शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

सायकल, 4800 कि. मी., आणि नऊ दिवस

By admin | Updated: July 5, 2015 15:42 IST

‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही स्पर्धा म्हणजे काय चिज आहे, ते त्यात प्रत्यक्ष भाग घेतल्याशिवाय कळत नाही म्हणतात. स्पर्धा सुरू झाल्यापासून निसर्ग क्षणाक्षणाला कसोटी पाहत होता. वाळवंटापासून ते जंगलार्पयत, डोंगरांपासून पठारांर्पयत आणि रणरणत्या उन्हापासून ते गाळठवणा:या थंडीर्पयत निसर्गाचे सारे आविष्कार, अवतार पाहत, पार करत आम्ही पुढे सरकत होतो. सायकल पंक्चर झाली, रस्ता चुकलो, मध्येच भरकटलो. स्पर्धेत असे क्षण कितीदा तरी आले, की वाटलं, सोडून द्यावं हे सारं.

 

डॉ. हितेंद्र महाजन डॉ. महेंद्र महाजन 
शब्दांकन : समीर मराठे
 
रेस अक्रॉस अमेरिका ही स्पर्धा सुरू होऊन आता 35 वर्ष झाली. गेल्या 35 वर्षात ‘सोलो गटात (एकटय़ानं) ही स्पर्धा पूर्ण करणारे जगभरात साधारण दोनशे जण आहेत, तर टीमनं पूर्ण करणारे सुमारे सात-आठशे. एव्हरेस्टवर आतार्पयत साधारण तीन हजारांच्या आसपास ट्रेकर्सनी यशस्वी चढाई केली आहे. जगातील सर्वाधिक लांबीची आणि सर्वाधिक प्रतिष्ठित सायकल स्पर्धा. केवळ सायकलिंगच नव्हे, खेळाडूंच्या क्षमतांचा कस लावणा:या कोणत्याही स्पर्धाची ही महाराणी.
जगातली अशी इतर कोणतीही स्पर्धा नाही जिच्यात वेग, क्षमता, सामथ्र्य आणि समन्वय. या सा:याची इतकी ‘परीक्षा’ घेतली जात असेल. जगातली अशी दुसरी कुठलीही स्पर्धा नसेल जिच्यात इतकं प्रदीर्घ पल्ल्याचं अंतर, एवढा प्रचंड भूभाग आणि हवामानातील टोकाच्या बदलांना प्रत्येक क्षणाला स्पर्धकांना सामोरं जावं लागत असेल. अख्खी अमेरिका, एका टोकापासून दुस:या टोकार्पयत पालथी घालायची. अंतर ‘फक्त’ 4800 किलोमीटर! 
स्पर्धा एकदा सुरू झाली की मधे कुठलाच खंड नाही. वादळ येऊ दे, पूर येऊ दे, उन्हानं चामडी सडकून निघू दे, नाहीतर थंडीनं हाडं गोठू दे. सलग नऊ दिवस सायकल दामटायची! कोणी केव्हा सायकल चालवायची, केव्हा खायच-प्यायचं, केव्हा आराम, केव्हा झोपायचं? - हे सारं स्पर्धकांनी आपलं आपण ठरवायचं!. 
प्रतिकूल हवामान अगर अन्य नैसर्गिक कारणांनी अडथळे आले, तरीही कोणतीही सवलत नाही. स्पर्धेदरम्यान अमेरिकेतली बारा राज्यं, 88 काऊंटीज आणि 35क् कम्युनिटीज ओलांडायची!. प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक स्थिती टोकाची आणि हवामानही.
 हे स्वप्न केवळ  ‘आमचं’ उरलं नव्हतं. आम्हाला मदत केलेल्या कित्येकांची भागीदारी होती त्यात. ‘नाशिक सायकलिस्ट असोसिएशन’, आमचे डॉक्टर मित्र, आप्त, परिवार, चाहते, असंख्य देणगीदार.
शिवाय देशाच्या प्रतिष्ठेचा सवाल होता.
.पण तरीही ‘आता संपलं सारं.’ अशी हताशा आणणारे प्रसंगही आलेच. एकदाही असं वाटलं नाही, की ‘आजचा दिवस बरा गेला!’ रोज कोणतं ना कोणतं आव्हान समोर वाढून ठेवलेलंच होतं.
