शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

सौरऊर्जेवर अख्खे घर

By admin | Updated: August 16, 2016 04:29 IST

घरातील सर्व दिवे लावले की, आज काय दिवाळी आहे, असे हमखास विचारले जाते. बिल केवढे येईल, तुम्हाला काय त्याचे, असे घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात. पण, भविष्यात सौरऊर्जेचा

- दिनेश कदम घरातील सर्व दिवे लावले की, आज काय दिवाळी आहे, असे हमखास विचारले जाते. बिल केवढे येईल, तुम्हाला काय त्याचे, असे घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात. पण, भविष्यात सौरऊर्जेचा वापर घरातील वीज उपकरणांसाठी केला, तर ग्राहकांसाठी ती खरंच दिवाळी असेल. सर्वात महत्त्वाचे बिलात बचत. सौरऊर्जेवर केवळ अन्नच शिजवू शकतो, पाणी गरम होते, दिवे लागू शकतात, एवढेच आपल्याला माहीत आहे. पण, याच्यापलीकडे या ऊर्जेचा खूप वापर होतो, हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. आपल्याकडील नागरिकांना कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. म्हणूनच वीज, पाण्याची अक्षरश: उधळपट्टी करतात. आज सिमेंटच्या जंगलामुळे वनसंपदा नष्ट होत असल्याने पाऊस कमी पडत आहे. गतवर्षी तर दुष्काळाने सर्वांचीच झोप उडवली. पाऊस कमी झाल्यामुळे त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होतो. परिणामी, नागरिकांना खासकरून ग्रामीण भागातील नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागते. सातत्याने होणारे भारनियमन आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या साधनसंपत्तीची बचत, यातून सौरऊर्जेच्या विकासाचा विचार डोक्यात आला. त्यादृष्टीने मग संशोधनाला सुरुवात केली.विजेची बचत हीच विजेची निर्मिती, असे सांगितले जाते. आज आपल्याकडे विद्युत उपकरणांसाठी अल्टरनेटिव्ह करंट (एसी) चा वापर केला जातो. डायरेक्ट करंटचा (डीसी) आपल्याला विसर पडला आहे. नेमकी हीच बाब हेरून उपकरणांसाठी डीसीचा वापर केला. आज डीसीवर चालणाऱ्या अनेक मोटार बाजारात उपलब्ध आहेत. पंखा, फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये डीसी करंटचा वापर सुरू केला. हे एका बाजूला सुरू असताना सौरऊर्जेच्या माध्यमातून घरातील सर्व विद्युत उपकरणे चालवू शकतो, याचा शोध लावला. यामुळे विजेची बचत होते, पण त्याचबरोबर तुमच्या बिलातही प्रचंड फरक पडतो. हे कठीण असले तरी अशक्य नाही. सौरऊर्जेवर घर उजळून निघणे, हे विद्युत क्षेत्रातील क्रांतीच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. मुळात आपल्याकडे सौरऊर्जेबद्दल म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. घरातील सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालू शकतात, हेच आपल्याकडील नागरिकांच्या पचनी पडत नाही. पण, ज्यांना याचे महत्त्व कळले, त्यांनी त्याचा वापर केला आणि फरक जाणवू लागला. मुंबईतील काही घरे, इमारतींत सौरऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. जर घरात याचा वापर करायचा असेल, तर खिडकीत पॅनल बसवावे लागते. तुम्हाला किती उपकरणे यावर चालवायची आहेत, त्यानुसार ते लावावे लागते. केवळ ट्युबलाइट, पंखेच नाही तर अगदी फ्रीज, एसीही चालवू शकतो. साधारण २५ हजारांपासून सुरुवात आहे. सुरुवातीला तुम्हाला