शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

By admin | Updated: March 27, 2017 22:29 IST

मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे़ त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते़ नैऋत्य मोसमी पावसावर पॅसिफिक महासागर उद्भवणाऱ्या एल निनोचा प्रभाव पडत असतो़ यंदा पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्याकडील मान्सूनवर जुलैनंतर पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे़ स्कायमेटच्या अंदाजानुसार जुनमध्ये १०२ टक्के पाऊस होऊ शकतो़ जूनमध्ये सर्वसाधारण पावसाची ७० टक्के शक्यता, २० टक्के सरासरीपेक्षा जास्त आणि १० टक्के सरासरीच्या कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ जुलैमध्ये ९४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात सर्वसाधारण पावसाची ६० टक्के शक्यता, सरासरीपेक्षा जास्त पावसाची १० टक्के शक्यता, कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे.आॅगस्टमध्ये ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात समाधानकारक पावसाची ६० टक्के शक्यता, जादा पावसाची १० टक्के शक्यता आणि कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस होणार असून त्यात सर्वसाधारण पावसाची ५० टक्के शक्यता, जादा पावसाची २० टक्के आणि ३० टक्के कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेटचे कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमान वाढत असल्याचे जाणवले असून त्यातून एल निनो इफेक्ट दिसून येऊ शकतो़ त्यामुळे भारतात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याची २५ टक्के शक्यता असून दुष्काळ पडण्याची शक्यता १५ टक्के शक्यता आहे.स्कायमेटचा अंदाजमहिनाटक्केवारीएकूण पाऊसजून१०२१६४जुलै९४२८९आॅगस्ट९३२६१सप्टेंबर९६१७३सलग चौथ्या वर्षी कमी पावसाची शक्यताएल निनोचा प्रभाव २०१४ आणि २०१५ या वर्षात मोठ्या प्रमाणावर जाणविल्याने त्यांचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाला होता़ सलग गेल्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.भारताचे सरासरी पाऊसमान ८८७़५ मिमी आहे़ २०१४ मध्ये ७८१ मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा १२ टक्के कमी होता़ २०१५ मध्ये ७६०़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा १४ टक्के कमी होता़ गेल्या वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला असला तरी तो ८६२़२ इतका झाला होता़ तो सरासरीपेक्षा ३ टक्के कमी होता.