स्पर्धा सुरू झाल्यापासून निसर्ग क्षणाक्षणाला कसोटी पाहत होता. वाळवंटापासून ते जंगलार्पयत, डोंगरांपासून पठारांर्पयत आणि रणरणत्या उन्हापासून ते गाळठवणा:या थंडीर्पयत निसर्गाचे सारे आविष्कार, अवतार पाहत आणि पार करत आम्ही पुढे सरकत होतो. त्यात आणखी भर म्हणजे अमेरिकेतले वाहतुकीचे नियम आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळे आणि कठोर. त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीची डोक्यावर टांगती तलवार! चुकून मोडलाच एखादा नियम तर ‘पेनल्टी’! प्रत्येक पेनल्टीला आपला वेळ कमी करणार. अशा तीन पेनल्टी बसल्या की स्पर्धकाची थेट हकालपट्टी!. सा:याच गोष्टींचं ओझं डोक्यावर होतं. पण रिकाम्या हातानं परतायचं नाही हा ध्यास! नऊ दिवसांचा वेळ हातात असला तरी आठच दिवसांत स्पर्धा पूर्ण होईल असं नियोजन आम्ही करू पाहत होतो. दुर्दैवानं काही अडचणी आल्याच तर ‘बफर’ म्हणून ठेवलेला हा एक दिवस आपल्याला उपयोगी पडेल यासाठी आमची सारी धडपड.
आणि झालंही तसंच.
वादळी वारे आणि पावसानं वाटभर झोडपून काढलं. कित्येकदा सायकल चालवणंही अशक्य झालं. सारी शक्ती पणाला लावूनही ताशी जेमतेम दोन किलोमीटरचा स्पीड! एकदा तर स्पर्धाच थांबवावी लागली, संयोजकांना रुट बदलावा लागला. हा वाया गेलेला वेळ नंतर भरून काढावा लागला. उतरंडीवर तर काहीवेळा ताशी पन्नास किलोमीटरच्या पुढे. पण उतारावर भन्नाट वेगानं सायकल चालवणंही तसं धोक्याचं. चाक थोडं जरी स्लिप झालं, सायकलवरचा कंट्रोल गेला तर सारंच संपलं. बाजूच्या दरीत थेट कपाळमोक्षाचीच भीती!. 
या सा:या प्रतिकूलतेवर मात करत आम्ही पुढे सरकत होतो. आणि घडू नये ते घडलंच.
- सायकल पंक्चर!
अर्थात अशा प्रसंगांची तयारी ठेवावीच लागते. सायकलीचं ‘मानसशास्त्र’, तिच्या मरम्मतीचं तंत्र अवगत असावं लागतं. अचानक सायकलची ‘वागणूक’ बदलली की ती आता पुढे कोणतं रूप दाखवणार आणि आपल्याला काय केलं पाहिजे हे आधीच कळावं लागतं.
अशा प्रसंगी वेळ जातोच. 
तो भरून काढावा लागतो.
स्पर्धेचा शेवटचा ‘फोर सिस्टर्स’चा टप्पा तर रक्ताचं अक्षरश: पाणी करणारा होता. या टप्प्यात एकूण चार डोंगर पार करायचे होते. उलटय़ा दिशेनं रोरावत येणारा वारा मागे ढकलत होता. अक्षरश: भेलकांडायला लावत होता. त्यात अनेक ठिकाणी पाऊस, वादळ. साधारण हजार किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा पूर्णपणो डोंगराळ आणि उंचसखल. एक टेकडी संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी. 
स्पर्धा आम्ही ब:यापैकी कव्हर करत आणली होती.
आज आता शेवटचा दिवस. साधारण सहा-सातशे किलोमीटर अंतर बाकी होतं. आतार्पयत सा:याच प्रसंगांवर आम्ही मात केली होती. पण या प्रसंगानं आम्हाला अक्षरश: घाम फोडला.
रस्ता चुकला. 
आमची फाटाफूट झाली.
त्यात नेमका त्यावेळी महेंद्रकडे फोन नव्हता. संपर्क कसा करायचा आणि शोधायचं तरी कुठे, कसं? वेळ जात होता, त्यात वाहतुकीच्या नियमांत काही चुकलं तर ‘पेनल्टी’ची धास्ती. 
रस्त्यावर ब:याच लेन्स, एकावर एक ब्रिज. लेन चुकली तर परत मागे फिरता येत नाही. त्यात आमचा एकमेकांशी संपर्क होत नव्हता. कोण, कुठे गेलं ते काहीच कळत नव्हतं.
आता काय?. स्पर्धा अक्षरश: ओढून आणली होती आणि ऐन मोक्याच्या क्षणी घास हातातोंडाशी आल्यावर सगळंच हातातून निसटतं की काय?
 सुन्न झालो. तासभर हा गोंधळ चालू होता. ‘टेन्शन’ म्हणजे काय असतं, ते पहिल्यांदा ख:या अर्थानं जाणवलं.
पण अखेर आमची भेट झाली. पुन्हा ट्रॅकवर आलो आणि आमच्या जिवात जीव आला. त्या ‘पुनर्भेटी’चा आनंद ही आमच्या विजयाचीच नांदी ठरली.
खरंतर आमच्या दृष्टीनं स्पर्धा तिथेच संपली होती. 
बाकीचे 7क्क् किलोमीटर केवळ ‘सोपस्कार’ होता.
 
