शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर योगी आदित्यनाथ

By admin | Updated: March 20, 2017 01:55 IST

सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीत महाराजांच्या चेहऱ्यावर उत्तर प्रदेशातील् नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून

वसई : सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीत महाराजांच्या चेहऱ्यावर उत्तर प्रदेशातील् नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून तो सोशल मिड़ीयावर व्हायरल करण्याचा अतिरेकी प्रकार भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याविरोधात मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.रविवारी सोशल मिडीयावर महाराजांच्या चेहऱ्याच्या जागी उत्तर प्रदेशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावलेला फोटो विरारमधील भाजपप्रेमी अमित मिश्रा, संदीप सिंग, राकेश सिंग यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्याचे तीव्र पडसाद वसईतील मराठा समाज संघटनेत उमटले. राजाराम मुळीक, विनायक निकम, राजाराम बाबर, राजेश मातोंडकर, नरेश खोत, जयराम राणे, अनिकेत गुरव, बाळकृष्ण चौकेकर, संतोष घाग, विश्वास सावंत, दिनेश घाग, प्रवीण नलावडे यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी यावेळी दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापीही सहन केला जाणार नाही. हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणूनबुजून करण्यात आलेला ंिनंदनीय प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. अन्यथा शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाचा उद्रेक होऊन त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील , असा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, भाजपाचे वसईतील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर धुरी यांनी मात्र अप्रत्यक्षरित्या या फोटोेचे समर्थन केले आहे. हिंदी भाषिक तरुणांनी भावुक होऊन हा प्रकार केलेला आहे. यात महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नाही. उलट यामागे देशभक्तीचा विचार असून शूरतेला केलेले वंदन आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा, असा संदेश यातून तरुणांनी दिला आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धुरी यांच्या वक्तव्यानंतर वसईतील मराठा समाजातील नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. धुरी स्वत: मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी होत असतात. असे असताना त्यांनी केलेले समर्थन दुदैवी आहे असेही नेत्यांचे म्हणणे आहे.