उन्हात सायकल बाहेर काढली, की बघत राहावा तो चमकण्याचा खेळ!
सायकलच्या सुरुवातीच्या कमी असलेल्या वेगाबरोबर प्रकाशाच्या दोन दोन रेघा एकमेकींना छेदून जात, एकमेकीत मिसळत. वेग जसजसा वाढेल तसतशा ह्या रेघांच्या संख्येत भर पडून प्रकाशाच्या रेघांचा मनोहारी खेळ रंगात येई. सुंदर सुंदर रचना निर्माण होत. गोल, मोठे त्रिकोण आणि छोटे त्रिकोण ह्यांना प्रकाशाचे अत्युच्च बिंदू स्पर्श करीत अंतर्धान पावत आणि दोन्ही चाकांच्या गोलाकार मर्यादेत वेगाबरोबरचा हा खेळ काही मिनिटं माङया दृष्टीला खिळवून ठेवी. प्रकाशाच्या रेघांच्या त्या रचनांसोबत नाहीशी होत जाणारी माङया वडिलांची पाठमोरी आकृती आजही माङया दृष्टीसमोर तरळते.
स्पोक्सना ज्या दिवशी पॉलिश केलं जायचं, त्या दिवशी घरनं निघताना वडिलांच्या स्टाईलमध्ये विशेष भर पडायची. घरनं डय़ूटीवर निघतानाची त्यांची एक खास स्टाईल असायची. त्यांना काही नेहमीच युनिफॉर्मवर जायला लागायचं नाही. डय़ूटीव्यतिरिक्त त्यांचा नेहमीचा पोशाख म्हणजे लांब, फुल बाह्यांचा शर्ट आणि आखुड पायजमा! शर्ट-पँट क्वचित. भांगबिंग पाडून, दोनतीन वेळा मान तिरकी करून निरनिराळ्या अँगलमधनं आरशात बघून झालं की पायात चपला अडकवून स्वारी आधी एक चारमिनार पेटवायची. कुठलंतरी, कुणालाच ऐकू येणार नाही असं गाणं किंवा स्वगत पुटपुटत व्हराडय़ांत जाऊन सायकलचं कुलूप काढून, तीनचार पाय:या उतरून, सायकल ग्राउंडवर काढून, सीटखालच्या कापडाचा बोळा काढून, एकदोनदा सायकलवरची धूळ झटकून, सीट पुसून घेऊन, हँडल एका हातानं पकडून, स्टाइलमध्ये कंटिन्यूईटी ठेवून मग सिगरेटचा दुसरा झुरका! दीर्घ झुरका! मग हँडलवरचा हात तसाच ठेवून एका हातानं सायकलचा भार पेलत पंधरावीस, पंचवीस पावलं चालून झाल्यावर हातातल्या सिगरेटचा शेवटचा झुरका घेऊन ती टाकून देऊन, तिचं अस्तित्व संपेर्पयत पायाखाली चिरडल्यानंतर एक मोùùठ्ठी टांग टाकून, पायानं एक मोठं अर्धवतरुळ काढून, सीटवर बसून आपल्या रस्त्याला लागणार.
मी अकरावीत गेल्यावर मला सायकल घेऊन दिली. नवी. तरी मी काही खूश नव्हतो. दीडशे रुपयांची नवी कोरी सायकल घेऊन दिली तरी माङया मुद्रेवरची नाराजी स्पष्ट दिसत असणार. म्हणूनच मला त्याबद्दल त्यांनी विचारलं तेव्हा, ‘मला ही अॅटलास कंपनीची सायकल घेतली आहे, मला तुमच्यासारखी हक्यरुलसची पाहिजे होती’ असं मी सांगितलं.
अॅटलासची सायकल तेव्हा बाजारात नवी आली होती. हक्यरुलसच्या मानानं किंमतही कमी असणार आणि त्यावेळेला तरी अशा प्रकारच्या खरेदीसाठी मुलांचा सल्ला वगैरे पालक घेत नसत, म्हणून मला न विचारता आणि न सांगता ही ‘अॅटलास’ ह्या नव्या ब्रँडची कोरी-करकरीत चकाचक सायकल माङयासाठी त्यांनी दुकानातनं स्वत: चालवत आणली होती.