कुठेही, कसेही राहतील हे दोघं!
 
प्रॅक्टिस सांभाळून इतक्या सा:या गोष्टी करणं खरं तर अशक्यच, पण दोघा भावांची जिद्द आणि डेडिकेशन टोकाचं आहे. एखादी गोष्ट एकदा ठरवली की ठरवली.
या स्पर्धेची तयारी करतानाही दोघांनीही मिळेल तसा वेळ काढला. कधी पहाटे चार, तर कधी थेट रात्री बारा. रविवारी सुटीच्या दिवशी तर बारा बारा तास सायकलिंग केलं. घरीच ‘होम ट्रेनर’वर प्रॅक्टिस करतात  तेव्हा ‘भाग मिल्खा भाग’ची आठवण येते. भोवती घामाचं थारोळं, घामामुळे पिळून काढावे लागलेले अंगातले कपडे.
 मुलांना एकदा मुंबईला क्रिकेटची मॅच पाहायला जायचं होतं. दोघांनाही सराव बुडवणं शक्य नव्हतं. शेवटी हे दोघंही सायकलनं मुंबईला गेले आणि मुलांच्या आनंदातही सहभागी झाले! लॉँग डिस्टन्स सायकलिंगचं त्यांचं वेडही तसं अलीकडचं. फारतर पाच वर्षाचं. पण एखादा ‘किडा’ डोक्यात घुसला की घुसला! शिवाय ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग, ग्लायडिंग, फूल मॅरेथॉन रनिंग, स्विमिंग, कयाकिंग. हे दोघे भाऊ हवा, जमीन आणि पाणी. कुठेही, कधीही आणि कसेही राहू शकतात.
 - डॉ. अंजना हितेंद्र महाजन, 
आरती महेंद्र महाजन, देविका महाजन (आई)
 
‘बफर’ कामी आला!
 
