शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पर्वतांचा देश

By admin | Updated: March 23, 2015 19:01 IST

मॉण्टे नेग्रो.ऐकलंय कधी या देशाचं नाव? ‘पर्यटनस्थळ’ असलं तरी अजून फारसं परिचित नाही.

अनघा दातार
 
मॉण्टे नेग्रो.ऐकलंय कधी या देशाचं नाव? ‘पर्यटनस्थळ’ असलं तरी अजून फारसं परिचित नाही.
नैसर्गिक सौंदर्य ठासून भरलेलं, पण ‘आधुनिकीकरणात’ अद्याप हरवलेलं नाही. हीच वेळ आहे हा देश अनुभवायची.
-------------------
मॉण्टे नेग्रो.
ऐकलंय या देशाविषयी काही? मलाही नव्हतेच काही माहीत. या देशाविषयी मी पहिल्यांदा ऐकले जेम्स बॉण्डच्या कॅसिनो रॉयल सिनेमात. तेव्हापासून हा देश डोक्यात घर करून होता. पण हा देश तसा युरोपमधील पॉप्युलर हॉलिडे डेस्टिनेशनमधला नाही. त्यामुळे माहिती मिळवणो जरा अवघड होते. पण गुगलला शरण गेल्यावर हळूहळू माहिती मिळायला लागली. मग मॉण्टे नेग्रोच्या टुरिस्ट ऑफिसला मेल करून सगळी व्यवस्था केली आणि या सुंदर देशात जाण्यासाठी तयार झालो. 
हा देश तसा नवीन, पण अतिशय सुंदर. पूर्वीच्या युगोस्लावियाचा हा भाग. बरीच वर्षे तो तुर्की आणि इटालियन अधिपत्याखाली होता. 2006ला त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि आता एक नवीन, स्वतंत्र देश म्हणून त्यांची ओळख होते आहे. या देशाच्या दक्षिणोला विस्तीर्ण सागरकिनारा आहे. काळ्या पर्वतांनी तो वेढलेला आहे. मॉण्टे नेग्रोचा अर्थच मुळी ‘ब्लॅक माऊंटन’ असा आहे. 
‘पोर्टगोरित्सा ही मॉण्टे नेग्रोची राजधानी. तेथून साधारण 86 किलोमीटरवर बुडवा शहर. तेथेच आम्ही राहत होतो. बुडवा हा तिथला एक पिकनिक पॉइंट. पर्यटनस्थळ असलं तरी ‘आधुनिकीकरणापासून’ दूर. त्यामुळेच त्याचं नैसर्गिक सौंदर्य हरवलेलं नाही. अतिशय अरुंद व पर्वतांमधून जाणारा हा रस्ता डोळ्यांचं पारणं फेडतो. त्यामुळे अंतर तसं कमी असलं तरी तिथे पोहोचायला बराच वेळ लागला. खरंतर आमची भाषा वेगळी, माणसं वेगळी, राहणीमान वेगळं. कशाचा, कशाशी, काहीच संबंध नाही. तरी ही सारीच माणसं खूपच अगत्यशील. कायम हसतमुख, मदतीला तत्पर, एकमेकांची भाषा कळत नसतानादेखील खाणाखुणांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न. त्यांच्या आदरातिथ्यानं आम्ही खरंच भारावून गेलो. 
पर्यटन हाच या देशाचा मुख्य व्यवसाय. जिकडे पाहावं तिकडे पर्वतांच्या रांगा. जणू पर्वतांचाच देश. एक दिवस आम्ही हायकिंगला गेलो. रस्ता, परिसर इतका मनोहर की नजर हटत नव्हती. पण वाटेत बरेच साप, सरडे आणि फक्त आम्ही दोघेच. मला प्रचंड भीती वाटत होती. पण जेव्हा पर्वतावर पोहोचलो तेव्हा तिथल्या नजा:यानं अक्षरश: मंत्रमुग्ध झालो. वरून ठिपक्यासारखं दिसणारं बुडवा शहर, स्वेटी स्टेफान बेटाचा नजारा. इतकी दमणूक झाली होती, पण ती सारी कुठल्याकुठे पळाली! 
स्वेटो स्टेफान हे बेट म्हणजे खरं तर एक मोठे हॉटेल आहे. अर्थातच अतिशय महाग. सिंगापूरच्या एका मोठय़ा हॉटेल चेनने हे बेट विकत घेऊन तिथे हे हॉटेल उभारलंय. हॉटेलमधल्या पाहुण्यांशिवाय इतर कोणालाच तिथे प्रवेश नाही. फक्त बघण्यासाठी म्हणून जाता येतं, पण नुस्ती त्यासाठीचीही फी आहे 25 युरो!
अपवाद वगळता तिथल्या स्वस्ताईनंही आम्हाला भुरळ घातली. एक टूरबस बुक करून एक दिवस आम्ही कोटोर शहरात गेलो. हे एक जुने शहर, पण फार छान जोपासलं आहे. गाइडने आम्हाला सांगितले, हे श्रीमंत लोकांचे शहर आहे, इथे ब:यापैकी महागाई आहे, तरीही तुलनेनं आम्हाला ते स्वस्तच वाटलं. तिथून आम्ही बसने जेवणासाठी टॉप ऑफ द माऊंटनला गेलो. तिथे एक छोटे फॅमिली रेस्टॉरंट होते. तामझाम काहीच नाही, तरीही एकदम मस्त. बाहेर बसून शांत, सुंदर वातावरणात, दरीतला देखावा बघत जेवणो म्हणजे पर्वणीच! तिथेच एका छोटय़ा खोलीत ते स्मोक्ड हॅम बनवतात. अप्रतिम चव. हॅम खाऊन आम्ही पुढे मॉण्टे नेग्रोच्या जुन्या राजधानीला म्हणजे सेतेन्याला गेलो.  आता तिकडे जुन्या राजाचा फक्त एक राजवाडा आहे, ज्याचे आता म्युङिायम बनवले आहे. या राजाला फारच लहान वयात राज्याची जबाबदारी पेलावी लागली होती.