खर्च जास्त वाटेल, पण बिलातही फरक पडतो. विजेची बचत होते. तुम्ही जेवढ्या किलोवॅटचे युनिट बसवाल, तेवढा खर्च वाढतो. पण, नंतर फारशी देखभाल करावी लागत नाही. चांगल्या गुणवत्तेचे पॅनल बसवले, तर २५ वर्षे बघावे लागत नाही. त्यात अपग्रेड केले की, ४० वर्षांपर्यंत ते टिकते. अर्थात, चिनी बनावटीची पॅनलही येतात, पण त्यात धोका असतो. आज आपल्याकडे नेट मीटरिंग पद्धत आल्यामुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही वीजनिर्मितीही करू शकता. दिवसा ही वीज कंपनीला द्यायची. रात्री त्यांच्याकडून घ्यायची. जी वजावट राहील, तेवढे तुम्हाला बिल भरावे लागणार. तुम्ही निर्मिती केलेली वीज कंपनीच्या ग्रीडमध्ये जात असते. सौरऊर्जेने तुमचे घर तसेच सोसायटीही स्वयंपूर्ण होऊ शकते. आज अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन याचे महत्त्व पटवून दिले आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हे लावल्याने अंघोळीला गरम पाणी मिळणार का, असेही प्रश्न विचारले जातात. तेव्हा याचा वापर केवळ वीज उपकरणांसाठी होतो, हे समजावून द्यावे लागते. ज्या वेळेस सौरऊर्जेचे पॅनल बसवायचे असते, त्यापूर्वी आम्ही सोसायटीचे विजेचे लेखापरीक्षण करतो. नंतर, किती क्षमतेचे पॅनल बसवायचे, हे ठरवतो. सोसायटीमधील जिन्यात असलेले दिवे तुम्ही या ऊर्जेवर लावू शकता. यामुळे सोसायटीला येणाऱ्या बिलात खूप फरक पडतो. आम्ही लगेच सौरऊर्जेवर सोसायटीला नेत नाही. सुरुवातीला एलईडीचा वापर करायला सांगतो. साधारण तीन वर्षांनी त्या सोसायटीतील वीजप्रणालीचे रूपांतर सौरऊर्जेत करतो. सोसायटीचे छत, गच्चीवरील टाइल्सना पॅनल जोडले, तर किती फायदा होईल... आज आॅफिसच्या इमारतींना बाहेरून काचा लावल्या जातात. या काचांचा वापर सौरऊर्जेसाठी केल्यास जशी घरे स्वयंपूर्ण होतील, तशी ही कार्यालयेही होतील. शब्दांकन : निलेश धोपेश्वरकरसोसायट्यांना उत्पन्नाचे साधनपावसाळ्यात पाणी गळते, म्हणून बहुतांश सोसायट्या गच्चीवर पत्रे लावतात. या पत्र्यांना नेट मीटरिंग पद्धतीनुसार सौरऊर्जेचे पॅनल लावल्यास त्यातून विजेची निर्मिती करून सोसायटी ती वीज कंपनीला विकू शकेल. सोसायट्यांसाठी हे उत्पन्नाचे चांगले साधन होऊ शकेल. वीजबिलात घटबोरिवली येथील मंदिरात सौरऊर्जेचा वापर केला आणि त्यांच्या बिलात प्रचंड घट झाली. ३८ हजारांचे येणारे बिल १६ हजारांवर आले. तसेच एका सोसायटीत आयटीआयचे विद्यार्थी एलईडी ट्युबलाइट बनवतात. अकुशल काम तेथील महिला करतात. आमच्या संस्थेतर्फे ट्युबलाइट विकतो. संपूर्ण नफा त्यांना देतो. सोलर ग्रीन हाउसग्रामीण भागात सोलर ग्रीन हाउस बनवण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत. पॅनल येथे बसवून सूर्यकिरणे थेट जमिनीवर आणणार आहोत. तेथील वातावरणाला पोषक असे भाजीपाला, फुलशेतीचे उत्पन्न घेता येऊ शकेल. सध्या यावर अभ्यास सुरू आहे.पुढील पिढीला फायदाआज विजेची मागणी वाढत असताना पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही. यामुळे भारनियमन करावे लागत आहे. कदाचित, पुढील पिढीला वीज मिळेल का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. पण, सौरऊर्जेचा वापर केला, तर भविष्यात ही पिढी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विजेचा वापर करू शकेल.