भूतान ‘डेथ रेस’च्या वेळी आम्ही तसे नवखे होतो. स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच कसारा घाटात गतिरोधकावर आदळून हितेंद्रच्या गुडघ्याला तीन टाके पडले होते. आता ‘रॅम’साठी मात्र पूर्वनियोजन पक्कं होतं. वर्षापूर्वीच तयारी सुरू केली होती. मानसिक क्षमतेसाठी भीष्मराज बाम, डाएटवर मेघना सुर्वे आणि सरावावर कोच मितेन ठक्करनं बारीक लक्ष ठेवलं होतं. स्पर्धा कठीण होती. रौद्र निसर्गानं कसोटी पाहिली, त्यात आम्ही रस्ता चुकलो. पण तरीही विक्रमी, आठ दिवस, 14 तासांत; नियोजित वेळेच्या बारा तास आधीच आम्ही स्पर्धा पूर्ण केली याचं आणखीही एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही हाताशी ठेवलेला जास्तीचा दिवस. ‘बफर’. ऐनवेळी त्यानेच हात दिला.
 
क्रू मेंबर्स. यांनीही स्पर्धा गाजवली
 
स्पर्धेदरम्यान गाडी ड्राइव्ह करणं, स्पर्धकांना रस्ता दाखवणं (नेव्हिगेटर), त्यांचा आहार, विश्रंती, इतर गरजा, खाण्यापिण्याचं सामान. या सा:या गोष्टींची काळजी घेण्यासाठी क्रू मेंबर्स लागतात.  टप्प्याटप्यानं शिफ्टमध्ये हे सहकारी स्पर्धकांना सारथ्य करीत असतात. महाजन बंधूंना या स्पर्धेत सारथ्य करण्यासाठी पुढील सहकारी अमेरिकेत दाखल झाले होते.
डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. मिलिंद पिंप्रीकर, मितेन ठक्कर (कोच), पंकज मार्लेषा (सायकल एक्स्पर्ट), मिलिंद वाळेकर, प्रशांत शास्त्री, डॉ. अमोल तांबे (इंग्लंड), डॉ. सचिन गुजर (अमेरिका), डॉ. रमाकांत पाटील, डॉ. श्याम चौधरी, डॉ. संदीप शेवाळे (इंग्लंड), डॉ. सुनील वर्तक, मोहिंदर सिंग. 
 
‘रॅम’चा ‘किडा’
 
‘रॅम’मध्ये उतरावं, हे आम्ही ठरवलं ते केवळ वर्षभरापूर्वी!  त्यासाठीची ‘डेक्कन क्लिफहॅँगर’ ही पुणो ते गोवा ही ‘क्वालिफायर’ स्पर्धाही आम्ही पूर्ण केली. ‘रॅम’चा किडा डोक्यात घुसायला ते निमित्त पुरलं. त्यात आमचे सहकारी. त्यांनीही ‘भरीस’ घातलं. ‘नाशिक सायकलिस्ट असोसिएशन’नं प्रोत्साहन दिलं, ‘सरावा’चं झाल्यानं घरच्यांचाही पाठिंबा (गृहीत) होताच. आव्हानं ‘वेडय़ासारखी’ अंगाखांद्यावर घ्यायची आणि त्यापाठी हात धुऊन लागायची वृत्ती होती. त्याची आवडही होती. मुख्य प्रश्न होता त्यासाठी लागणा:या प्रचंड पैशाचा. त्याचीही बरीचशी जबाबदारी ‘कल्पतरू फाउंडेशन’ आणि सहका:यांनी उचलली. 
मग मागे वळून विचार करण्याचीही वेळ नाही आली.
 
कहाणी ‘5क् लाखांची’!
 