सायकल न आवडण्याची माझी मुख्य दोन कारणं होती. त्या ‘अॅटलास’ कंपनीचा लोगो आणि सायकलचे अॅल्युमिनियमचे स्पोक्स! मला ‘अॅटलास’चा तो पृथ्वी उचलणारा जाडय़ा माणूस काही आवडला नव्हता. पण सायकल आता आणून झाली होती आणि लोगो तर मी काही बदलू शकत नव्हतो.
स्पोक्समध्ये मात्र मी बदल घडवू शकत होतो. हे अॅल्युमिनियमचे स्पोक्स फारच निस्तेज दिसत होते. उन्हात चमकत नव्हते. मी आयडिया शोधली.
ङिारो नंबरच्या पॉलिशपेपरनं स्पोक्स घासायला सुरुवात केली. सायकलचे स्पोक्स काय कमी असतात? फार वेळ लागत होता. शिवाय वडिलांच्या नकळत, ते डय़ूटीवर गेलेले असताना किंवा त्यांचा डोळा चुकवून मला हा कार्यक्रम करावा लागे. रोज थोडे थोडे करता करता आठवडा वगैरे सहज उलटून जाई. मला रात्रंदिवस शाळेत, घरी, अभ्यास करताना, जेवताना, झोपताना सगळीकडे स्पोक्सच स्पोक्स दिसू लागले. स्पोक्स चमकवण्याच्या नादानं मी पार बहकून गेलो. रोज थोडे स्पोक्स घासून झाले, की सायकल उन्हात न्यायची, हातानंच होता होईल तेवढी पुढे-मागे करत करत सायकल पडणार नाही अशा बेतानं वाकून स्पोक्स चमकतायत की नाही, हे पहायचं!
चमकले की उत्साह वाढायचा!
अशा रीतीनं पुढचं चाक घासून पूर्ण झालं की मागच्या चाकाला हात घालायचा. पुढच्या चाकाच्या तुलनेत मागच्या चाकाचं काम फार अवघड. मागच्या चाकाच्या तारा घासताना घाम फुटायचा! सतरा वेळा चेनला हात लागून हात काळे होत. चाकाचं मडगार्ड, कुलूप, कॅरियरच्या दांडय़ा, चेनची दातेरी चक्रं, चेनकव्हर. असले अनेक अडथळे. स्पोक्स काही मनासारखे घासून व्हायचे नाहीत. शिवाय घासून झालेले स्पोक्स काही दिवसांनी ओबडधोबड दिसू लागायचे. सगळाच अर्धवटपणा झाला होता.
कंटाळून गेलो मी.
स्टीलचे स्पोक्स फार महाग होते, ह्याची मला कल्पना होती. त्यामुळे तसले स्पोक्स बसवून द्या अशी मागणी वडिलांकडे करण्याची माझी हिंमत नव्हती.
स्टीलची चमक मुळातली होती. पॉलिशनं ती आणखी वाढत होती. पण मुळातली स्टीलची चमक अॅल्युमिनियमच्या तारांना कशी येणार? चमक काही अशी घासून येत नसते. आली तरी टिकत नसते. तात्पुरती असते.
कधीतरी वडिलांचं लक्ष माङया सायकलकडे जाईल, माङो अॅल्युमिनियमचे स्पोक्स त्यांना खटकतील आणि त्यांचं मन द्रवेल आणि मग ते माङया सायकलला नवे चकचकीत स्टीलचे स्पोक्स पॉलिशच्या डबीसह देतील ह्या आशेवर मी अकरावीचं संपूर्ण वर्ष काढलं; पण ते काही झालं नाही.
पुढच्या वर्षी अभिनव कला विद्यालयाच्या रस्त्याला माझी सायकल लागली आणि तिला आणि मला वेगळंच वारं लागलं. त्या वा:याच्या वेगात पुढे मी ते स्टीलचे स्पोक्स कधी विसरलो हे माङया लक्षातही आलं नाही!.
(उत्तरार्ध)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)