या देशाच्या दक्षिण भागाच्या तुलनेत उत्तर भाग तसा पिछाडीवरच आहे. दक्षिणोइतका विकास तिथे झालेला नाही. मात्र उत्तरेला समुद्रकिनारा नसला, तरी अतिशय बेलाग अशा पर्वतरांगा आहेत. तिथल्या छोटय़ा छोटय़ा गावांत राहणारे लोक अतिशय साधे, सरळ आहेत. फार काही उत्पन्न नाहीये, पण ब:याच लोकांकडे स्वत:ची एक दोन गुरे, छोटंसं शेत किंवा बाग आहे. त्यातून मिळणा:या गोष्टी जसे की रासबेरिज, हर्बस, मश्रुम्स विकून हातखर्चाला थोडासा जास्तीचा पैसा ते मिळवतात. इथे इको-टुरिझमला चालना देण्याचा प्रयत्न तिथले सरकार करते आहे.
उत्तरेला तारा नदीचे जगातील सर्वात खोल असे पात्र आहे. तिथे जाणारा रस्ता अतिशय दुर्गम अशा डोंगररांगातून जातो. ही चढण दमछाक करणारी असली तरी या रस्त्याने जाताना आपण देहभान विसरतो. तारा नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ की त्यात पाहून चेह:याची रंगरंगोटी करावी! मॉण्टे नेग्रोमध्ये चार नॅशनल पार्क्स आहेत. हे पार्क्सदेखील पर्यटकांसाठी नंदनवनच! या परिसरात फिरत असताना कुठेही जा, काहीही पाहा, आपलं मन भरतच नाही.
तिथली अजून एक सुंदर जागा म्हणजे स्कादार लेक. आम्ही एका मोठय़ा बोटीतून बाल्कनमधल्या या सर्वात मोठय़ा लेकमध्ये प्रवास केला आणि एका छोटय़ाशा गावात गेलो. तिथलं ते एक छोटंसं कौटुंबिक हॉटेल आणि रेस्टॉरंट! पांढरी दाढी, डोक्यावर टोपी, एकदम हसतमुख असा एक म्हातारा हा त्याचा मालक.
हा माणूस रोज सकाळी लवकर उठून जंगलात जातो आणि मस्त हर्बस गोळा करतो. त्याची छोटी छोटी पॅकेट्स बनवतो आणि हॉटेलमध्ये येणा:या प्रत्येक लेडी गेस्टला आठवण म्हणून ती छोटीशी भेट देतो.  मला तर त्याची ही भेट फारच आवडली. या सगळ्या एक दिवसाच्या ट्रिपमध्ये रोज मस्त समुद्राकाठी जेवण, वाइन आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा  माहोल!
तेथील ब:याच लोकांनी आम्हाला सांगितले, युगोस्लावियाच्या काळात आमची आर्थिक स्थिती तशी बरी होती; पण स्वातंत्र्यानंतर मात्र ब:याच कंपन्या बंद पडल्या. लोकांना कामासाठी दूरदूर जावे लागते. पैसाही त्यामानाने खुपच तुटपुंजा मिळतो. पण कधी ना कधी हे सारे बदलेल अशी त्यांना आशा आहे.
इथली गरिबी तशी आपल्याला पावलोपावली भेटते, पण त्यांच्या मनाची श्रीमंती आपल्यालाही खुजे करते. परदेशी लोकांसमोर आपल्या देशाला कमीपणा येईल अशी कुठलीही कृती करताना ते दिसत नाहीत. ‘पर्यटक आले, आता आपली चांदी, घ्या लुटून, लुटता येईल तेवढे’ अशी वृत्ती कुठेच दिसली नाही. ‘टिप’साठी वसवसलेले लोकही कुठेच दिसले नाहीत. न्यू यॉर्कच्या अनुभवानंतर हा एक सुखद धक्का होता.
एक हटके ‘हॉलिडे डेस्टिनेशन’ म्हणून हा देश डेव्हलप होतोय. अजून फार व्यावसायिकता नाही आलीय तिथे. नैसर्गिक ताजेपण अजूनही ब:याच ठिकाणी जपले गेलेय. हीच वेळ आहे हा देश अनुभवायची.
 
‘युरो’ वापरणारा ‘बाहेरचा’ एकमेव देश!
मॉण्टे नेग्रोला स्वत:चे चलन होते, पण सततची युद्धे, लढायांमुळे चलनाचे खूपच अवमूल्यन झाले. त्यामुळे जर्मन सरकारबरोबर त्यांनी करार केला आणि जर्मनीचे त्यावेळचे चलन डोइश मार्क वापरायला त्यांना परवानगी मिळाली. नंतर जर्मनीचे चलन युरोमध्ये बदलल्यानंतर अर्थातच मॉण्टे नेग्रोलासुद्धा युरो हेच चलन स्वीकारावे लागले. युरोपियन युनियनमध्ये नसूनसुद्धा युरो वापरणारा हा एकमेव देश आहे. युरोपियन युनियनमध्ये यायला त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
 
(सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेल्या लेखिका जर्मनीतील हायडेलबर्ग येथे राहतात)