‘रॅम’ स्पर्धेसाठीचा खर्च होता साधारण 5क् लाख रुपये! नुसत्या स्पर्धेची फीच 6क्क्क् डॉलर (अंदाजे चार लाख रुपये) होती. एकटय़ाच्या बळावर हे शक्यच नव्हतं. पण नाशिकचे नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद पाटील आणि ‘कल्पतरू फाउंडेशन’नं पाठीवर हात ठेवत सांगितलं, ‘कसलीच काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या सायकली, अमेरिकेचं भाडं आणि आपला सराव यावर लक्ष केंद्रित करा. बाकीचं सारं आम्ही बघून घेतो.’
‘कल्पतरू फाउंडेशन’ ही मुख्यत: आदिवासी रुग्णांवर उपचार करणारी सेवाभावी संस्था. नाशिकमधील अनेक डॉक्टर या संस्थेचे सभासद आहेत. दरवर्षी या संस्थेतर्फे आदिवासी बांधवांवर मोफत उपचार केले जातात. यावर्षी फाउंडेशनतर्फे ‘रॅम’ स्पर्धेसाठी आम्हाला मदत देण्याचं ठरलं. त्यासाठी निधीही गोळा करायला सुरुवात झाली. परिचित, अपरिचित अनेकांनी मदत केली. प्रसिद्ध उद्योगपती फिरोदिया यांनी पाच लाख रुपये दिले. 32-33 लाख रुपये जमा झाले.
स्पर्धेसाठी आम्हा दोघा भावंडांसाठी चार लाख रुपयांच्या प्रत्येकी दोन अशा चार सायकली घ्याव्या लागल्या. याशिवाय प्रवासाचा खर्च. 
स्पर्धेत भाग घ्यायचं आमचं जेव्हा नक्की झालं, तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ‘कल्पतरू फाउंडेशन’नंही आदिवासी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला. त्यानुसार 1 जुलै 2क्14 ते 3 जून 2क्15 या काळात 392 आदिवासी रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर 71 रुग्णांवर मोफत नेत्ररोपण करण्यात आलं. या रुग्णांना त्यांच्या घरून घेऊन येण्यापासून ते त्यांच्या ऑपरेशनचा, त्यांच्या औषधपाण्याचा, रुग्णालयात त्यांच्या राहण्याचा, शिवाय त्यांना लेन्सेस पुरवण्यापासून ते पुन्हा घरी सोडण्यार्पयतचा सारा खर्च ‘कल्पतरू फाउंडेशन’नं केला. 1999 पासून कार्यरत असणा:या या संस्थेचं ध्येयच ‘आदिवासी रुग्णांवर उपचार’ हे आहे. 
त्यामुळे ‘रॅम’ स्पर्धेत सहभागी झालेल्या आमच्या भारतीय टीमचं नावही आम्ही ठेवलं- ‘टीम इंडिया - व्हीजन फॉर ट्रायबल्स’!
 
‘रॅम’, एव्हरेस्ट आणि 
‘टूर दि फ्रान्स’ 
- कोण, 
किती कठीण?
 
 ‘रॅम’ स्पर्धेतील नीचांकी उंची आहे, समुद्रसपाटीच्या खाली 17क् फूट, तर समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च उंची आहे दहा हजार फुटांपेक्षाही जास्त! संपूर्ण स्पर्धेत स्पर्धकाला एकूण एक लाख 7क् हजार फुटांपेक्षाही जास्त उंची चढावी लागते. ही उंची माऊंट एव्हरेस्टच्या उंचीच्या तीन 
पट आहे.
 ‘रॅम’ सायकल स्पर्धा ‘टूर दि फ्रान्स’ या सायकल शर्यतीपेक्षा दीडपट मोठी आहे आणि ‘टूर दि फ्रान्स’च्या निम्म्या वेळेतच ती पूर्ण करावी लागते. शिवाय ‘रेस्ट डे’ वगैरेची काहीही भानगड नाही.
 ऑस्ट्रेलियन साहसपटू वूल्फगॅँग फॅशिंग यानं ‘रॅम’ स्पर्धा तीनदा जिंकली आहे आणि माऊंट एव्हरेस्टही सर केलं आहे. त्याच्या मते ‘एव्हरेस्ट सर करणं जास्त धोकादायक आहे, पण ‘रॅम’ स्पर्धा एव्हरेस्टपेक्षा जास्त कठीण आणि कस पाहणारी आहे!’ 
 या स्पर्धेत ‘टाइम झोन’ही तब्बल तीन वेळा बदलतात.