- डॉ. रामचंद्र देखणो
आषाढी एकादशीचं निमित्त साधून विठ्ठलभेटीसाठी ठिकठिकाणाहून वारक:यांच्या भक्तीचा मेळा
पंढरपूरच्या दिशेनं वाहतो आहे. त्यानिमित्तानं खास लेखमालेतला हा लेखांक पहिला..
जीवनशुद्धी आणि जीवनसिद्धी देणा:या नैतिकतेच्या राजमार्गावरील वाटचाल म्हणजे पंढरीची वारी! आत्यंतिक सुखाला साठवित वैष्णवांची पाऊले पंढरपुरी निघाली. संपूर्ण विश्वाला सुखी करण्याचे वैश्विक सामथ्र्य एकटय़ा वारीत आहे, हे वैष्णवाने ओळखले आणि नामगजराच्या संकीर्तनातून वारीच्या वाटेवरील प्रत्येक पावलावर वैकुंठच उभे राहिले! त्याच्या गजराने विश्व ढवळून निघाले. भक्तीचे मोठेपण ओळखून संतांनी मानवी जीवनात भक्तीला परमोच्च स्थान दिले.
याच भक्तीबद्दल ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
ज्ञानी इयेते स्वसंविती।
शैव म्हणती शक्ती।
आम्ही परमभक्ती।
आपुली म्हणो।।
‘परमात्मा प्रेमरूप आहे. प्रेमाने प्रेमास जिंकणो म्हणजे या प्रेमाचे सामथ्र्य म्हणजे शक्ती आणि चैतन्याच्या अंगभूत असणा:या सहज प्रीतीचे नाव भक्ती. अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान म्हणजे भक्ती. या भक्तीचे सामूहिक रूप म्हणजे वारी.’
थोडक्यात, वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकीकरण. स्वत:च्या जीवनाला सदाचाराच्या अवस्थेकडे नेणारा हा लोकप्रवाह भक्तीच्या भक्कम तीरांमधून वाहतो. वारी हे नैतिकतेचे शिक्षण देणारे स्वतंत्र लोकविद्यापीठ आहे. पंढरीचा पांडुरंग हा त्या विद्यापीठाचा पदसिद्ध कुलपती आणि भक्त पुंडलीक हा त्या विद्यापीठाचा आद्य कुलगुरू ! संतश्रेष्ठ ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथादि महान संतपरंपरेने कुलगुरुपद अभिमानाने भूषविले आहे. आता या विद्यापीठाची पदवी कोणती, असा प्रश्न उभा राहील. त्याचेही उत्तर तुकाराम महाराज देऊन जातात.
आयुष्याच्या या साधने।
सच्चिदानंद पदवी घेणो।।
‘सच्चिदानंद’ हीच या विद्यापीठाची पदवी. वारीतील वारकरी सच्चिदानंदपदाचा अधिकारी आणि आनंदयात्री होऊन अखंड वाटचाल करतो.
पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कारप्रवाह आहे. सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते नैतिकतेचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचे ज्ञानरूप उभे केले, तर भोळ्या भाविकांनी भक्तिभावाने त्याचे भावदर्शन अनुभवले. ज्याला ज्ञानाने जाणायचे ते ‘™ोय’ आणि ज्याला ध्यानाने गाठायचे ते ‘ध्येय’ असे ज्ञानियांचे ™ोय, ध्यानियांचे ध्येय. तपस्वीयांचे तप, जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य जिथे विटेवर समचरण उभे आहे, त्याला प्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा मेळा म्हणजे ‘वारी’!
मानवी जीवनातील अपूर्णता, दोषमयता, मनुष्याची सदाचाराकडे धावणारी स्वाभाविक प्रवृत्ती या व्यापक जनविश्वात आपल्या थिटेपणाची जाणीव, विश्वाची विशालता आणि नियमबद्धता यांचा अर्थ शोधल्याशिवाय परमार्थाची वाट सापडत नाही. ज्ञानेावर माउली म्हणतात-
पाठी महर्षि येणो आले।
साधकाचे सिद्ध झाले।
आत्मविद थोरावले।
येणोचि पंथे।।
‘याच मार्गावरून महर्षि आले, साधक सिद्धावस्थेला गेले. हा मार्ग स्वच्छ आहे. शुद्ध आहे. निर्मळ आहे.’
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखीने पुणो मुक्काम सोडल्यानंतर पुढचा मुक्काम येतो, तो सासवड गावी. सासवडच्या अगोदर वारीच्या वाटचालीत दिवे घाट लागतो. त्या घाटातून वाटचाल करताना वारीचे दृश्य अतिशय नयनमनोहर असते.
