शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

‘इसिस’च्या प्रचाराची वेबसाइट ब्लॉक

By admin | Updated: September 27, 2015 05:50 IST

इंडोनेशियाहून इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा ‘इसिस’साठी चालविली जाणारी वेबसाइट भारतीय सुरक्षा संस्थांनी नुकतीच ‘ब्लॉक’ केली आहे.

डिप्पी वांकाणी, मुंबईइंडोनेशियाहून इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा ‘इसिस’साठी चालविली जाणारी वेबसाइट भारतीय सुरक्षा संस्थांनी नुकतीच ‘ब्लॉक’ केली आहे. ‘इसिस’चा आॅनलाइन प्रचार करण्याच्या प्रकाराचा मुकाबला करणाऱ्या सुरक्षा संस्थांनी ही कामगिरी केली आहे.या वेबसाइटच्या कारवाया संशयास्पद असल्याचे आढळल्यानंतरच ती ब्लॉक करण्यात आली. ‘आयएसडीएआरटी’चा अरबीतील अर्थ प्रसार किंवा प्रसिद्धी असा होतो. दहशतवादविरोधी संस्था इंटरनेटवर अहोरात्र नजर ठेवून आहेत. जगभरातील युवकांना आपल्या संघटनेत प्रवेश देण्यासाठी इंटरनेट हे माध्यम ‘इसिस’ला सर्वात प्रभावी ठरले आहे. कल्याणमधील चार युवक ‘इसिस’मध्ये सामील झाले होते. त्यापैकी अरीब अरीब माजीद हा परतला आहे. आपण इसिसशी कशाप्रकारे आॅनलाइन संपर्कात होतो, हे त्याने सांगितले आहे. अगदी अलीकडील काळात अफसा जबीन ऊर्फ निक्की जोसेफ या तरुणीला संयुक्त अरब अमिरातीतून हैदराबादला हाकलण्यात आले. तीसुद्धा भारतीय युवकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी देत होती, असे आढळले आहे. इसिसमध्ये सामील होण्यासाठी व त्या दृष्टीने चिथावणी देणाऱ्या अफसा जबीन हिने इंटरनेटचा वापर केला होता. अशाच एका अभियंत्याला तिने लग्नाचे आश्वासन दिले होते. हा अभियंता इसिसमध्ये सामील होण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली. इंडोनेशियातून चालविल्या जाणाऱ्या या वेबसाईटवर आमचे गेल्या काही दिवसांपासून लक्ष होते. ही वेबसाईट इंडोनेशियाची असली तरी त्यातील मजकूर अरबी होता. आम्ही त्या मजकुराचा सखोल अभ्यास केला असता तो केवळ इसिसचा प्रसार करणारा नव्हता तर इसिसमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी देणारा होता व इसिसमध्ये कसे सामील व्हावे, याची माहिती देणारा होता, असे आढळले. त्यानंतरच आम्ही ही वेबसाईट ब्लॉक केल्याचे सूत्राने सांगितले. कोणीही वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास ‘दुष्प्रचार करणारी वेबसाईट ब्लॉक’ करण्यात आल्याचा संदेश येतो.