टाळ-मृदंगाच्या गजरात ङोंडे-पताकांचा भार घेऊन वारक:यांचा जनप्रवाह सरसर वर सरकताना दिसतो. हा वर ङोपावणारा प्रवाह पाहिल्यावर माङया मनात नाथांचे एक रूपक उभे राहते. नाथांचे ‘कोडे’ नावाचे एक भारूड आहे. त्यात त्यांनी केलेलं वर्णन आहे.
‘नाथाच्या घरची उलटीच खूण,
पाण्याला मोठी लागली तहान.
आज सई म्या नवल देखिले,
वळचणीचे पाणी आढय़ा लागले.’
‘जगातला कोणत्याही द्रवाचा प्रवाह वरून खाली वाहत येतो. पाण्याचा प्रवाहदेखील वरून खालीच वाहत असतो; परंतु हा व्यापक जनलोकांचा प्रवाह जेव्हा खालून वर वाहताना दिसतो, तेव्हा ‘वळचणीचे पाणी आढय़ा लागले’ या वचनाची साक्ष पटते.’
हा प्रवाह खालून वर म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविचाराकडून विचाराकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, विरोधाकडून विकासाकडे, गोंधळातून व्यवस्थेकडे, भेदातून अभेदाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, उध्र्व दिशेने नेणारा विवेकाचा मार्ग आहे आणि या मार्गावर वैष्णवाच्या सांगाती सत्संगती घडणारी वाटचाल म्हणजे पंढरीची वारी!
संत ज्ञानेश्वर माउलींना वेदांताच्या ज्ञानाने, संत तुकोबारायांना वृत्तीच्या अंतमरुखतेने, नामदेवरायांना भक्तीच्या लडिवाळपणाने, नाथ महाराजांना व्यापक लोकसंग्रहाने, तर समर्थाना लोकभ्रमंतीने जे अनुभवसिद्ध वैभव प्राप्त झाले, ते जगाला देण्यासाठी संत सिद्ध झाले.
संतविचारांचे हे अलौकिक वैभव वारीच्या वाटेवर ओसंडून वाहू लागले. जगाचा, सत्याचा, मानवी मनाचा, दु:खाचा, आनंदाचा, परमात्मा प्राप्तीचाही शोध घेण्याचा ‘भ्रमंती’ हाच सर्वश्रेष्ठ मार्ग ठरतो. जनमनाचा शोध घेऊन जनातील देव शोधणो आणि मनातील देवत्वाला आवाहन करणो यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी.
‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र. ज्ञानेश्वर माउली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तर तुकोबाराय हा नि:श्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम या महामंत्रतच सर्व साधुसंतांचा आणि संतपरंपरेचा समावेश होतो.
आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘मराठी भाषेतून आणि मराठी जीवनातून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ वजा केले, तर बाकी काय राहील?’’
सद्विचारांचे आणि सद्भावनेचे केवढे गडगंज धन त्यांनी महाराष्ट्रावर उधळून ठेवले आहे. ज्ञानेश्वर माउली या मार्गावर रंगले आणि नाचत गात सांगू लागले.
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक।।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया।।
.तर तुकोबाराय या मार्गावरून चालताना अवघे विठ्ठलरूप होऊन म्हणू लागतात.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी।
विठ्ठल तोंडी उच्चारा।।
विठ्ठल अवघ्या भांडवल।
विठ्ठल बोला विठ्ठल ।।
ज्ञानभक्तीच्या समचरणावर अठ्ठावीस युगे परब्रrारूपात विठ्ठल उभा आहे. त्याला भक्तिप्रेमाने भेटायला निघालेला वैष्णवांचा मेळा जेव्हा वारीच्या रूपात उभा राहतो, तेव्हा भक्तीचे व्यापक भावदर्शन अनुभवता येते. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली, ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली, भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण-घेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला, अवघाचि संसार सुखाचा झाला आणि पंढरीच्या वाळवंटात ‘एकची टाळी झाली’. ती अद्वैताची ‘एकची टाळी’ हेच वारक:यांचे लक्ष्यही ठरले आणि लक्षणही. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलते. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो आणि पारलौकिकाची अनुभूती मिळते.
अनुभवामृताच्या प्रेमसागरात विहरण्याचा हा आनंद ज्ञानेश्वर माउलींनी स्वत: घेतला आणि इतरांनी तो कसा घ्यावा हे वारीच्या रूपाने शिकवले. प्रेमच प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाही; पण इथे प्रेमानुभवच भक्तिप्रेमाच्या सहवासाने सुखावतो आणि प्रेमच प्रेमाला साठवित चालू लागते. या प्रेमाची पताका खांद्यावर मिरवित ज्ञानराजही नाचत नाचत म्हणू लागतात,
‘माङो जीवीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी।
पांडुरंगी मन रंगले।
गोविंदाचे गुणी वेधिले।।
(लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.)